MR/Prabhupada 0416 - केवळ जप, नृत्य, आणि रसगुल्ला, कचोरी खाणे
Lecture & Initiation -- Seattle, October 20, 1968
म्हणून या आंदोलनाची खूप गरज आहे, आणि आम्ही कृष्णभावनामृत आंदोलनाचा प्रचार करीत आहोत. आणि हे व्यावहारिक आहे, खूप सोपे, आणि या युगासाठी योग्य. तुम्ही किती शिकलेले आहात याचा विचार करीत नाहीत. ते मानत नाहीत. तुमचे भूतकाळातील आयुष्य कसेही असले, तुमच्या मुखाने हरे कृष्णाचा जप करा - देवाने तुम्हाला जीभ दिली आहे - आणि कृष्ण प्रसादाचा आस्वाद घ्या, प्रेमोत्सव, आणि तुमचे आयुष्य यशस्वी बनवा. खूप सोपी प्रक्रिया. तर हा आमचा कार्यक्रम आहे. तर सर्वाना या आंदोलनात सामील होण्यासाठी आमंत्रित करा, आणि तुमचा फायदा होईल. आणि तुम्ही प्रत्यक्षामध्ये पाहाल. प्रत्यक्षावगमम् धर्म्यम.
भगवद् गीतेमध्ये असे सांगितले आहे की हि आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया थेट समजण्यायोग्य आहे. थेट समजण्यायोग्य. प्रत्यक्षावगमम् धर्म्यम. जेव्हा तुम्ही खात असता, तुम्ही समजू शकता की तुम्ही खात आहात, तुम्ही समजू शकता की तुमची भूक शमली आहे, तुम्ही समजू शकता की तुम्हाला ताकद मिळत आहे. तर तुम्हाला प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः समजू शकता हि खूप छान गोष्ट आहे. प्रत्यक्षावगमम्. प्रत्यक्षा म्हणजे थेट, अवगमम्. तुम्ही ते थेट समजता. जर तुम्ही ध्यान केलेत, तथाकथित ध्यान, तुम्हाला माहित नाही तुम्ही किती प्रगती करीत आहात. तुम्ही पहा. तुम्ही विस्मृतीत आहात. तुम्हाला माहित नाही. पण इथे, जर तुम्ही हरे कृष्णांचा जप केलात, तुम्हाला प्रत्यक्ष जाणवेल. प्रत्यक्ष जाणवेल. कसे त्यांना प्रत्यक्ष जाणवत आहे. हे खूप छान आहे.
असे सांगणारे अनेक शिष्य मला भेटले आहेत, अनेक पत्र मिळाली आहेत, प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् (भ.गी. ९.२) । आणि करण्यासाठी खूप छान. जप आणि नृत्य आणि खाणे. तुम्हाला आणखी काय हवे आहे? (हशा) फक्त जप, नृत्य, आणि रसगुल्ला, कचोरी खाणे. तर सुसुखं आणि कर्तुमव्ययम् करत असताना, या प्रक्रियेचा सराव करताना, ते खूप आनंददायी आहे, आणि अव्ययम् अव्ययम् म्हणजे जे काही तुम्ही करता, अगदी जरी तुम्ही एक टक्का या आंदोलनाचा भाग आत्मसात केलात तरीही तो तुमचा कायमचा फायदा आहे. कायमचा फायदा. जर तुम्ही दोन टक्के, तीन टक्के, चार टक्के केलेत… परंतु पुढच्या जन्माची वाट पाहू नका. शंभर टक्के संपवा.
हे अमलात आणणे खूप सोपे नाही; म्हणून संपवा. प्रतीक्षा करू नका, की "मला या आयुष्यात आत्मसाक्षात्काराचा काही टक्के भाग संपवू दे, आणि पुढच्या जन्मी मी करीन." आणि पूर्ण संपवण्याची, साक्षात्काराची चाचणी काय आहे? चाचणी आहे तुम्ही भगवंतांवर, श्रीकृष्णांवर प्रेम करायला किती शिकलात, एवढेच. आपण आपले प्रेम प्राप्त केले आहे, तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, पण जर तुमचे प्रेम विभागले गेले तर, की "मी या देशावर, माझ्या समाजावर, माझ्या प्रेयसीवर आणि हे आणि ते, किंवा प्रियकरावर, प्रेम करीन. आणि मी श्रीकृष्णांवर देखील प्रेम करायचा प्रयत्न करीन…" नाही. ते सुद्धा चांगले आहे, पण जर तुम्ही प्राधान्य दिले, पूर्ण प्रामुख्य, फक्त श्रीकृष्णांवर प्रेम करण्यास, तुम्हाला आपोआप इतर गोष्टी आवडायला लागतील, आणि तुमचे आयुष्य परिपूर्ण बनेल. इतर प्रेमळ गोष्टी कमी होणार नाहीत. ज्याप्रमाणे कृष्णभावनामृत व्यक्ती, तो केवळ त्याच्या कुटुंबावर आणि समाजावर प्रेम करीत नाही; तो प्राण्यांवर देखील प्रेम करतो, तो मुग्यांवर देखील प्रेम करतो, त्याचे प्रेम इतके विस्तारित आहे. हि इतकी छान गोष्ट आहे.
तुम्ही किती प्रेम करू शकता? काहीही, जेव्हा काही गैरसमज होतो, तेव्हा प्रेम तुटते. काहीही, जेव्हा काही गैरसमज होतो, तेव्हा प्रेम मोडते. पण श्रीकृष्णांचे प्रेम इतके चांगले आहे की तुम्ही ते कधी मोडू शकणार नाही, आणि तुमचे प्रेम सार्वत्रिकरीत्या विस्तृत बनेल. तुम्ही तुमची प्रेम करण्याची क्षमता केवळ इतर गोष्टीत गमावली आहेत. तुम्ही ते फक्त श्रीकृष्णांकडे वळवा, आणि जेव्हा तुम्ही श्रीकृष्णांवर पूर्णपणे प्रेम करता. तुम्ही पाहू शकाल की तुम्ही तुमच्या देशावर, तुमच्या समाजावर, तुमच्या मित्रांवर, तुम्ही पूर्वी करीत होतात त्यापेक्षा अधिक प्रेम करीत आहात. हे खूप छान आहे.