MR/Prabhupada 0359 - आपल्याला परंपरा प्रणालीद्वारे हे विज्ञान शिकले पाहिजे



Lecture on BG 4.2 -- Bombay, March 22, 1974

वैदिक ज्ञान प्राप्त करणे म्हणजे श्रीकृष्णांना समजून घेणे. पण जर तुम्ही श्रीकृष्णांना जाणून घेतले नाही आणि जर तुम्ही अशाच काही वायफळ गोष्टी बोललात. आणि जर तुम्ही स्वतःला पंडित समजता. ते श्रम एवं हि केवलं. ते सांगितले आहे श्रम एव हि. केवळ वेळ वाया घालवणे आणि निरर्थक मेहनत. वासुदेव भगवती…

धर्मः स्वनुष्ठितः पुंसां
विष्वक्सेनकथासु यः
नोत्पादयेद्यदि रतिं
श्रम एव हि केवलम्
(श्रीमद् भागवतम् १.२.८)

आता, धर्म, प्रत्येकजण त्याच्या व्यावसायिक कर्तव्याचे चांगल्याप्रकारे पालन करत आहे. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र मी संघटित समजाबद्दल बोलत आहे, या सध्याच्या पशु समाजाबद्दल नाही. अगदी संघटित समाज, ब्राम्हण ब्राम्हणांप्रमाणे आपली कर्तव्य पार पडत आहे. सत्यं शमो दमस तितिक्षः आर्जवं विज्ञानम आस्तिक्यं ब्रम्ह कर्म स्वभाव-जम (भ.गी. १८.४२) तरीही… धर्म: स्वानुस्थित:, तो एक ब्राम्हण म्हणून चांगल्यप्रकारे आपल्या कर्तव्यांचे पालन करत आहे, पण अशा कर्तव्यांचे पालन करून, जर तो कृष्णभवनेचा विकास करत नसेल, तर श्रम एव हि केवलं. हा निर्णय आहे. मग तो वेळ वाया घालवत आहे. कारण ब्राम्हण बनायला, उत्तम ब्राम्हण, म्हणजे ब्रम्हनबद्दल माहिती असणे. अथातो ब्रम्ह जिज्ञासा. आणि पर-ब्रम्हन, पर-ब्रम्हन, श्रीकृष्ण आहे. म्हणून जर त्याला श्रीकृष्ण समजले नाहीत, तर त्याच्या ब्राम्हणाच्या कर्तव्याचे पालन करण्याचा काय उपयोग आहे? तो शास्त्राचा निर्णय आहे. श्रम एव हि केवलं, केवळ वेळ वाया घालवणे.

म्हणून आम्ही हे विज्ञान परंपरा प्रणालीतून शकले पाहिजे. एवं परंपरा-प्राप्तम(भ.गी. ४.२) अशा योग्य व्यक्तीकडे तुम्ही गेले पाहिजे, जो श्रीकृष्णांना जाणतो. एवं परंपरा… सूर्याप्रमाणे, विवस्वान, त्याला श्रीकृष्णांनी निर्देशित केले. म्हणून जर तुम्ही विवस्वान सूर्यदेवाकडून निर्देश घेतले, तर तुम्हाला योग्य ज्ञान मिळेल. पण तुम्ही सूर्य ग्रहावर जाऊन विचारू शकत नाही, " श्रीकृष्णांनी तुला काय सांगितले?" म्हणून विवस्वानने आपला पुत्र मनूला हे ज्ञान दिले, या युगाला वैवस्वत मनु म्हणतात, हे युग. आता, विवस्वान, कारण तो विवस्वानचा मुलगा आहे. म्हणून या मनूला वैवस्वत मनू म्हणतात. वैवस्वत मनु. आता हे युग वैवस्वत मनूचे आहे. मनुरीक्ष्वाकवे 'ब्रवीत्. तर मानूनेही आपल्या मुलाला सांगितले. तर या प्रकारे, एवं परंपरा-प्राप्तं (भ.गी. ४.२), तो काही उदाहरणे देत आहे, पण ज्ञान परंपरेद्वारे प्राप्त केले पाहिजे. पण या नाहीतर त्या कारणाने, परंपरा हरवली आहे… ज्याप्रमाणे मी माझ्या शिष्यांशी काही बोललो आहे. तो तीच गोष्ट त्याच्या शिष्यांना सांगतो. तो तीच गोष्ट त्याच्या शिष्यांना सागतो. पण काही कारणाने,जर हे विकृत झाले, तर ज्ञान गमावले जाते. जेव्हा कोणी शिष्य परंपरेतून आलेले हे ज्ञान विकृत करतो, तेव्हा ते गमावले जाते. ते स्पष्ट केले जात आहे. स कालेन महता. काळ खूप शक्तिशाली आहे. तो बदलतो. ते म्हणजे… काळाचा अर्थ आहे परिवर्तन, मूळ स्थितीला मारतो. तुम्हाला अनुभव आला आहे.

तुम्ही काही खरेदी करता. ती ताजी, नवीन आहे. पण वेळ तिला मारते. ती खराब होईल, ती काही काळाने निरुपयोगी बनेल, तर वेळ लढत आहे. हि भौतिक वेळ, तिला काळ म्हणतात. काळ म्हणजे मृत्यू. किंवा काळ म्हणजे काळसर्प. तर काळसर्प नष्ट करतो. ज्या कशाला स्पर्श करतो, ते नष्ट होते. त्याचप्रमाणे, काळ… हे काळ देखील श्रीकृष्णनाचे दुसरे रूप आहे. तर कालेन महता. म्हणून त्याला महता म्हणतात. हे खूप शक्तिशाली आहे. ती सर्वसाधारण गोष्ट नाही. महता. त्याचे काम नष्ट करणे आहे. स कालेन इह नष्ट. तर काळाच्या ओघात… कारण काळ कसा नष्ट करू शकतो? जसे काळ बघतो की तुम्ही विकृत करत आहात, मग ते नष्ट होत जाते. म्हणून काळ - भूत, वर्तमान, भविष्य काळाच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांकडून भगवद् गीता समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. तथाकथित तत्वज्ञ, टीकाकारांकडून भगवद् गीता समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. ते विकृत पद्धतीने ते भगवद्-गीता लिहितील. कोणीतरी म्हणेल, "कोणी कृष्ण नव्हता. महाभारत नव्हते." कोणी म्हणेल, "कृष्णांनी या मुद्द्यावर जोर दिला," कृष्णांनी त्या मुद्दावर जोर दिला," कोणी म्हणेल, "कृष्णांनी कर्म, कर्म-कांडावर जोर दिला." कोणी म्हणेल ज्ञानावर, आणि कोणी म्हणेल योग. भगवद् गीतेच्या अनेक आवृत्या आहेत. योगी चार्थ, ज्ञान अर्थ, गीतार गान अर्थ… तर वास्तविक गीतार गान भगवंतांद्वारे सांगितले आहे, आपण ते स्वीकारले पाहिजे. ते गीतार गान आहे.