MR/Prabhupada 0397 - राधा कृष्ण बोल तात्पर्य



Purport to Radha-Krsna Bol

"राधा-कृष्ण" बोल बोल बोलो रे सोबाए हे गीत ठाकुर भक्तिविनोद यांनी गायले आहे. असे म्हटले आहे की चैतन्यप्रभू आणि नित्यानंद. ते नादिया शहराच्या रस्त्यावरून चालत आहेत, प्रत्येकास संबोधित करीत, या निर्देशांचा उच्चार करतात. ते सांगतात, "तुम्ही सर्व लोक, कृपया राधा-कृष्ण किंवा हरे कृष्णाचा जप करा." "राधा-कृष्ण" बोल बोल बोलो रे सोबाए "तुमच्यापैकी प्रत्येकजण, फक्त राधा-कृष्ण किंवा हरे कृष्णाचा जप करा." हि शिकवण आहे.. एइ शिखा दिया. चैतन्यप्रभू आणि नित्यानंद. दोघे बरोबर, रस्त्याने चालताना आणि नाचताना, ते आदेश देतात की "तुम्ही सर्वजण फक्त राधा-कृष्ण म्हणा."

एइ शिखा दिया सब नादिया. फिरचे नेचे गौर-निताई. फिरचे, फिरचे म्हणजे चालत. संपूर्ण नादिया शहरात ते हे शिकवत होते. एइ शिखा दिया सब नादिया. फिरचे नेचे गौर-निताई. मग ते सांगतात, केनो मायार बोशे, जाचो भेशे, "तुम्ही या भौतिक अज्ञानाच्या मायेच्या लाटांमध्ये का वाहून जात आहेत?" खाचो हाबुडुबु, "आणि संपूर्ण दिवस आणि रात्र, फक्त चिंतेमध्ये डुबले आहात, एखाद्या माणसासारखे, जेव्हा त्याला पाण्यात ढकलले जाते, काहीवेळा बुडतो, काहीवेळा वर येतो, पण तो खूप कठीण संघर्ष करीत असतो. त्याचप्रमाणे, मायेच्या सागरात, तुम्ही का एवढा संघर्ष करीत आहात? काहीवेळा बुडल्यामुळे. काहीवेळा वर आल्यामुळे, काहीवेळा आनंद अनुभवणे, काहीवेळा ख़ुशी नाही. वास्तविक,तिथे आनंद नाही. पाण्यामध्ये, जर तुम्हाला पाण्यात ढकलले, आणि जर तुम्ही कधीकधी बुडत असाल आणि कधीकधी वर येत असाल, त्याचा अर्थ आनंद नाही. तात्पुरते वर येऊन, काही वेळे पुरते, आणि परत बुडले जाणे त्यात आनंद नाही."

तर चैतन्य महाप्रभु सूचना देतात की "तुम्ही इतका त्रास का घेत आहात?" मायार बोशे, "मायेच्या आवरणाखाली?" मग काय केले पाहिजे? ते सांगतात की जीव कृष्ण-दास, ए विश्वास, "फक्त तूम्ही भगवंतांचे सेवक आहात यावर विश्वास ठेवा, तुम्ही कृष्णाचे सेवक आहात. जीव कृष्ण-दास, ए विश्वास, कोरले तोआर दुःख नाई, जेव्हा तुम्ही या मुद्द्यापर्यंत आलात की तुम्ही भगवंतांचे सेवक किंवा कृष्णाचे सेवक आहात, ताबडतोब तुमचे सर्व त्रास संपतील. आणखीन त्रास नाहीत." तर हे आदेश चैतन्य प्रभुंनी रस्त्याने चालताना दिले आहेत. जीव कृष्ण-दास, ए विश्वास, कोरले तोआर दुःख नाई,

मग भक्तिविनोद ठाकुर त्यांचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव देतात. ते सांगतात, जय सकल विपोद, "मी सर्वप्रकारच्या धोक्यांपासून मुक्त झालो." गाई भक्तिविनोद, भक्तिविनोद ठाकुर, ते आचार्य आहेत, ते अनुभवी आहेत, ते सांगतात की "जेव्हा केव्हा मी राधा-कृष्ण किंवा हरे-कृष्णाचा जप करतो, मी सर्वप्रकारच्या धोक्यातून मुक्त होतो." जय सकल विपोद जखोन अमी वो-नाम गाई, "जेव्हा केव्हा मी या पवित्र नामाचा जप करतो, हरे-कृष्ण किंवा राधा-कृष्ण ताबडतोब माझी सर्व संकटे दूर होतात." "राधा-कृष्ण" बोलो, संगे चलो. तर चैतन्य प्रभू म्हणून सांगतात, की, "मी रस्त्यावरून चालताना तुमच्याकडे याचना करीत आहे. ती याचना काय आहे? की तुम्ही फक्त जप करा. ती माझी विनंती आहे, याचना." "राधा-कृष्ण" बोलो, संग चलो. "आणि फक्त माझे अनुसरण करा." "राधा-कृष्ण" बोलो, संगे चलो, येई-मात्र भिक्षा चाई, मी केवळ हे योगदान मागत आहे. की तुम्ही हरे कृष्ण जप करा आणि माझे अनुसरण करा, जेणेकरून या भौतिक महासागरातील अस्तित्वाची तुमची लढाई थांबेल."