MR/Prabhupada 0424 - तुम्ही या वैदिक संस्कृतीचा पूर्ण लाभ घ्या
Lecture on SB 1.1.1 -- New York, July 6, 1972
पूर्ण जगात संंस्कृत भाषा ही खूप आदरणीय आहे. विशेषतः जर्मनी मधल्या लोकांना संंस्कृत ही खूप आवडी ची भाषा आहे. जर्मनी मध्ये बरेच अशे विद्वान आहेत जे संंस्कृत मध्ये तासन् तास बोलू शकतात. ते विद्यार्थी संस्कृत भाषेला खूप गांर्भीयाने घेतात. माझ्यातला एक गुरू बंधू, जो आता स्वीडन ला आहे, तो म्हणायचा कि जेव्हा एक भारतीय विद्यार्थी आमच्या देशात लंडन हून यायचा ब्रिटिशकाळी, भारतीय लंडन ला जात होते, ते तिकडे पदवी घेत होते. आणि तो मोठा माणूस बनायचा. अशी पद्धत होती. आणि घरी परतताना, स्वाभाविक पणे ते युरोपियन देशात जायचे. तर जर्मनी मध्ये ते भारतीय विद्यार्थांना चाचपडायचे कि त्यांना त्यांच्या संस्कृति बद्दल किती माहितीये. तेव्हा, माझे गुरूबंधु, त्याचे नाव अर्न्स्ट श्यूल्ज, आता त्याचे नाव सदानंद स्वामी आहे. तर ते म्हणले, कि जसे आम्हाला कळले कि त्या विद्यार्थ्यांना त्यांची भारतीय संस्कृति माहित नाही. लगेच त्यांना नाकारले., ते निरर्थक आहे. तर, जे कोणी भारतीय आहेत जे विशेषतः सभेत उपस्थित आहेत. जर तुम्ही तुमच्या देशाचा गौरव करू इच्छिता, तर तुम्ही वैदिक वाङमय ला जगा पुढे प्रस्तुत करा. तुम्ही पाश्चिमात्य देशांसमोर, स्वतःला तथाकथित तंत्रज्ञानाच्या आधारे उत्कृष्ट नाही ठरवू शकत. ते शक्य नाही. ती देशे खूप प्रगत आहेत. ती आपल्या पेक्षा शंभर वर्ष पुढे आहेत. ज्या कुठल्या मशिनींचा तुम्ही शोध लावाल, त्या मशीनी चा शोध पाश्चिमात्य देशात शंभर वर्षां पूर्वीच लागलेला आहे. म्हणून तुम्ही स्वतःला त्याच्या समोर उत्कृष्ट सिद्ध नाही करू शकत. जर तुम्ही भारतीय आपल्या देशाला गौरवान्वित करू इच्छिता तर तर या वैदिक संस्कृति ला ह्रदय आणि आत्म्या पासून जगा पुढे प्रस्तुत करा, जसे मी करण्या चा प्रयत्न करित आहे. लोक याचा कसा स्वीकार करत आहेत. ते एक सार आहे. माझ्या आधी बरेच स्वामी या देेशात आले पण ते या जगा पुढे ही परम सत्यता प्रस्तुत करू शकले नाही. त्यांना पैैैसा हवा होता व तो त्यांनी मिळविला आणि तेे गेले. झालं..... आपली, कृष्ण चेतना व त्याच्या स्मृति मध्ये जागे राहणयाची मुहिम ही अशी नाही. आपल्याला पाश्चात्य देशांना यातिल काही तरी द्यायचे आहे. ते आपले ध्येय आहे. आपण काही मागायला आलो नाही, तर आपल्यालचे काही तरी द्यायचंय. ते माझे ध्येय आहे. ते आपल्या कडे दाळ , तांदुळ , गहुं , पैश्याचा, अश्या पदार्थांचा व्यापार करतात. पण मी इथे भारतीय संस्कृतितले थोडे से द्यायला आलोय. हा फरक आहे. तर तुम्ही युरोपियन, अमेरिकन विद्यार्थी, वैदिक संस्कृति चा पूर्ण लाभ घ्या. म्हणून मी एवढे श्रम घेतोय कि मी माझे शरीर सोडण्या अगोदर, तुम्हाला अशी काही पुस्तके देऊन जाऊ शकू जी तुम्ही माझ्या मरणा नंतर ही त्यांचा आनंद घेऊ शकाल. तर त्याचा वापर करा, वापर करा. प्रत्येक श्लोक नीट लक्ष देऊन वाचा. गर्भितार्थ नीट समजण्याचा प्रयत्न करा, आपसात याची चर्चा करा. नित्यम् भागवता सेवया. तो आपला उद्देश्य आहे. नस्तप्रयेस्व् अभद्रशु नित्यम् भागवत सेवया ।।. (SB 1.2.18). अभद्र, असे खूप काही आपल्या मनात असते. तर अशी अभद्रता आणि अशुद्धता कृष्ण चेतना मध्ये जागृत राहिल्यानेच धुतली जाऊ शकते. या वर दूसरा उपाय नाही. श्रुणयुताम् स्वकथाः कृष्ण् पुण्य श्रवणा कीर्तना ह्रदयंतः स्थोह्य अभद्राणि विधुनोति सुह्रत् सताम्. ।। (SB 1.2.17) नास्त प्रयेस्व् अभद्रेशू नित्यम् भागवता सेवया भागवत्य् उत्तमा श्लोके भक्ति भर्क्ति भवति नैस्थिकी ।।(SB 1.2.18) ही प्रक्रिया आहे. श्रुण्युताम् स्व कथाः कृष्ण, कृष्णाचा वास तुमच्या ह्रदयात् आहे. कृष्ण तुम्हाला अंतर मनातून आणि बाह्य रूपातून मदत करण्याचा प्रयत्न करतोय. बाह्य रूपात तो स्वतः ला देवळात्ल्या मूर्ति रूपात प्रस्तुत करतोय. तुम्ही त्याची भक्ति व सेवा करुन याचा लाभ घेऊ शकता. तो आपला प्रतिनिधी, आध्यात्मिक गुरू तुम्हाला मार्गदर्शन करण्या साठी पाठवत आहे. आणि तो तुमच्या अंतर्मनात परमात्म रूपात विद्यमान असून तुम्हाला मदत करायला तत्पर आहे. कृष्णा अत्यंत दयाळु आहे. तुम्ही सर्व या भौतिक जगाात दुःख भोगतआहात, तर तुमच्या साठी कृष्ण जसाआहे तसा धावत येतो. आणि उपदेश करतो कि सर्व धर्मान् परित्यज्या मामेकम् शरणम् वृज् (भगवत गीता १८.६६) तर भागवता सेवया नित्यम् भागवता सेवया् ।।(श्रीमद् भागवत् १.२.१८) ह्रदया चे शुद्धीकरण, सेतो दर्पणा मार्जनम् ।। (CC Antya 20.12) ही प्रक्रिया आहे. आपण कृष्णा चे एक अविभज्य घटक आहोत. म्हणून आपण शुद्ध आहोत. पण आपण सर्व भौतिक रित्या मलीन झालो आहोत. तर आपल्या स्वतःला शुद्ध करायचे आहे आणि त्याची प्रक्रिया आहे....कि फक्त त्याचा ध्यास घ्या, त्याच्या बद्दल सर्व ऐका.