MR/Prabhupada 0411 - त्यांनी एक भव्य ट्रक निर्माण केला आहे: "गट, गट, गट, गट, गट"



Departure Lecture -- Mexico City, February 18, 1975

आम्ही आमचे घर आणि वडिल याना सोडले, आणि आम्ही या पतित भौतिक जगात आहोत, आणि आम्ही खूप दुःखी आहोत. (हृदयानंद यानी स्पॅनिश भाषांतर केले.) हे स्वातंत्र्यासाठी घर सोडणाऱ्या एका श्रीमंत माणसाच्या मुलाप्रमाणेच आहे, आणि जगभर भटकून, विनाकारण त्रास सहन करीत आहे. (स्पॅनिश) एका श्रीमंत माणसाच्या मुलाला काहीच करण्यासारखे नाही. त्याच्या वडिलांची मालमत्ता त्याच्या आरामदायी आयुष्यासाठी पुरेशी आहे. (स्पॅनिश) तरी, जसे पाश्चिमात्य देशांतील उदाहरणे सापडतात, अनेक श्रीमंत माणसांची मुले हिप्पी बनतात, घर सोडतात आणि अनावश्यक त्रास सहन करतात. (स्पॅनिश) आमची स्थिती, आमच्या गरजा, आपण सर्व जीव जे या भौतिक जगात आहोत, अगदी त्यासारखेच आहे. (स्पॅनिश) आपण स्वेच्छेने या भौतिक जगात इंद्रियतृप्तीसाठी येतो. (स्पॅनिश) आणि इंद्रियतृप्ती करताना आपण आपल्या परम पिता, भगवंतांना विसरलो आहोत. (स्पॅनिश) भौतिक निसर्गाचे कर्तव्य आहे की आमच्या जीवनात फक्त दुःख देणे (स्पॅनिश) कृष्ण भुलीय जीव भोग वांछा करे पाशते माया तारे जापतिया धरे म्हणजे जेव्हा जीव भगवंतांशिवाय, श्रीकृष्णांशिवाय आनंदाचा उपभोग घेऊ इच्छितो. ताबडतोब तो मायेच्या जाळ्यामध्ये अडकतो. (स्पॅनिश) हि आपली स्थिती आहे.

आपण मायेच्या नियंत्रणाखाली आहोत. आणि आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकतो, जसे भगवद् गीतेमध्ये सांगितले आहे. (भ.गी. ७.१४), मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरंन्ति: "जो कोणी मला शरण येतो तो मायेचे नियंत्रणातून बाहेर पडतो." (स्पॅनिश) म्हणून, आपण सर्व जगभर कृष्णभावनामृत किंवा भगवद भावनेचा प्रचार करीत आहोत. आणि त्यांना शिकवतो कसे श्रीकृष्णांना शरण जायचे. आणि अशाप्रकारे मायेच्या जाळ्यातून पडायचे आहे. (स्पॅनिश) आम्हाला याच्याशिवाय कोणतीही इच्छा किंवा महत्वाकांक्षा नाही, (स्पॅनिश) आम्ही स्पष्टपणे सांगतो, "इथे देव आहे. तुम्ही त्याला शरण जा. तुम्ही सतत त्याचा विचार करा, त्याला नमस्कार करा. मग तुमचे आयुष्य यशस्वी होईल." (स्पॅनिश) पण सर्वसाधारण लोक, ते वास्तवात वेडे आहेत. (स्पॅनिश) केवळ इंद्रियतृप्तीसाठी, ते दिवस रात्र इतके कष्ट करीत आहेत. म्हणून भक्तांना त्यांची दुर्दशा पाहून खूप वाईट वाटते. (स्पॅनिश)

प्रल्हाद महाराज सांगतात की "मला या लोकांबद्दल फार वाईट वाटते " ते कोण आहेत? ततो विमुख-चेतस माया सुखाय भरम उद्वहतो विमुधान (श्रीमद भागवतम ७.९.४३) | हे दुष्ट, विमुधान, त्यांनी सांस्कृती निर्माण केली आहे, भव्य सभ्यता. ते काय आहे? जसे तुमच्या देशात विशेषतः, साफसफाई करीत एक भव्य ट्रक. काम आहे साफसफाई, आणि त्याच्यासाठी त्यांनी भव्य ट्रक निर्माण केला आहे: "गट गट, गट,गट,गट,गट,गट,". (स्पॅनिश) स्वच्छता हाताने देखील करता येऊ शकते. एवढी माणसे आहेत. पण ती रस्त्यात भटकत आहेत, आणि स्वच्छतेसाठी मोठा ट्रक आवश्यक आहे. (स्पॅनिश) तो प्रचंड आवाज निर्माण करतो, आणि खूप धोकादायक देखील आहे. पण ते विचार करतात, "हि संस्कृतीची प्रगती आहे". (स्पॅनिश) म्हणून प्रल्हाद महाराज सांगतात, माया-सुखाय. फक्त स्वच्छता करण्याचा त्रास कमी करण्यासाठी - काही आराम नाही, त्याना इतर त्रास आहेत. पण ते विचार करीत आहेत, "आता आम्हाला साफसफाई करावी लागत नाही. एक मोठी मदत आहे". (स्पॅनिश)

त्याचप्रमाणे, दाढी करण्यासाठी एक साधा वस्तरा वापरता येऊ शकतो, आणि त्यांच्याकडे अनेक यंत्रे आहेत. (स्पॅनिश) आणि यंत्रे तयार करण्यासाठी, अनेक कारखाने. (स्पॅनिश) तर अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला, एकेका वस्तूचा, अशा प्रकारच्या संस्कृतीला राक्षसी संस्कृती म्हणतात. (स्पॅनिश) उग्र-कर्म. उग्र-कर्म म्हणजे क्रूर कृत्ये. (स्पॅनिश) तर भौतिक सुखसोयींसाठी कोणताही आक्षेप नाही, परंतु प्रत्यक्षात आपण पहिले पाहिजे नक्की त्या सोयी आहेत का दुःखी स्थिती आहे. (स्पॅनिश) म्हणून आपला मनुष्य जन्म वेळ वाचवून आपली कृष्ण भावना विकसित करण्यासाठी आहे. (स्पॅनिश) हे अनावश्यकपणे वाया घालवण्यासाठी नाही. (स्पॅनिश) कारण आपल्याला माहित नाही पुढील मृत्यू कधी आहे. (स्पॅनिश) आणि जर आपण स्वतःला पुढील आयुष्यासाठी तयार केले नाही. तर कोणत्याही क्षणी आपला मृत्यू होऊ शकतो. आणि आपल्याला भौतिक प्रकृतीद्वारे दिलेले शरीर स्वीकारावे लागेल. (स्पॅनिश) म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व जे या कृष्णभावनामृत आंदोलनात सामील झाले आहेत, सावधगिरीने जगा म्हणजे माया तुम्हाला कृष्णाच्या हातातून हिसकावून घेणार नाही. (स्पॅनिश) आपण केवळ नियामक तत्वांचे अनुसरण करून स्वतःला स्थिर ठेऊ शकतो. आणि कमीतकमी सोळा माळा जप करून. मग आपण सुरक्षित आहोत. (स्पॅनिश)

तर तुम्हाला परिपूर्ण जीवनाबद्दल काही माहिती मिळाली आहे. तीचा दुरुपयोग करू नका. स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा, आणि तुमचे आयुष्य यशस्वी होईल. (स्पॅनिश) हि चळवळ आरामदायी जीवनातील काही थांबवत नाही. पण ते नियमित करते. (स्पॅनिश) म्हणून आम्ही नियामक तत्वांचे अनुसरण करतो आणि सोळा माळा जप करतो, तर आमची स्थिती सुरक्षित आहे. (स्पॅनिश) मला वाटते या सूचनांचे तुम्ही अनुसरण कराल. ती माझी इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. (स्पॅनिश)

भक्त: जय! जय!