MR/Prabhupada 0409 - भगवद् गीतेचा चुकीचा अर्थ लावण्याचा काही प्रश्नच नाही



Cornerstone Laying -- Bombay, January 23, 1975

म्हणून मिशन खूपच अधिकृत आहे, आणि ते क्रियाकलापांच्या एका मोठ्या अधिकार क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणून माझी विंनती आहे की मुबईतील रहिवासी, खासकरून जे आमचे सदस्य आहेत. ते मुंबईत हि संस्था कशी यशस्वी करायची यासाठी सक्रिय भाग घेतील. तर अनेक महिला आणि पुरुष इथे जमले आहेत. आम्ही आहोत, जे काही आम्ही करीत आहोत ते विचित्र किंवा मानसिक बनावट गोष्ट नाही. ती अधिकृत आहे आणि भगवद् गीतेच्या स्तरावर आमचे वर्तमान आंदोलन भगवद् गीतेवर आधारित आहे - भगवद्-गीता जशी आहे तशी. आम्ही चुकीचा अर्थ लावत नाही.

आम्ही मूर्खपणें चुकीचा अर्थ लावत नाही, कारण… मी हेतुपूर्वक "मूर्खपणे" हा शब्द म्हटला, का आम्ही कृष्णांच्या शब्दात बदल करू? मी कृष्णापेक्षा श्रेष्ठ आहे? किंवा कृष्णाने काही भाग माझ्याद्वारे बदल करून स्पष्ट करण्यासाठी ठेवला आहे. मग श्रीकृष्णाचे महत्व काय आहे? जर मी माझी स्वतःची मते मांडली, स्वतःला श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ मानून, तर ती ईश्वराची निंदा आहे. मी कसा श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ बनेन? जर खरोखरच आपण या भगवद् गीतेचा फायदा घेऊ इच्छित असल्यास, तर आपण भगवद् गीता जशी आहे तशी स्वीकारली पाहिजे. ज्याप्रमाणे अर्जुनाने स्वीकारली. अर्जुन, भगवद् गीता ऐकल्यावर, तो म्हणाला, सर्वम एतम् कृतं मन्ये: "माझ्या प्रिय केशव जे काही तुम्ही सांगितले ते सर्व शब्द मी स्वीकारतो, मी त्यांना कोणत्याही बदलाशिवाय स्वीकारतो." हि भगवद् गीतेची समज आहे, असे नाही की मी भगवद् गीतेचा फायदा घेतो आणि मी मूर्खपणे त्याचा चुकीचा अर्थ लावतो. जेणे करून लोक माझे तत्वज्ञान स्वीकारतील. हि भगवद् गीता नाही. भगवद् गीतेचा चुकीचा अर्थ लावण्याचा काही प्रश्नच नाही. चुकीचा अर्थ लावण्याला अनुमती आहे जेव्हा तुम्ही काही समजू शकत नाही. जेव्हा गोष्टी स्पष्टपणे समजतात… "हा मायक्रोफोन आहे." प्रत्येकजण समजेल हा मायक्रोफोन आहे. याच्यात चुकीचा अर्थ लावण्याची काय गरज आहे? त्याची गरज नाही. हा मूर्खपणा आहे, हि मूर्खपणा आहे, भ्रम.

भगवद् गीतेमध्ये काहीही बदल करू शकत नाही. हे आहे… सर्वकाही स्पष्ट आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण म्हणतात… श्रीकृष्ण म्हणत नाहीत की " तुम्ही सर्व संन्यासी बना आणि तुमच्या व्यावसायिक कर्तव्यांचा त्याग करा. नाही. कृष्ण सांगतात, स्व-कर्मणा तम् अभ्यर्च्य संसिद्धी: लभते नरः (भ.गी. १८.४६) तुम्ही तुमची कार्य करत रहा. तुम्ही तुमचा व्यवसाय करीत रहा बदल करण्याची गरज नाही. परंतु तरीही, तुम्ही कृष्णभावनामृत बनू शकता आणि तुमचे जीवन यशस्वी बनवू शकता. हा भगवद् गीतेचा संदेश आहे. भगवद् गीता सामाजिक व्यवस्था किंवा आध्यात्मिक आदेश अस्था-व्यस्त करणार नाही. नाही. अधिकाऱ्यांनुसार प्रमाणित केली पाहिजे आणि सर्वोत्तम अधिकारी कृष्ण आहे.

तर तुम्ही महिला आणि सज्जन हे मुंबईचे केंद्र यशस्वी बनवा, आपल्याला खूप छान जागा मिळाली आहे.आम्ही निर्माण करीत आहोत जेणे करून तुम्ही इथे येऊन राहू शकता, कमीतकमी आठवड्याच्या शेवटी. जर तुम्ही राहिलात, सर्व जे निवृत्त झालेत किंवा वृद्ध सज्जन, स्त्रिया, ते इथे येऊन राहू शकतात. आमच्याकडे पुरेशी जागा असेल. परंतु जगभर भगवद् गीतेच्या तत्वांचे संघटन करण्याचा प्रयत्न करा. ती भारताची भेटवस्तू असेल. चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती की ज्याने कोणी भारतात जन्म घेतला आहे, मनुष्याच्या रूपात, मांजर, कुत्रा नाही… कुत्री आणि मांजर दुसऱ्यांचे भले करण्याच्या बाबतीत कसलाही सहभाग घेऊ शकत नाहीत. त्यांनी सांगितले,

भारत-भूमी मनुष्य-जन्म हइल यार
जन्म सार्थक करी कर पर-उपकार
(चैतन्य चरितामृत अादि ९.४१)

"ज्या कोणी भारतात, भारत भूमीमध्ये मनुष्याच्या रूपात जन्म घेतला असेल, सर्व प्रथम आपले जीवन यशस्वी बनवावे." कारण तुमच्याकडे स्तर आहे जीवन यशस्वी बनवण्यासाठी. इथे भगवद् गीता आहे. समजण्याचा प्रयत्न करा, तुमचे जीवन यशस्वी बनवा, आणि मग हा संदेश जगभर प्रसारित करा. तो परोपकार आहे. तर वास्तवात, भारत आणि भारतीय लोक परोपकारासाठी आहेत. इतरांचे शोषण करण्यासाठी आम्ही बनलो नाही ते आमचे लक्ष्य नाही. प्रत्यक्षात असे घडत आहे.

प्रत्येकजण भारता बाहेर जात आहेत. ते शोषण करण्यासाठी तिथे जातात. परंतु भारत पहिल्यांदाच काहीतरी बाहेरच्यांना देत आहे, हे आध्यात्मिक ज्ञान. आणि पुरावा तुम्ही पाहू शकता. आम्ही देत आहोत, आम्ही घेत नाही. आम्ही भीक मागण्यासाठी जात नाही, "मला गहू द्या, मला पैसे द्या, मला हे द्या, मला ते द्या." नाही. आम्ही काही महत्वाचे देत आहोत, त्यांना उपकृत झाल्यासारखे वाटत आहे. नाहीतर, का हि तरुण मुले आणि मुली, ते कृष्णभावनामृत स्वीकारत आहेत? त्यांना काहीतरी वाटतंय, की त्यांना काहीतरी ठोस मिळत आहे. तर त्यामध्ये सामर्थ्य आहे, खूप चांगली शक्ती. त्यांना अमेरिकन किंवा कॅनेडिअन किंवा ऑस्ट्रेलियन सारखे वाटत नाही. आपल्यालाही भारतीयांसारखे वाटत नाही. आध्यात्मिक स्तरावर आपण एक आहोत.

विद्या-विनय-संपन्ने
ब्राम्हणे गवि हस्तिनी
शुनि चैव स्व-पाके च
पंडिताः सम-दर्शिनः
(भ.गी. ५.१८)

हे वास्तविक शिक्षण आहे. आत्मवत सर्व-भुतेषु. अगदी महान राजकारणी, चाणक्य पंडित, त्यांनी सांगितले, मातृवत पर-दारेषु पर-द्रव्येषु लोष्ट्रवत आत्मवत सर्व-भुतेषु यः पश्यति स पंडितः तर हि महान संस्कृती आहे, भगवद् गीता जशी आहे तशी. तर ज्या जबाबदार महिला आणि सज्जन इथे उपस्थित आहेत, हे केंद्र खूप यशस्वी बनवा आणि इथे या. भगवद् गीता जशी आहे तशी तिचा अभ्यास करा कोणत्याही मूर्खपणाशिवाय चुकीचा अर्थ न लावता. मी पुन्हा पुन्हा मूर्ख म्हणतोय कारण अर्थ बदलण्याची काही गरज नाही. सुरवातीपासूनच सर्व काही स्पष्ट आहे.

धर्म-क्षेत्रे कुरु-क्षेत्रे
समवेता युयुत्स्वः
मामकाः पांडवाश्चैव
किम कुर्वत संजय
(भ.गी. १.१) ।

इतके स्पष्ट.