MR/Prabhupada 0386 - गौरंगेर दुति पद तात्पर्य भाग १



Purport to Bhajahu Re Mana -- The Cooperation of Our Mind

यार धन संपद, सेई जाने भक्ती-रस-सार. हे दुसरे गाणे नरोत्तम दास ठाकूर यांनी रचले आहे, आणि ते म्हणतात की "ज्याने चैतन्य प्रभूंचे पदकमल स्वीकारले आहेत. दुसऱ्या शब्दात, ज्याची एकमात्र संपत्ती आहे, चैतन्य प्रभूंचे दोन चरण. अशा व्यक्तीने जाणून घ्यायला हवे भक्ती सेवेचे सार काय आहे." सई जाने भक्ती-रस-सार. भक्ती सेवेचे तात्पर्य काय आहे., किंवा भक्ती सेवेची विवेकबुद्धी काय आहे. अशा व्यक्तीद्वारे समजू शकेल ज्याने चैतन्य प्रभूंचे चरण सर्वकाही म्हणून स्वीकारले आहे.

कल्पना अशी आहे की प्रत्यक्षात चैतन्य प्रभू, ते स्वतः कृष्ण आहेत, आणि ते वैयक्तिकरित्या जिवांना भक्ती सेवा शिकवत आहेत. थेट. म्हणून चैतन्य प्रभूंनी शिकवलेल्या भक्ती सेवेची साधने सर्वात परिपूर्ण आहेत. इथे कोणतीही शंका नाही. तज्ञ, किंवा मालक सेवकाला शिकवत आहे कसे काम करायचे. जर कोणी अभियांत्रिकी कामात प्रवीण आहे आणि तो सहाय्यकाला वैयक्तिकरित्या शिकवत आहे, ती शिकवण, सूचना, सर्वात परिपूर्ण आहे. त्याचप्रमाणे, भगवान श्रीकृष्ण स्वतः भक्ताच्या भूमिकेमध्ये, भक्ती सेवा शिकवत आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी बनवलेला मार्ग परिपूर्ण भक्ती सेवेचा सर्वात व्यवहार्य मार्ग आहे. सई जाने भक्ती रस सार. मग त्यांनी सांगितले, गौरांगेर माधुरी-लीला, यार करणे प्रवेशिला. आता ते चैतन्य प्रभूंच्या लीलांमध्ये येतात. ते म्हणतात की "चैतन्य प्रभूंच्या लीला देखील भगवान कृष्णांच्या लीलांप्रमाणेच दिव्य आहेत."

भगवद् गीतेमध्ये असे संगितले आहे की जो कोणी फक्त समजू शकतो, श्रीकृष्णांचा दिव्य जन्म, मृत्य, कर्म, तो ताबडतोब देवाच्या राज्यात प्रवेश करायला पात्र बनतो. केवळ श्रीकृष्णांच्या लीला आणि दिव्य कर्म समजून घेण्याने त्याचप्रमाणे, जो चैतन्य प्रभूंच्या लीलांमध्ये प्रवेश करतो. त्याचे हृदय लगेच कल्मषातून मुक्त होतो. गौरांगेर माधुरी-लीला. यार कर्णे प्रवेशिला कर्णे प्रवेशिला म्हणजे फक्त चैतन्य प्रभूंचा संदेश प्राप्त करावा लागतो. कर्णे म्हणजे कानने. विनम्रपणे संदेश ऐकणे . मग लगेच त्याचे हृदय सर्व भौतिक कल्मषातून मुक्त होते. मग ते म्हणतात: येई गौरांगेर नाम लय तार हय प्रेमोदय.

भक्तांना भगवंतांचे प्रेम कसे विकसित करायचे याची चिंता असते. नरोत्तम दास ठाकूर सुचवितात की जो कोणी फक्त जप करतो, श्री-कृष्ण-चेतन्य प्रभू-नित्यानंद… गौरांगचा अर्थ आहे या सर्व पार्षदांसह जेव्हा आपण गौरांग बोलतो. आपल्या म्हणण्याचा अर्थ आहे: हे पाच नित्यानंद प्रभू, अद्वैत, गदाधर, आणि श्रीवास. सर्व एकत्र. तर येई गौरांगेर नाम लय, जो कोणी घेतो, लगेच त्याचे भगवंतांबद्दलचे प्रेम विकसित होईल.

येई गौरांगेर नाम लय. तार हय प्रेमोदय, तारे मुई जय बोले हरी. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात "मी त्याचे अभनंदन करतो." कारण हे निश्चित आहे की त्याने भगवंतांचे प्रेम विकसित केले आहे. मग ते सांगतात, गौरांग-गुणेते झुरे, नित्य-लीला तारे स्फुरे. जो कोणी, जर फक्त चैतन्य महाप्रभूंचे दिव्य गुण ऐकण्याने. तो रडतो, तो एकाच सांगण्यात समजतो की राधा कृष्ण यांच्यामधील प्रेम लीला काय आहेत. नित्य-लीला म्हणजे लीला, किंवा राधा आणि कृष्णांच्या मधील प्रेमाची देवाण घेवाण. ती चिरंतन आहे. ती तात्पुरती नाही.

आपण असा विचार करू नये की राधा- कृष्ण लीला, प्रेमाच्या गोष्टी, तरुण मुले आणि मुली यांच्या कार्यासारखे आहे, जसे आपण या भौतिक जगात पाहतो. अशा प्रकारची प्रेम भावना हे प्रेम नाही , ती कामुक वासना आहे, आणि ती शाश्वत नाही म्हणून ते मोडतात. आज मी कोणावरतरी प्रेम करतो आणि उद्या ते मोडते. पण राधा-कृष्ण लीला त्या सारख्या नाहीत. त्या शाश्वत आहेत. म्हणून ते दिव्य आहे, आणि हे तात्पुरते आहे. तर केवळ जो चैतन्य प्रभूंच्या लीलांमध्ये तल्लीन झाला आहे, तो ताबडतोब राधा-कृष्णांच्या प्रेम भावनेची वास्तविक स्थिती काय आहे समजतो. नित्य-लीला तार स्फुरे. सई यय राधा-माधव, सई यय व्रजेंद्र-सुत पाश. आणि फक्त तेवढे करून, तो कृष्णाच्या राज्यात प्रवेश करायला लायक बनतो. व्रजेंद्र-सुत. व्रजेंद्र-सुत म्हणजे वृंदावनातील नंद महाराजांचा पुत्र. तो आपल्या पुढील जन्मी कृष्णाच्या बरोबर संग करण्याची खात्री आहे.