MR/Prabhupada 0423 - मी तुमच्यासाठी खूप श्रम करतोय पण तुम्ही त्याचा फायदा घेत नाही



Lecture on SB 2.9.14 -- Melbourne, April 13, 1972

तर हे खूपच छान आहे कि ही आपल्याला एक संधी आहे आपल्याला ही संधी मिळते कि, लक्ष्मी.....कृष्णा ची भक्ति रूपी सेवा कशी करायला मिळेल. लक्ष्मी सहस्र-शत संभ्रम सेव्यमानम् (ब्रह्मसंहिता ५.२९) एका जन्मातच जर मला अनादी, अनंत, शाश्वत, पूर्णानंदमय आयुष्य जगण्यासाठी जर, मला कृष्णा च्या राज्यात प्रवेश करण्याची संधी मिळत असेल आणि ती संधी जर मी नाकारली तर मी किती अभागी असेन. जरी तुम्ही निम्न गति ला प्राप्त झाला, तरी परत उर्घ्वगामी होण्याची संधी मिळते. पण जरी संधी नसली, आपण जरी अपूर्णच राहिलो, असफल राहिलो, हताश राहिलो तरी तरी असे म्हटले आहे कि असे होणे पण शुभ, मंगल आहे, कारण पुढचं आयुष्य, पुढचा जन्म, मनुष्य रुपातलाच असेल.. आणि सर्व साधारण कर्मीं साठी, पुढचे आयुष्य, जन्म कसा असेल काही माहिती नाही.

यम् यम् वापि स्मरान् लोके त्यजते अंते कलेवरम् (भ.गी. ८.६) साधरण कर्मी पुढच्या आयुष्यात, एक मांजर बनु शकतो, यक्ष, गंधर्व, अलौकिक गुण असणारा व्यक्ति बनु शकतो. त्या पेक्षा जास्त नाही. बस्स्. तेवढेच. यक्ष, गंधर्व ही कोण आहेत.... ज्यांना ब्रम्हांडातल्या उच्च कोटीचे लोक, जसे स्वर्ग लोक, सारखे लोक प्राप्त करण्याची संधी मिळते आणि तदनंतर परत त्यांना निम्न गति प्राप्त होते. क्षिणे पुण्ये पुनर्मर्त्य - लोकम् विंशति पुण्य संचय संपला, धार्मिक वृत्ति नेे केलेले, पवित्र कर्म, पुण्य कर्म केल्याचे संचित पुण्य फळ संपले कि परत निम्न गति प्राप्त होते. आ ब्रम्हभुवनाल्लोकान्, पुनरावर्तिनो-अर्जुन: "जरी तुम्ही ब्रम्हलोकात गेलात्, जिथे ब्रम्हदेव राहतात. ज्याच्या एक दिवसाच्या गणने चा पण हिशोब आपण लावु शकत नाही. जरी तुम्ही तिथे गेलात तरी त्यांना परत लागेल. मद-धाम गत्वा पुर्नजन्म न विद्यते. जर तुम्ही माझ्या धामा कडे आलात तरी तुम्हाला पुर्नजन्म नाही. ही आहे कृष्ण चेतना, भक्ति मध्ये जागृत राहिल्या मुळे मिळणारी संधी..

त्यक्त्वा स्व-धर्मं चरणाम्बुजं हरे
र्भजन्नपक्वो-अथ पतेत्ततो यदि
यत्र क्व वाभद्रमभूदमुष्यकिं
को वार्थ आप्तो अभजतां स्वधर्मतः
(श्रीमद भागवतम १.५.१७)
तस्यैव हेतोः प्रयतेत कोविदो
न लभ्यते यद् भ्रमतामुपर्यधः
तल्लभ्यते दुःखवदन्यतः सुखं
कालेन सर्वत्र गभीररंहसा
(श्रीमद भागवतम १.५.१८)

तुम्ही हे सर्व वाचले पाहिजे. पण तुम्ही वाचत नाही. भागवतातल्या प्रथम भागा मध्ये हे सर्व विस्तार पूर्वक वर्णिले आहे. पण मला नाही वाटत तुम्ही हे सगळं वाचत असाल. खरंच तुम्ही वाचता ?... जर तुम्ही हे वाचत नाही, तर तुम्ही अस्वस्थता अनुभवाल............ "अरे, ....मला जपानहून भारतात जायचंय, भारतातून जपानला जायचंय." तुम्ही अस्वस्थ आहांत कारण तुम्ही हे वाचत नाही. मी तुमच्यासाठी एवढे श्रम घेतोय, पण तुम्ही त्याचा फायदा उचलंत नाही. खाण्या आणि झोपण्याचा फायदा घेऊ नका, अशी पुस्तके वाचुन त्याच्या ज्ञानाचा फायदा घ्या. तर तुमचे आयुष्य सफल होईल. माझे कर्तव्य - मी तुम्हाला किती मौल्यवान गोष्टी सांगितल्या आहेत, दिवस आणि रात्र तुम्हाला पटविण्याचा प्रयत्न करतोय, प्रत्येक शब्दशः.... आणि जर तुम्ही ह्याचा फायदा घेत नाही,तर मी काय करू शकतो? ठीक आहे.