MR/Prabhupada 0385 - गौरंग बोलिते हबेचे तात्पर्य



Purport to Gauranga Bolite Habe -- Los Angeles, December 29, 1968

हे गाणे नरोत्तम दास ठाकूर यांनी गायले होते. गौडीय वैष्णव संप्रदाय गुरु शिष्य परंपरेतील एक महान आचार्य गौडीय वैष्णव संप्रदाय म्हणजे गुरु शिष्य परंपरा चैतन्य महाप्रभूंपासून चालत आलेली. तर नरोत्तम दास ठाकुर यांनी अनेक गाणी लिहिली आहेत, आणि ते सर्व वैष्णवांकडून अधिकृत म्हणून ओळखले जाते. त्यांनी सोप्या बंगाली भाषेत गाणी गायली आहेत, पण गाण्याचे तात्पर्य आणि गहन अर्थ महत्वपूर्ण आहे.

ते सांगतात: गौरांग बोलिते हबे पुलक-शरीर. हि जप करण्याची परिपूर्णता आहे, की जेव्ह आपण जप करतो किंवा गौरांग प्रभूंचे नाव घ्या. ज्यांनी संकीर्तन आंदोलनाची सुरवात केली, अंगावर शहारा येईल. म्हणून त्याचे अनुकरण करणे आवश्यक नाही. पण नरोत्तम दास ठाकूर सुचवीत आहेत केव्हा ती संधी येईल. की जसे आपण गौरांग प्रभूंच्या नावाचा जप करू, अंगावर शहारा येईल. आणि शहारा आल्यानंतर, हरी हरी बोलिते नयने बाबे नीर, हरे कृष्ण जप करून डोळ्यात अश्रू येतील. मग पुन्हा त्यांनी सांगितले, आर कबे नीताईचंद करुणा करीबे. आपण सर्व नित्यानंद प्रभूंची कृपा मागत आहोत. नित्यानंद मूळ आध्यात्मिक गुरु मानले जातात. तर आपल्याला नित्यानंद प्रभूंच्या कृपेद्वारे गौरांग, किंवा चैतन्य प्रभुंकडे गेले पाहिजे.

तर अशा व्यक्तीचे लक्षण काय आहे ज्याने नित्यानंद प्रभूंची अहैतुकी कृपा प्राप्त केली आहे? नरोत्तम दास ठाकूर सांगतात की ज्याला वास्तवात नित्यानंद प्रभूंची अहैतुकी कृपा प्राप्त झाली आहे. त्याची काही भौतिक इच्छा राहात नाही. ते लक्षण आहे. आर कबे नीताईचंद करुणा करीबे संसार-वासना मोर किबे तुच्छ. संसार-वासना म्हणजे भौतिक सुखाची इच्छा, केव्हा ते तुच्छ होईल. अर्थात, जोपर्यंत आपल्याला हे शरीर मिळाले आहे आपल्याला अनेक भौतिक गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. पण आनंद उपभोगण्याच्या भावनेने नाही, पण शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी.

तर… आणि ते पुढे सांगतात: रुप-रघुनाथ-पदे हैबे आकुती. केव्हा मी सहा गोस्वामींच्या लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करायला अतिशय उत्सुक असेन आकुती म्हणजे उत्सुक. एक… कारण रूप गोस्वामी या भक्ती सेवेचे पिता आहेत. त्यांनी ते पुस्तक लिहिले आहे, भक्ती-रसामृत-सिंधू. त्या पुस्तकात चांगली दिशा दाखवली आहे. चैतन्य चरितामृतामध्ये, आणि इतर पुस्तके… आम्ही आमचे पुस्तक "चैतन्य प्रभूंची शिकवण" मध्ये त्या दिशा संक्षिप्तपणे सांगितल्या आहेत. तर आपल्याला राधा- कृष्णाच्या माधुर्य प्रेमाच्या गोष्टी शिकायला पाहिजेत. सहा गोस्वामींच्या शिकवणीद्वारे. नरोत्तम दास ठाकूर आपल्याला दिशा दाखवतात की तुम्ही समजण्याचा प्रयत्न करू नका राधा-कृष्णाचे माधुर्य प्रेम आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने तुम्ही गोस्वामींच्या द्वारे समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

तर नरोत्तम दास ठाकूर गातात… (खंड) नरोत्तम. रुप-रघुनाथ-पदे हैब आकुती कबे हाम बुझब श्री युगल-पिरिति. युगल-पिरिति म्हणजे माधुर्य प्रेम. आणि दुसरे ते गातात की विषय छाडिया कबे शुद्ध हबे मन. हे मन, जितके, जितके हे मन भौतिक विचारात गुंतले आहे, ते वृदावनच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात: विषय शुद्ध कबे शुद्ध हबे मन. माझे मन केव्हा संपूर्ण शुद्ध होईल, भौतिक चिंता आणि इच्छातून मुक्त, मग मी वृंदावन म्हणजे काय समजू शकेन, राधा आणि कृष्णाचे माधुर्य प्रेम काय आहे. आणि मग माझे आध्यात्मिक जीवन यशस्वी होईल.