MR/Prabhupada 0410 - आमचे मित्र, त्यानी आधीपासूनच भाषांतर करायला सुरवात केली आहे



Cornerstone Laying -- Bombay, January 23, 1975

कुरुक्षेत्र अजूनही धर्म-क्षेत्र आहे. वेदांमध्ये असे सांगितले आहे, कुरुक्षेत्रे धर्मम आचरेत: "आपण करुक्षेत्राला गेले पाहिजे आणि धार्मिक विधी केले पाहिजेत." म्हणून ते प्राचीन काळापासून धर्म-क्षेत्र आहे आणि आपण चुकीचा अर्थ का लावायचा की "हे कुरुक्षेत्र म्हणजे शरीर, धर्मक्षेत्र, हे शरीर आहे?" का? लोकांची दिशाभूल का करायची? हि दिशाभूल थाबवा. आणि कुरुक्षेत्र अजूनही तिथे आहे. कुरुक्षेत्र स्थानक, रेल्वे स्थानक, तिथे आहे. तर भगवद् गीता जशी आहे तशी समजण्याचा प्रयत्न करा, तुमचे आयुष्य यशस्वी बनवा, आणि हा संदेश जगभर पसरवा करा. तुम्ही आनंदी व्हाल, जग आनंदी होईल. अर्थात, मी आता खूप वृद्ध माणूस आहे. मी ऐशी वर्षांचा आहे. माझे आयुष्य संपले आहे. पण मला हवे आहेत जबाबदार भारतीय आणि एकत्र इतर देशांबरोबर… इतर देश, ते चांगले सहकार्य देत आहेत. नाहीतर, एवढ्या थोड्या काळात प्रसार करणे माझ्यासाठी शक्य नव्हते फक्त सात किंवा आठ वर्षात,जगभर या पंथाचा प्रचार करणे.

म्हणून मला भारतीयांचे सहकार्य पाहिजे, विशेषतः तरुण माणसे, शिकलेली माणसे. पुढे या. आमच्याबरोबर रहा. भगवद्-गीतेचा अभ्यास करा. आम्हाला काहीही निर्माण करायचे नाही. निर्माण करण्यासारखे काही नाही. आणि आम्ही काय तयार करू शकतो? आपण सर्व अपूर्ण आहोत. जे काही आहे, आम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि व्यावहारिक जीवनात लागू करायचे आहे. आणि जगभर हा संदेश पसरवायचा आहे. हे आमचे कार्य आहे. तर आज शुभ दिवस आहे. खूप अडचणीसह आम्हाला मंजुरी मिळाली आहे. आता कृपया या प्रयत्नास सहकार्य द्या जितके शक्य आहे तितके तुमच्या प्राणैर अर्थैर धिया वाचा चार गोष्टी: तुमच्या जीवनाद्वारे, तुमच्या शब्दाद्वारे तुमच्या पैशाद्वारे… प्राणैर अर्थैर धिया वाचा श्रेय-आचरणम सदा. हे मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट आहे.

जे काही तुम्हाला मिळाले आहे… असे नाही की " कारण मी गरीब माणूस आहे, मी या आंदोलनाला मदत करू शकत नाही." नाही. जर तुम्हाला मिळाले आहे… तुम्हाला तुमचे आयुष्य मिळाले आहे. तर तुम्ही तुमचे आयुष्य अमर्पित केलेत, ते योग्य आहे. जर तुम्ही तुमचे आयुष्य समर्पित करू शकत नसाल, काही देणगी द्या. पण जर तुम्ही करू शकत असाल… गरीब माणूस, तुम्ही देणगी देऊ शकत नाही, ते मग तुम्ही आपली बुद्धिमत्ता द्या. आणि जर तुम्ही मूर्ख असाल, तर तुमचे शब्द द्या तर कोणत्याही प्रकारे, तुम्ही या आंदोलनाला मदत करू शकता, आणि कल्याणकारी कार्य करा, भारतासाठी आणि भारता बाहेर. तर हि माझी विनंती आहे. मी तुमचे स्वागत करतो. अर्थात, आज एकादशी आहे,आपण बहुतेक जण उपास करीत आहोत. काही प्रसाद दिला जाईल. तर प्रश्न प्रसादाचा नाही. प्रश्न आहे आम्ही हातात घेतलेले महत्वाच्या कामाचा, कसे भगवत भावनामृत आंदोलनाचा प्रसार करायचा. नाहीतर, तुम्ही कधीही सुखी होऊ शकणार नाही. फक्त भौतिक भावना, गृह-क्षेत्र… अतो गृह-क्षेत्र-सुताप्त-वित्तैर्जनस्य मोहो अयं अहं ममेति(श्रीमद भागवतम ५.५.८) |

भौतिक संस्कृती म्हणजे लैगिक इच्छा. स्त्रिया पुरुषाची शिकार करतात; पुरुष स्त्रियांची शिकार करतात. पुंसः स्त्रिया मिथुनी-भवम येतं त्योर मिथो:. आणि जसे ते एकत्र येतात तसे त्यांना गृह, घराची आवश्यकता असते; गृह-क्षेत्र, जमीन; गृह-क्षेत्र-सुत, मुले, मित्र, पैसा; आणि मोहो, माया, अहं ममेति (श्रीमद भागवतम ५.५.८),"हे माझे आहे." हि भौतिक संस्कृती आहे, परंतु मनुष्य जीवन यासाठी नाही. नायं देहो देह-भाजां नृलोके कष्टान कामान अर्हते विद-भुजां ये (श्रीमद भागवतम ५.५.८) | तर तुम्ही अभ्यास करा. आमच्यकडे आता पुरेशी पुस्तके आहेत. आमच्या पुस्तकांचा अभ्यास करायला काही अडचण नाही. आम्ही इंग्रजी भाषांतर दिले आहे. प्रत्येकजण, कोणीही सज्जन जो इंग्रजी जाणतो.आणि आम्ही हिंदीमध्ये, गुजराथीमध्ये, आणि इतर भाषांमध्ये देणार आहोत. आमचे मित्र, त्यांनी आधीपासूनच भाषांतर करायला सुरुवात केली आहे.

तर ज्ञानाची कमतरता असणार नाही. कृपया कमीतकमी आठवड्यातून एकदा इथे येऊन बसा, या सर्व पुस्तकांचा अभ्यास करा, जीवनाचे तत्वज्ञान समजण्याचा प्रयत्न करा, आणि जगभर प्रसार करा. हे भारतवर्षाचे मिशन आहे. भारत-भूमी मनुष्य-जन्म हैल यार जन्म सार्थक करी कर पर-उपकार (चैतन्य चरितामृत आदि ९.४१) हे परोपकार आंदोलन, इतरांचे कल्याण करण्यासाठी, कुत्रा मांजरांप्रमाणे नाही, फक्त पैसे आणायचे आणि इंद्रियतृप्ती करायची. हे मनुष्य जीवन नाही. मनुष्य जीवन परोपकार करण्यासाठी आहे. लोक अज्ञानी आहेत, भगवंतांबद्दल काही माहिती असल्याशिवाय, जीवनाविषयी काही कल्पना असल्याशिवाय. ते फक्त कुत्री आणि मांजर आणि डुकरांप्रमाणे काम करीत आहेत. म्हणून त्यांना शिक्षित केले पाहिजे. मनुष्य जीवन असे शिक्षण मिळण्यासाठी संधी आहे तर हे मानवी समाजाला शिक्षित करण्याचे केंद्र आहे,वास्तवात मनुष्य बनण्यासाठी, आणि त्याचे आयुष्य यशस्वी बनवण्यासाठी.

खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.