MR/Prabhupada 0418 - दीक्षा म्हणजे क्रियाकलापाची सुरवात



Lecture & Initiation -- Seattle, October 20, 1968

तर हि दीक्षा… आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी दीक्षा घेतली आहे, तर आमचे काही विद्यार्थी आज संध्याकाळी दीक्षा घेणार आहेत. तर दीक्षा म्हणजे या आंदोलनात सामील होण्याचा तिसरा स्तर. प्रथम स्तर श्रद्धा आहे, थोडी श्रद्धा. ज्याप्रमाणे आमचे शिष्य बाजारात जात आहेत, ते कीर्तन करीत आहेत. आणि अनेक लोक काहीजण पैसे देतात; काही जाऊ देवाचियाद्वारी खरेदी करतात. हि श्रद्धेची सुरुवात आहे: "ओह, हे एक चांगले आंदोलन आहे. मला सहकार्य करू द्या." आदौ श्रद्धा. मग, त्याला जर अजून थोडा रस असेल, तर तो इथे क्लासमध्ये येतो. ठीक आहे, हे लोक काय शिकवत आहेत ते पाहू या, हे कृष्णभावनामृत, तर ते येतात. तर हा दुसरा स्तर आहे.

पहिल्या टप्प्यात या आंदोलनासाठी आपोआप सहानभूती आहे. दुसरा टप्पा या आंदोलनात सामील होणे किंवा आमचा संग करणे, आमचे कार्य. जसे तुम्ही कृपा करून इथे आला आहात.माझे बोलणे ऐकत आहात. त्याचप्रमाणे, जर कोणी अधिक रस घेतला किंवा त्याची श्रद्धा आणखीन प्रगत होत असली, मग तो येतो, तो दुसरा स्तर आहे. आणि तिसरा स्तर आहे… आदौ श्रद्धा ततः साधु-संग अथ अतः भजन-क्रिया (चैतन्य चरितामृत मध्य २३.१४-१५) | आता, दीक्षा म्हणजे क्रियाकलापांची सुरुवात. क्रियाकलापांची सुरुवात. आपण कसे कृष्णभावनामृत पूर्णत्वाच्या स्थितीपर्यंत विकसित करू शकतो, त्याला दीक्षा म्हणतात. असे नाही की दीक्षा म्हणजे संपले. हा तिसरा स्तर आहे.

मग चौथा स्तर असेल, ज्याने दीक्षा घेतली आहे, जर त्याने नियमांचे पालन केले, आणि जर त्यानी निश्चित संख्येने हरे कृष्ण मंत्राचा जप केला, मग हळूहळू त्याचे सर्व गैरसमज नष्ट होतील. गैरसमज काय आहेत? आम्ही आमच्या शिष्याना अवैध लैगिक संबंध, मांसाहारापासून दूर रहायला सांगतो, आणि नशा, आणि जुगार खेळण्यात भाग घेणे. या चार गोष्टी. म्हणून साधारणपणे या चार गोष्टी समाजात प्रमुख आहेत, विशेषतः पाश्चिमात्य देशात. पण या शिष्यानी जे दीक्षा घेतात आणि जप करतात. ते या चार गोष्टी कोणत्याही अडचणीशिवाय सहजपणे सोडतात. त्याला अनर्थ निवृत्ती म्हणतात. तो चौथा स्तर आहे.

पाचव्या स्तरात तो दृढ बनतो: "हो" ज्याप्रमाणे एक शिष्य, श्री.अँडरसन, मी त्याला पाहिले नाही, पण केवळ आमच्या इतर भक्तांबरोबरच्या सहवासाने, त्याने हे लिहिले आहे की. "मी या कृष्णभावनामृतसाठी माझे संपूर्ण जीवन समर्पित करु इच्छितो." याला निष्ठा म्हणतात, दृढता. ततो निष्ठा ततो रुची. रुची म्हणजे त्याना स्वाद मिळतो. हि मुले बाहेर का जात आहेत? हा जप, त्याना रुची निर्माण झाली आहे. त्यानी रुची विकसित केली आहे. अन्यथा ते विनाकारण वेळ वाया घालवत नाहीत. ते शिकलेले आहेत, ते मोठे झाले आहेत त्यामुळे रुची. दृढता, मग रुची, तथाशक्तीस. जेव्हा रुची आहे तेव्हा ओढ. तो सोडून देऊ शकत नाही.

मला अनेक पत्रे मिळाली आहेत. काही शिष्य, ते त्यांच्या गुरुबंधूंची बरोबरी करु शकत नाहीत, ते निघून जातात, पण ते असे लिहितात की "मी जाऊ शकत नाही. मी जाऊ शकत नाही." त्याला ताब्यात घेतले आहे. तुम्ही पाहिले का? उमापतीने ते पत्र लिहिले आहे. की तो अडचणीत आहे, तो जगू शकत नाही, तो जगू किंवा सोडू शकत नाही. तो दलासमध्ये आहे. तो संगत सोडू शकत नाही, किंवा काही गैरसमज, तो गुरुबंधुंबरोबर राहू शकत नाही. पण ते तात्पुरते आहे. तर त्याला आसक्ती म्हणतात, ओढ. ताथसक्तीस ततो भाव. मग हळूहळू वाढते, काही उत्साही स्थिती. कायम श्रीकृष्णाचा विचार. आणि मग परिपूर्ण अवस्था, तो श्रीकृष्णांवर शंभर टक्के प्रेम करतो. तर हि प्रक्रिया आहे.