MR/Prabhupada 0419 - दीक्षा म्हणजे कृष्णभावनामृताचा तिसरा स्तर



Lecture & Initiation -- Seattle, October 20, 1968

तर दीक्षा म्हणजे कृष्णभावनामृताचा तिसरा स्तर. ज्यांना दीक्षा दिली जात आहे, त्यांनी लक्षात ठेवावे की त्यानी नियमांचे पालन केले पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट रोगापासून बरे होण्याची इच्छा असेल, त्याला वैद्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. आणि ते त्याला आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी मदत करेल तर या चार नियमांचे पालन त्यांनी केले पाहिजे आणि रोज कमीतकमी सोळा माळा जप केला पाहिजे. आणि हळूहळू तो दृढ निश्चयी होईल आणि ओढ लागेल आणि त्याचा आस्वाद घेईल. आणि मग आपोआप कृष्ण प्रेम होईल… ते प्रत्येकाच्या हृदयात आहे.

कृष्ण प्रेम, ती विदेशी गोष्ट नाही जी आपण धारण करीत आहोत. नाही. ते आहे. सगळीकडे, प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये. नाहीतर या अमेरिकन मुलं आणि मुलींनी कसे स्वीकारले असते जर ते नसते तर? ते तिथे आहे. मी फक्त मदत करत आहे. आगपेटीतील काडी प्रमाणे, तिथे अग्नी आहे, आणि एखादा फक्त घासून निर्माण करू शकतो, एवढेच. तिथे अग्नी आहे. तुम्ही फक्त घासून दोन अग्नी निर्माण करु शकत नाही. मला म्हणायचे आहे काड्या, जर तिथे, वरच्या भागावर रसायन नसेल. तर कृष्णभावनामृत प्रत्येकाच्या हृदयात आहे. फक्त आपण या संघाद्वारे पुनरुज्जीवित केले पाहिजे, या कृष्णभावनामृत भक्तांच्या संघाद्वारे. तर हे कठीणही नाही, अव्यवहारिकही नाही, कंटाळवाणेही नाही. सगळेकाही छान आहे. तर आमची सगळ्यांना विनंती आहे, की चैतन्य प्रभूंची हि मूल्यवान भेट स्वीकारा. कृष्णभावनामृत आंदोलन, आणि हरे कृष्ण जप, आणि तुम्ही आनंदी व्हाल. तो आमचा कार्यक्रम आहे.

आभारी आहे.