MR/Prabhupada 0399 - श्री नाम, गाये गौर मधुर स्वरे गीताचे तात्पर्य
Purport to Sri Nama, Gay Gaura Madhur Sware -- Los Angeles, June 20, 1972
गाय गौरचंद मधु स्वरे. हे गीत भक्तिविनोद ठाकुर यांनी गायले आहे. ते सांगतात की भगवान चैतन्य, गौर, गौर म्हणजे भगवान चैतन्य, गौरसुंदर, उजळ रंग. गाय गौरचंद मधुर स्वरे. गोड आवाजात, ते महामंत्र गात आहेत, हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. ते खूप गोड आवाजात गात आहे, आणि आपले कर्तव्य आहे की आपण महामंत्र गाण्यासाठी त्यांचे अनुसरण केले पाहिजे. तर भक्तिविनोद ठाकुर सल्ला देतात, गृहे थाको, वने थाको, सदा हरी बोले दाको गृहे थाको म्हणजे एकतर तुम्ही गृहस्थ म्हणून तुमच्या घरात राहा, किंवा तुम्ही वनात राहा संन्यासी म्हणून, त्यांनी काही फरक पडत नाही, पण तुम्ही महामंत्र, हरे कृष्णाचा जप केला पाहिजे.
गृहे वने थाको, सदा हरी बोले दाको. सतत या महमंत्राचा जप करा. सुखे दुःखे भुले नाको, "सुखात किंवा दुःखात जप करायला विसरू नका." वदने हरी-नाम कोरो रे. जपाच्या बाबतीत बोलायचे झाले तर तिथे काही नियंत्रण नाही, कारण कोणत्याही अवस्थेत असलो तरी, मी महमंत्राचा जप करु शकतो. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे. तर भक्तिविनोद ठाकुर सल्ला देतात, "काही हरकत नाही, तुम्ही दुःखात असाल किंवा सुखात, पण तुम्ही महामंत्राचा जप केला पाहिजे."
माया-जले बद्ध होये, आचो मिचे काज लोये. तुम्ही भ्रामक शक्तीच्या जाळ्यात अडकत आहात. माया-जाले बद्ध होये, ज्याप्रमाणे कोळी पकडतो, समुद्रातून, सर्वप्रकारच्या जीवांना आपल्या जाळ्यात. त्याचप्रमाणे आपण देखील भ्रामक शक्तीच्या जाळ्यात अडकले आहोत, आणि कारण आपल्याला स्वातंत्र नाही, म्हणून आपली सर्व कार्ये निरर्थक आहेत. स्वातंत्र्यात कृतीला काही अर्थ आहे, परंतु जेव्हा आपण स्वतंत्रच नाही. मायेच्या तावडीत, मायेच्या जाळ्यात, मग आपल्या तथाकथित स्वातंत्र्याला काही किंमत नाही. म्हणून, आपण जे काही करतो, ती केवळ हार आहे. आपल्या वास्तविक स्थितीला न जाणता, जर तुम्हाला काही करण्यास भाग पाडले जाते. भ्रामक शक्तीच्या दबावाने, तो केवळ वेळचा अपव्यय आहे.
म्हणून भक्तिविनोद ठाकुर सांगतात, "आता तुम्हाला मनुष्य जीवनात पूर्ण चेतना मिळाली आहे. तर फक्त हरे कृष्ण,राधा-माधव जप करा, हि सर्व नावे. त्यात काही तोटा नाही, पण खूप फायदा आहे." जीवन होईलो शेष, ना भजिले हृषिकेश आता हळूहळू प्रत्येकजण मृत्यूच्या दारात उभा आहे, कोणीही म्हणू शकत नाही की, "मी राहीन, मी अजून शंभर वर्षे जिवंत राहीन." नाही, कोणत्याही क्षणी आपल्याला मरण येऊ शकते. म्हणून, ते सल्ला देतात जीवन होईलो शेष: आपल्या जीवनाचा कोणत्याही क्षणी अंत होऊ शकतो, आणि आपण हृषिकेश, श्रीकृष्णाची सेवा करू शकत नाही, भक्तिविनोदोपदेश म्हणून भक्तिविनोद ठाकुर सल्ला देतात, एकबार नाम-रस मातो रे: "कृपया मुग्ध व्हा, नाम-रस, दिव्य नावाच्या नाम-रसाच्या जपात. या समुद्रात तुम्ही डुबकी मारा, ती माझी विनंती आहे."