MR/Prabhupada 0388 - हरे कृष्ण मंत्राचे तात्पर्य रेकॉर्ड अल्बममधून
Purport to Hare Krsna Mantra -- as explained on the cover of the record album
हे दिव्य कंपन - हरे कृष्ण जपाद्वारे, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे - कृष्ण चेतना जागृत करण्याची हि उत्कृष्ट पद्धत आहे. जीवन आध्यात्मिक आत्म्याच्या रूपात, आपण सर्व मूळ कृष्णभावनामृत जीव आहोत, पण आपल्या अनादिकाळापासून असलेल्या पदार्थाच्या संगामुळे, भौतिक वातावरणामुळे आता आपली चेतना दूषित झाली आहे. या जीवांच्या प्रदूषित संकल्पानेत, आपण सर्वजण भौतिक प्रकृतीच्या स्त्रोतांचे शोषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत, पण प्रत्यक्षात आपण तिच्या जटिलतेमध्ये अधिकाधिक गुंतलो आहोत. या भ्रमाला माया म्हणतात, किंवा अस्तित्वासाठी कठोर संघर्ष, भौतिक प्रकृतीच्या कडक नियमांना जिकंण्यासाठी. भौतिक प्रकृतीविरुद्ध हा भ्रामक संघर्ष एकदाच थांबवला जाऊ शकतो आपली कृष्णभावना जागृत करून.
कृष्णभावनामृत मनावर कृत्रिमपणे लादणे नाही. हि चेतना जीवाची मूळ शक्ती आहे. जेव्हा आपण दिव्य कंपन ऐकतो, हि चेतना जागृत होते. आणि या युगासाठी अधिकारींनी या पद्धतीची शिफारस केली आहे. व्यवहारिक अनुभवाद्वारे सुद्धा, आपण हे जणू शकतो की या महा-मंत्राचा उच्चार करून, किंवा उद्धारासाठी महान जप, एकदम आपण आध्यात्मिक स्तरावर दिव्य परमानंद अनुभवू शकतो. जेव्हा आपण वास्तवात आध्यात्मिक स्तरावर येतो. इंद्रिय, मन आणि बुद्धीच्या अवस्थेपलीकडे, तेव्हा आपण दिव्य स्तरावर असतो. हा जप हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम राम राम, हरे हरे, थेट आध्यात्मिक स्तरावर मान्य केला आहे. चेतनेच्या सर्व निम्न स्थितीपेक्षा श्रेष्ठ - अर्थात कामुक, मानसिक आणि बौद्धिक
मंत्राची भाषा समजण्याची काही आवश्यकता नाही, आणि मानसिक तर्काचीही काही आवश्यकता नाही. आणि या महा-मंत्राच्या उच्चारासाठी कोणतीही बौद्धिक तडजोड नाही. तो आध्यात्मिक स्तरावरून स्वतः प्रकटतो, आणि अशा प्रकारे, कोणीही या दिव्य ध्वनी कंपनामध्ये भाग घेऊ शकतो, कोणत्याही मागील पात्रतेशिवाय, आणि आनंदने नाचणे. आम्ही ते प्रत्यक्षपणे पाहिले आहे. अगदी लहान मूल जपामध्ये भाग घेऊ शकते, किंवा कुत्राही भाग घेऊ शकतो. भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या मुखातून, हा जप एकला पाहिजे, जेणेकरून तात्काळ प्रभाव प्राप्त केला जाऊ शकेल.
जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत अभक्तांनी केलेला जप ऐकणे टाळले पाहिजे, सर्पाच्या ओठानी स्पर्श केलेल्या दुधाचा विषारी परिणाम होतो. हरा शब्द भगवंतांचे शक्ती रूप संबोधित करण्याचे आहे. दोघे कृष्ण आणि राम थेट भगवंतां संबोधित करायचे रूप आहे. आणि त्याचा अर्थ "सर्वोच्च आनंद, शाश्वत." हरा भगवंतांची सर्वोच्च आनंद शक्ती आहे. हि शक्ती, जेव्हा हरे म्हणून संबोधली जाते, तेव्हा आपल्याला सर्वोच्च भगवंतांपर्यंत पोहोचण्यास मदत करते. भौतिक शक्ती, जिला माया म्हणतात, ती देखील भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एक आहे, तितकेच आपण देखील भगवंतांची तटस्थ शक्ती आहोत. जीवाला पदार्थापेक्षा श्रेष्ठ शक्ती म्हणून वर्णन केले आहे. जेव्हा परा शक्ती अपरा शक्तीच्या संपर्कात असते, तेव्हा विसंगत परिस्थिती बनते. पण जेव्हा सर्वोच्च तटस्थ शक्ती आध्यत्मिक शक्तीच्या संपर्कात असते, हरा, ती जीवाची आनंदी, सामान्य स्थिती बनते.
तीन शब्द, हरा, कृष्ण आणि राम, महा-मंत्राचे दिव्य बी आहे. आणि जप भगवंतांची आणि त्यांच्या आंतरिक शक्तीची आध्यात्मिक प्रार्थना आहे. हरा, बद्ध जीवाला संरक्षण देण्यासाठी. हा जप खऱ्या अर्थाने लहान मुलाचे आईसाठी रडणे आहे. माता हरा सर्वोच्च पिता, हरी, किंवा कृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी मदत करते भगवान अशा प्रामाणिक भक्तासमोर स्वतःला प्रकट करतात. म्हणून आध्यात्मिक साक्षात्काराचे इतर कोणतेही साधन या युगात इतके प्रभावी नाही, जप म्हणून महा-मंत्र, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे.