MR/Prabhupada 0387 - गौरंगेर दूति पद तात्पर्य भाग २



Purport to Gaurangera Duti Pada -- Los Angeles, January 6, 1969

गौरांगेर संगे-गणे, नित्य-सिद्ध बोलि माने. ज्याला समजले आहे की चैतन्य प्रभूंचे पार्षद, ते साधारण बद्ध जीव नाहीत… ते मुक्त आत्मा आहेत. नित्य-सिद्ध बोले मानी. तीन प्रकारचे भक्त आहेत. एक म्हणजे साधन-सिद्ध भक्त होय. साधन-सिद्ध म्हणजे भक्तिपूर्ण सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून, जर आपण परिपूर्ण बनलो, त्याला साधन-सिद्ध म्हणतात. दुसऱ्या भक्तांना कृपा-सिद्ध म्हणतात. कृपा-सिद्ध म्हणजे अगदी जरी त्याने नियामक तत्वांचे पालन कठोरपणे केले नाही, तरीही,आचार्यांच्या किंवा भक्तांच्या कृपेने, किंवा श्रीकृष्णांच्या. तो परिपूर्णतेच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. ते विशेष आहे.

आणि दुसऱ्या भक्तांना नित्य-सिद्ध म्हणतात. नित्य-सिद्ध म्हणजे ते कधीच दूषित झालेले नाहीत. साधन-सिद्ध आणि कृपा-सिद्ध भौतिक स्पर्शाने दूषित झाले, आणि नियामक तत्वांचे पालन करून. किंवा भक्त आणि आचार्यांच्या दयेने किंवा कृपेने, परिपूर्णतेच्या स्तरापर्यंत पोहोचतात. आणि नित्य-सिद्ध म्हणजे ते कधीच दूषित होत नाहीत. ते नेहमी मुक्त असतात. तर चेतन्य प्रभूंचे सर्व पार्षद, जसे अद्वैत प्रभू, श्रीनिवास, गदाधर, नित्यानंद, ते विष्णू-तत्व आहेत. ते सर्व मुक्त आहेत. फक्त ते नाहीत, गोस्वामी… असे इतर अनेक आहेत. तर ते नेहमी मुक्त आहेत. तर जो कोणी समजतो की चैतन्य प्रभूंचे पार्षद नेहमी मुक्त आहेत… नित्य-सिद्ध बले माने, सेई याय व्रजेंद्र सुत-पाश. ताबडतोब तो श्रीकृष्णांच्या निवासात प्रवेश करायला योग्य बनतो.

आणि मग ते म्हणतात, गौड-मंडल-भूमी, येबा जानि चिन्तामणी. गौर-मंडळचा अर्थ पश्चिम बंगालमधील स्थळ जिथे चैतन्य प्रभुनी त्यांच्या लीला केल्या. नवद्वीपमध्ये चैतन्य प्रभूंच्या जन्म दिवशी,भक्त जातात. चैतन्य प्रभूंच्या लिलांच्या निरनिराळ्या स्थळी प्रदक्षिणा करतात. त्याला नऊ दिवस लागतात. तर त्या बंगालच्या भागाला गौड-मंडल म्हणतात. तर नरोत्तम दास ठाकूर म्हणतात. जो कोणी समजू शकतो की काही फरक नाही, देशाच्या या भागात आणि वृंदावनमध्ये." तार हया व्रज-भूमी वास. "ते वृन्दावनमध्ये राहिल्या सारखेच आहे."

मग ते सांगतात, गौर-प्रेम रसार्णरवे. चैतन्य प्रभूंचे कार्य कृष्ण प्रेमाच्या लिलांच्या सागरासारखे आहे. म्हणून जो कोणी या सागरात डुबकी मारेल, गौर-प्रेम-रसार्णरवे, सेई तरंग येवा दुबे. ज्याप्रमाणे आपण एक डुबकी मारतो आणि अंघोळ करतो, आणि आपण खेळतो,समुद्राच्या किंवा महासागराच्या लाटांवर. त्याचप्रमाणे, जो चैतन्य प्रभूंच्या प्रेमाच्या वाटपामध्ये डुबकी घेण्यात आणि समुद्राच्या लाटांवर खेळण्यात आनंद घेतो. अशी व्यक्ती ताबडतोब भगवान श्रीकृष्ण यांची गोपनीय भक्त बनते. सई राधा-माधव-अंतरंग. अंतरंग म्हणजे साधारण भक्त नाही. ते गोपनीय भक्त आहेत.

नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, गृहे वा वनेते थाके. "असे भक्त, जे चैतन्य प्रभूंच्या आंदोलनाच्या लाटांमध्ये आनंद घेत आहेत," कारण तो भगवंतांचा खूप गोपनीय भक्त बनला आहे… म्हणून नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, असे भक्त, काही फरक पडत नाही, तो संन्यासी आहे किंवा गृहस्थ आहे." गृह गृहेचा अर्थ आहे गृहस्थ. तर चैतन्य महाप्रभूंचे आंदोलन असे सांगत नाही की आपण संन्यासी बनले पाहिजे, संन्यासी. ज्याप्रमाणे मायावादी संन्यासी, शंकराचार्य, ते पहिली हि अट घालतात. की "तुम्ही पहिले संन्यास घ्या, आणि मग आध्यात्मिक प्रगतीविषयी चर्चा करा." तर शंकर संप्रदायात कोणालाही प्रामाणिक मायावादी म्हणून स्वीकारले जात नाही. जोपर्यंत तो संन्यास स्वीकारत नाही.

इथे, चैतन्य आंदोलनात, अशा प्रकारचा प्रतिबंध नाही. अद्वैत प्रभू, ते गृहस्थ होते. नित्यानंद, ते गृहस्थ होते. गदाधर, ते देखील गृहस्थ होते. आणि श्रीवास, ते देखील गृहस्थ होते. आणि चैतन्य महाप्रभूंनी देखील दोनदा लग्न केले. तर त्यांनी काही फरक पडत नाही. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात की सन्यासी बनल्याने, किंवा गृहस्थ जीवनात राहिल्याने, काही फरक पडत नाही. जर त्यांनी वास्तविक चैतन्य संकीर्तन कार्यात भाग घेत असेल तर, आणि प्रत्यक्षात काय आहे ते समजून घेतले तर, तो अशाप्रकारच्या भक्ती सागरात खेळत असेल तर, मग अशी व्यक्ती नेहमी मुक्त आहे. आणि नरोत्तम दास ठाकूर त्यांच्या संगासाठी अधिकाधिक उत्सुक आहेत. हे या गाण्याचे सार आहे.