MR/Prabhupada 0415 - सहा महिनांच्या आत तू भगवान बनशील, मूर्ख निष्कर्ष
Lecture & Initiation -- Seattle, October 20, 1968
तर या युगात आयुष्याचा कालावधी खूपच अनिश्चित आहे. कोणत्याही क्षणी आपण मरु शकतो. पण हे आयुष्य, हे मानवी जीवन, उदात्त लाभासाठी आहे. ते काय आहे? आपल्या आयुष्याच्या दयनीय स्थितीचे कायमचे समाधान करण्यासाठी. यात… जोपर्यंत आपण या भौतिक रूपात आहोत, हे शरीर, आपल्याला एका शरीरातून दुसऱ्या शरीरात बदल करावा लागेल, एका शरीरातून दुसऱ्या. जन्म-मृत्यू-जरा-व्याधी (भ.गी. १३.९) पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. आत्मा अमर आहे, शाश्वत, पण बदल, ज्याप्रमाणे तुम्ही वस्त्रे बदलता. तर या समस्या ते विचारात घेत नाहीत, पण हि समस्या आहे. मनुष्य जीवन या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आहे, पण त्यांच्याकडे ज्ञान नाही किंवा ते या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गंभीर नाहीत. तर कालावधी, जर तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभले, तर संधी आहे तुम्हाला कोणीतरी भेटेल, तुम्हाला चांगली संगत मिळू शकेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्याचे समाधान करू शकाल. पण ते देखील आता शक्य नाही कारण आपल्या आयुष्याचा कालावधी खूप कमी आहे.
प्रायेण अल्पायुष्य सभ्य कलावस्मिन् युगे जनाः मन्दाः आणि अगदी जो आयुष्याचा कालावधी आपल्याला मिळाला आहे, आपण त्याचा योग्यरीत्या उपयोग करीत नाही. आपण या आयुष्याचा उपयोग जनावरांप्रमाणे करीत आहोत, फक्त आहार, निद्रा, भय आणि मैथुन. एवढेच. या युगात, जर कोणी पोटभर जेवला, तर तो विचार करतो, "ओह, माझे दिवसाचे कार्य संपले." जर कोणी पत्नी आणि दोन किंवा तीन मुलांचे पालन करू शकला, त्याला एक खूप मोठा माणूस समजले जाते. तो एका कुटुंबाचे पालन करीत आहे. कारण विशेषकरून ते कुटूंबाशिवाय, जबाबदारीशिवाय आहेत. हे या युगाचे लक्षण आहे. म्हणून जरी अगदी आपल्याला कमी आयुष्य मिळाले आहे, आपण फार गंभीर नाही.
मन्दाः, खूप हळू. ज्याप्रमाणे इथे, आपण कृष्णभावनामृत आंदोलनाचा प्रचार करीत आहोत. कोणीही गंभीर नाही शिकण्यासाठी किंवा जाणण्यासाठी हे आंदोलन काय आहे. आणि जर एखाद्याला स्वारस्य असेल, त्याला फसण्याची इच्छा आहे. त्यांना काहीतरी स्वस्त पाहिजे असते आत्मसाक्षारासाठी. त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांना कोणालातरी मोबदला द्यायची इच्छा आहे, आणि जर तो म्हणाला की "मी" तुला काही मंत्र देतो आणि तू , पंधरा मिनिटे ध्यान कर, सहा महिन्याच्या आत तू भगवान बनशील," या गोष्टी त्यांना हव्या आहेत. मन्दाः मन्द-मतयो. मन्दा-मतयो म्हणजे मूर्ख निष्कर्ष. ते विचार करीत नाही की "आयुष्याच्या समस्यांवर उपाय, फक्त पस्तीस डॉलर देऊन विकत घेऊ शकतो का?" ते इतके मूर्ख बनले आहेत. कारण जर आम्ही म्हटले की तुमच्या आयुष्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्ही या तत्वांचे पालन केले पाहिजे, "ओह, हे खूप कठीण आहे. मला पस्तीस डॉलर देऊ द्या आणि उपाय मिळेल." तुम्ही बघताच?
तर त्यांना फसवले जाण्याची इच्छा आहे. त्यांना मंद-मतयो म्हणतात. फसवणारे येतात आणि त्यांना फसवतात. मन्दाः सुमंद-मतयो मंद-भाग्या (श्रीमद भागवतम १.१.१०) ।मंद-भाग्या म्हणजे ते दुर्दैवी देखील आहेत. जरी भगवंत येतात आणि स्वतःचा प्रचार करतात, "कृपया माझ्याकडे या." ओह, ते त्याचीही पर्वा करीत नाहीत. तुम्ही बघताच? म्हणून दुर्दैवी. जर कोणी आले आणि तुम्हाला दहा लाख डॉलर देतो म्हणाला, जर तुम्ही म्हणालात, "मला आवडत नाही." तर तुम्ही दुर्दैवी नाही? तर चैतन्य महाप्रभु सांगतात की
- हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम
- कलौ नास्त्ये एव नास्त्ये एव नास्त्ये एव गतिर अन्यथा
- (चैतन्य चरितामृत अादि १७.२१)
"आत्मसाक्षात्कारासाठी तुम्ही केवळ हरे कृष्ण जप करा आणि परिणाम बघा." नाही. ते स्वीकारणार नाहीत. म्हणून दुर्दैवी. जर तुम्ही चांगल्या गोष्टीचा प्रचार केलात, सर्वात सोपी प्रक्रिया, पण ते स्वीकारणार नाहीत, त्यांना फसवले जाण्याची इच्छा आहे… तुम्ही बघताच? मन्दाः सुमंद-मतयो मंद-भाग्या हयुपद्रुताः (श्रीमद भागवतम १.१.१०) । आणि बऱ्याच गोष्टींनी त्रासलेले - हा ड्राफ्ट बोर्ड, हा बोर्ड, तो बोर्ड, हे, ते, अनेक गोष्टी. हि त्यांची स्थिती आहे. कमी आयुष्य, खूप मंद, समज नाही. आणि जर समजून घ्यायची इच्छा असेल तर त्यांना फसण्याची इच्छा असते, ते दुर्दैवी आणि गोंधळलेले आहेत. वर्तमान दिवसांची हि स्थिती आहे. तुम्ही अमेरिकेत किंवा भारतात जन्माला आलात, त्याने काही फरक पडत नाही. हि संपूर्ण स्थिती आहे.