MR/Prabhupada 0398 - श्री कृष्ण चैतन्य प्रभु गीताचे तात्पर्य



Purport to Sri Krsna Caitanya Prabhu -- Los Angeles, January 11, 1969

श्री-कृष्ण-चैतन्य प्रभू दोया कोरो मोरे, तोमा बिना के दोयालु जगत-मायारे. हे गीत नरोत्तम दास ठाकुर यांनी रचले आहे. ते चैतन्य प्रभुंना प्रार्थना करतात की "माझ्या प्रेमळ भगवंता कृपया माझ्यावर कृपा करा, कारण या तिन्ही लोकात तुमच्यापेक्षा अधिक दयाळू कोण असू शकते?" वास्तविक हे सत्य आहे. केवळ नरोत्तम दास ठाकुर नाहीत, पण रूप गोस्वामी देखील, ते सुद्धा चैतन्य प्रभुंना प्रार्थना करतात जेव्हा ते दोघे प्रयाग, अलाहाबादला भेटले, प्रयाग येथील चैतन्य प्रभू आणि रूप गोस्वामी यांच्या पहिल्या भेटीत. त्यावेळी, श्रील रूप गोस्वामी देखील सांगतात, "माझ्या प्रेमळ भगवंता, तुम्ही सर्व अवतारांमध्ये सर्वात उदार आहात. कारण तुम्ही कृष्ण प्रेम कृष्णभावनामृत वाटत आहात." दुसऱ्या शब्दात, जेव्हा कृष्ण वैयक्तिकरित्या उपस्थित होते, त्यांनी आम्हाला आत्मसमर्पण करायला सांगितले, पण त्यांनी स्वतःला इतक्या सहज वितरित केले नाही. त्यांनी अट घातली की "सर्व प्रथम तुम्ही आत्मसमर्पण करा." पण इथे या अवतारात, चैतन्य प्रभू, जरी ते स्वतः कृष्ण आहेत, त्यांनी काही अट घातली नाही. त्यांनी फक्त वाटले, "कृष्ण प्रेम घ्या."

म्हणून चैतन्य प्रभुना सर्वात उदार अवतार मानले जाते, आणि नरोत्तम दास ठाकुर सांगतात की "कृपया माझ्यावर दया करा. तुम्ही खूप उदार आहात कारण तुम्ही या युगाच्या पतित आत्म्यांना पाहिले आहे, आणि तुम्ही त्यांच्यावर इतके दयाळू आहात. पण तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की मी सर्वात जास्त पतित आहे. माझ्यापेक्षा अधिक पतित कोणी नाही." पतित-पावन-हेतु तव अवतार. " तुमचा अवतार बद्ध जीव , पतित आत्म्यांना पुन्हा परत नेण्यासाठी झाला आहे. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की तुम्हाला माझ्यापेक्षा अधिक पतित सापडणार नाही. म्हणून माझा हक्क पहिला आहे." मग ते नित्यानंद प्रभुंना प्रार्थना करतात. ते सांगतात, हा हा प्रभु नित्यानंद, प्रेमानंद सुखी "माझ्या प्रेमळ नित्यानंद प्रभु, तुम्ही नेहमी आनंदी दिसता, आध्यात्मिक प्रमानंदात, आणि तुम्ही सतत खूप प्रसन्न दिसता. म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे कारण मी खूप दुःखी आहे. म्हणून जर तुमची कृपा दृष्टी माझ्यावर टाकलीत तर मी देखील सुखी बनेन.

मग ते अद्वैत प्रभुंना प्रार्थना करतात: हा हा प्रभू सीता-पती अद्वैत गोसाई अद्वैत प्रभूंच्या पत्नीचे नाव सीता होते. म्हणून त्याना काहीवेळा सीता-पती संबोधले जात असे. तर " माझ्या प्रिय अद्वैत प्रभू सीतेचा पती, कृपया तुम्ही देखील माझ्यावर दया करा, कारण जर तुम्ही माझ्यावर दया केली, तर स्वाभाविकरीत्या चैतन्य प्रभू आणि नित्यानंद प्रभू देखील माझ्यावर कृपा करती." कारण हे आहे की वास्तविक, अद्वैत प्रभुंनी चैतन्य प्रभुंना अवतार घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. जेव्हा अद्वैत प्रभुंनी पतित आत्म्यांना पहिले, ते सर्व केवळ इंद्रियतृप्ती करण्यात गुंतले आहेत. कृष्णभावनामृत समजण्याशिवाय, त्यांना खूप या पतित आत्म्याची दया वाटली. आणि त्यांना वाटले की या सर्व पतित आत्म्यांचा उद्धार करण्यास ते असमर्थ आहेत. म्हणून त्यांनी श्रीकृष्णाला प्रार्थना केली की तुम्ही स्वतः या. तुमच्या वयक्तिक उपस्थितीशिवाय, या पतित आत्म्यांचा उद्धार करणे शक्य नाही." तर त्यांच्या आमंत्रणाने चैतन्य प्रभुंनी "स्वाभाविकपणे…"

नरोत्तम दास ठाकुर अद्वैत प्रभुंना प्रार्थना करतात की "जर तुम्ही माझ्यावर दया केलीत, स्वाभाविकपणे चैतन्य प्रभू आणि नित्यानंद देखील माझ्यावर कृपा करतील." मग ते गोस्वामींना प्रार्थना करतात.हा हा स्वरूप सनातन, रूप रघुनाथ. "माझ्या प्रिय गोस्वामी प्रभु," स्वरूप. स्वरूप दामोदर चैतन्य प्रभुंचा वैयक्तिक सचिव होते. ते नेहमी चैतन्य महाप्रभूंबरोबर रहात होते. आणि जे काही त्यांना पाहिजे असेल, ते त्याची लगेच व्यवस्था करीत. दोन व्यक्तिगत सेवक, स्वरूप दामोदर आणि गोविंद, ते चैतन्य प्रभुंबरोबर नेहमी असत.

तर नरोत्तमदास ठाकुर स्वरूप दामोदर यांच्याकडे देखील प्रार्थना करीत आहेत. आणि मग गोस्वामी. भगवान चैतन्य यांचे पुढील शिष्य सहा गोस्वामी होते. श्री रूप, श्री सनातन, श्री भट्ट रघुनाथ, श्री गोपाल भट्ट गोस्वामी, जीव गोस्वामी, आणि रघुनाथदास गोस्वामी. या सहा गोस्वामींना भगवान चैतन्य यांनी या कृष्णभावनामृत चळवळीचा प्रसार करण्यासाठी थेट मार्गदर्शन केले होते नरोत्तमदास ठाकुर त्यांच्या दयेसाठीही प्रार्थना करीत आहेत. आणि सहा गोस्वामींनंतर, पुढचे आचार्य श्रीनिवास आचार्य होते. तर ते श्रीनिवास आचार्य त्यांच्याकडे देखील प्रार्थना करतात,

वास्तविक, नरोत्तमदास ठाकुर श्रीनिवास आचार्यांनंतर या परंपरेचे उत्तराधिकारी होते. किंवा जवळजवळ ते समकालीन होते. आणि त्याचे व्यक्तिगत मित्र रामचंद्र होते. रामचंद्र चक्रवर्ती. तर ते प्रार्थना करीत आहेत "मी नेहमी रामचंद्रच्या सहवासाची इच्छा आहे." भक्तांचा संग. सर्व प्रक्रिया हि आहे की आपण सतत वरिष्ठ आचार्यांच्या कृपेची प्रार्थना केली पाहिजे. आणि आपण शुद्ध भक्तांच्या संगात राहिले पाहिजे. मग आपल्याला कृष्णभवनामृतमध्ये प्रगती करायला, भगवान चैतन्य आणि श्रीकृष्ण यांची कृपा प्राप्त करणे सोपे होईल. हे नरोत्तमदास ठाकुर यांनी गायलेल्या गीताचे सार आहे.