MR/Prabhupada 0400 - श्री श्री शिक्षाष्टकं तात्पर्य



Purport to Sri Sri Siksastakam, CDV 15

चेतो-दर्पण-मार्जनं भव-महा-दावाग्नि-निर्वापणं
श्रेयः कैरव-चन्द्रिका-वितरणं विद्या-वधू जीवनम्,
आनंदाम्बुधि-वर्धनं प्रति-पदं पूर्णामृतास्वादनं
सर्वात्मस्नपनं परं विजयते श्रीकृष्ण-संकीर्तनम्

भगवान चैतन्य यांनी आपल्याला आठ श्लोकातून त्यांचे उद्दिष्ट दिले आहेत, त्यांना काय करायचे होते. . ते आठ कडव्यात स्पष्ट केले आहे, आणि ते शिक्षाष्टक म्हणून ओळखले जाते. शिक्षा म्हणजे सूचना, आणि अष्टक म्हणजे आठ. तर आठ श्लोकात त्यांनी त्यांच्या सूचना पूर्ण केल्या आहेत. आणि त्यांचे पुढचे शिष्य, सहा गोस्वामी, यांनी पुस्तकांच्या खंडांमध्ये समजावून सांगितले आहे. तर भगवान चैतन्य सांगतात विषय आहे परं विजयते श्रीकृष्ण-संकीर्तनम्: हरे कृष्ण मंत्राचा जप किंवा कृष्ण संकीर्तन चळवळीचा जय हो. जय हो. विजय हो. हा विजय कसा? त्यांनी समजावले आहे, की चेतो-दर्पण-मर्जनं

जर तुम्ही हरे कृष्ण मंत्राचा जप केला, तर तुमच्या हृदयात साठलेला मळ, भौतिक मलिनतेमुळे, साफ होईल. त्यांनी उदाहरण दिले आहे की हृदय आरशाप्रमाणे आहे. जर आरशावर धूळ साठली असेल, तर आपण आरशामध्ये खरा चेहरा पाहू शकत नाही. म्हणून, तो स्वच्छ असला पाहिजे. तर आपल्या वर्तमान बद्ध जीवनात, आपले हृदय इतके धुळीने माखले आहे की. जी प्राचीन काळापासून भौतिक संगामुळे साचली आहे म्हणून जर आपण हरे कृष्ण जप केला, तर धूळ निघून जाईल. अगदी लगेच नाही, ती निघायला सुरवात होईल आणि जशी हृदयाच्या आरशावरील धूळ स्वच्छ होते, ताबडतोब आपण चेहरा पाहू शकतो, तो काय आहे. चेहरा म्हणजे वास्तविक ओळख. हरे कृष्ण मंत्राचा जप करून, आपण समजू शकू की आपण हे शरीर नाही.

तो आपला गैरसमज आहे. धूळ म्हणजे गैरसमज, या शरीराला किंवा मनाला स्व समजणे. वास्तविक, आपण हे शरीर किंवा मन नाही. आपण आत्मा आहोत. तर जसे आपण समजतो की आपण हे शरीर नाही, ताबडतोब भाव-महा-दावाग्नि-निर्वापणं. भौतिक स्थितीची धगधगती आग, किंवा भौतिक दुःखाची धगधगती आग लगेच बुजते. आणखीन काही दुःख नाही. अहं ब्रह्मास्मि. भगवद् गीतेत सांगितले आहे, ब्रम्ह-भूतः प्रसन्नात्मा. लगेच आत्मा म्हणून आपली खरी ओळख आपल्याला समजते, तो आनंदी बनतो. आपण आनंदी नाही. आपल्या भौतिक संपर्कामुळे, आपण नेहमी चिंतायुक्त असतो. हरे कृष्ण मंत्राचा जप करुन, आपण लगेच आनंदी जीवनाच्या स्तरापर्यंत येतो.

भव-महा-दावाग्नि-निर्वापणं. आणि याला मुक्ती म्हणतात. जेव्हा आपण खुश होतो, सर्व चितांमधून मुक्त, ती स्थिती वास्तविक मुक्ती आहे. कारण प्रत्येक जीव, आत्मा स्वभावतः आनंदी आहे. अस्तित्वाचा संपूर्ण संघर्ष हा आहे की तो जीवनाच्या त्या आनंदी स्तराच्या शोधात आहे. म्हणून, आनंदी जीवनाच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला पराभूत केले जात आहे. आपण हरे कृष्ण जप केला तर हा सततचा पराभव लगेच दूर होऊ शकतो तो या दिव्य कंपनाचा प्रभाव आहे. आणि मुक्तीनंतर, आनंदी झाल्यावर, भौतिक सुख कमी होते. जे सुख तुम्ही उपभोगू इच्छिता, ते कमी होते, उदाहरणार्थ, खाताना. जर आपल्याला चांगले पदार्थ खायची इच्छा असेल, काही घास खाल्यावर आपल्याला आणखीन खावेसे वाटत नाही. त्याचा अर्थ या भौतिक जगात,जो काही आनंद आपण स्वकारतो, ती कमी होईल. . पण आध्यात्मिक आनंद,

भगवान चैतन्य सांगतात आनंदाम्बुधि-वर्धनं, आध्यात्मिक आनंद सागराप्रमाणे आहे. पण इथे भौतिक जगात, आपल्याला अनुभव आला आहे की सागर वाढत नाही. महासागर त्याच्या मर्यादेत राहतो. पण आध्यात्मिक आनंदाचा महासागर वाढतो.आनंदाम्बुधि-वर्धनं, श्रेयः कैरव-चन्द्रिका-वितरणं तो कसा वाढतो? ते उदाहरण देतात चंद्र, कलेकलेने वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे, जसे चंद्र नव्या चंद्राच्या दिवसापासून, नव्या चंद्राच्या रात्री पहिल्या दिवशी छोट्या तो गोलाकार रेषेप्रमाणे असतो. पण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, तो हळूहळू वाढत जातो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवन, आध्यात्मिक जीवनातील आनंद वाढत जातो चंद्राच्या किरणांप्रमाणे दिवसा मागून दिवस, प्रत्येक दिवशी, जोपर्यंत तो पौर्णिमेच्या रात्री पर्यंत पोचत नाही, होय.

तर चेतो-दर्पण-मार्जनं भव-महा-दावाग्नि-निर्वापणं, श्रेयः कैरव-चन्द्रिका-वितरणं विद्या-वधू जीवनम्, आणि मग जीवन पूर्ण ज्ञानमय होते कारण आध्यात्मिक जीवन म्हणजे. शाश्वत जीवन, आंनदाने आणि ज्ञानाने भरलेले. तर आपण आपल्या आनंदची मात्र वाढवतो कारण त्या प्रमाणात आपण आपल्या ज्ञानाची मात्र वाढवतो. श्रेयः कैरव-चन्द्रिका-वितरणं विद्या-वधू जीवनम्,आनंदाम्बुधि-वर्धनं ते सागराप्रमाणे आहे, पण ते तरीही वाढते. आनंदाम्बुधि-वर्धनं, सर्वात्मस्नपनं हे इतके चांगले आहे की एकदा का जीवनाच्या या स्थितीपर्यंत पोहोचल्यावर, आपण विचार करतो की "मी पूर्णपणे संतुष्ट आहे." सर्वात्मस्नपनं ज्याप्रमाणे एखाद्याने पाण्यात डुबकी मारून अंघोळ केली, त्याला लगेच ताजेतवाने वाटते. त्याचप्रमाणे, आध्यात्मिक जीवनात दिवसेंदिवस आनंद वाढतो, जाणवायला लागते की तो पूर्णपणे संतुष्ट आहे.