MR/Prabhupada 0427 - आत्मा स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीरापेक्षा भिन्न आहे



Lecture on BG 2.11 -- Edinburgh, July 16, 1972

वैदिक पद्धती प्रमाणे, समाजा मध्ये चार प्रकार ची लोक आहेत. चतुर्वर्ण्याम् माया सृष्टम् गुण कर्म विभागा सः ।। (भ.गी. ४.१३) मनुष्य समाज चार भागात विभागला गेला पाहिजे. आपल्या शरीरा मध्ये चार प्रकार चे वेगळे विभाग आहेत. बुद्धी चा विभाग, हाताचा विभाग, पोटाचा विभाग, आणि पायाचा विभाग. जर तुम्हाला आपले शरीर नीट ठेवायचे असेल तर, तुम्हाला हे सर्व विभागांची गरज पडते. त्या साठी तुमचे डोकं, हाथ, पोट आणि पाय, या सर्व अवयवांची नीट निगा ठेवणे गरजे चे आहे. तुम्ही आपल्या देशातल्या जाति व्यवस्थे बद्दल ऐकले असेलः ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे बनवलेले नाहीय. हे स्वाभाविकपणे आहे. फक्त भारतातच नव्हे तर तुम्ही कोणत्या ही समाजात जा, ह्या चार वर्ण, जाति ची लोक सगळी कडे असतात. बुद्धिमान लोक, व्यवस्था सांभाळणारी, उत्पादक वृत्ति ची लोक, आणि श्रमिक वृत्ति चे लोक. त्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधिले जाते. जसे मी म्हटले, माझे शरीर काही भागात विभागले आहे. बुद्धी चा विभाग, हाताचा विभाग, पोटाचा विभाग, आणि पायाचा विभाग. सर्व राजे, जनमानसा च्या रक्षणार्थ शस्त्र विभागाशी निगडीत असतात. पूर्वी च्या काळी , क्षत्रिय...... क्षत्रिय म्हणजे जे शत्रू पासून सामान्य जनांचे रक्षण करतात. यांना क्षत्रिय म्हणतात... आपला मुद्दा हा आहे कि कृष्णा ने अर्जूनास सूचित केले कि " तू आपल्या कर्तव्या पासून परावृत्त का होत आहेस ? " काय तुला असं वाटतं कि तुझा भाऊ व काका लोक किंवा आजोबा, जी पलकडच्या बजुला आहेत, ती... युद्धात मारले जातील ? नाही. ते खरे नहीय " मुद्दा असा आहे कि कृष्ण अर्जुनाला हे समजावू इच्छितो कि शरीर हे व्यक्ति पेक्षा वेगळे असते.. जसे आपण शर्ट पँट पेक्षा वेगळे आहोत, जरी आपण ते वापरत असू तरी..... तसेच आपण जीवन जगत असताना आपण, आत्मे, सूक्ष्म व स्थूल शरीरा पेक्षा वेगळे आहोत. हे भगवद् गीतेत्ले तत्वज्ञान आहे. लोकांना समजत नाही. साधारणतः लोकांना वाटते कि ते हे शरीर आहे. शास्त्रात ह्याला निरर्थक म्हटले आहे. यस्यात्मा बुद्धिः कुनापे त्रि धाकुतेस्व् धिः कलत्राधिसु भौमैज्य धिः यत तीर्थ बुद्धिः सलिले ना कर्हिची जानेस्व् अभिज्नेसू स एव गो खरः (SB 10.84.13) गो म्हणजे गाय, आणि खर म्हणजे गाढव. जो कुणी देहबुद्धि मधे राहुन जगत असेल, यस्यात्मा बुद्धिः कुनापे त्रि धाकुते..... देहबुद्धि मधे राहाणे हे जनावरां साठी आहे । कुत्र्या ला नाही माहित कि तो शरीर नाही आत्मा आहे. पण माणुस जर सूज्ञ असेल तर समजू शकेल कि तो शरीर नाही, तो शरीरा पेक्षा वेगळा आहे. तो समजू शकतो कि आपण शरीरा पेक्षा वेगळे आहोत । ही सहज सोपी पद्धत आहे. भगवद्गीता मधे म्हटले आहे कि dehino 'smin yathā dehe kaumāraṁ yauvanaṁ jarā tathā dehāntara-prāptir dhīras tatra na muhyati (BG 2.13) देहिनः अस्मिन देहे, म्हणजे ह्या शरीरात आत्मा आहे... देही म्हणजे मी हे शरीर नाही.... तुम्ही जर लहान मुलाला विचारलं कि हे काय आहे ... तर तो म्हणेल, कि हे माझे डोकं आहे.... तुम्ही जर कोणाला ही विचारलं कि हे काय आहे ... तर तो म्हणेल, कि हे माझे डोकं आहे.... कोणी मी डोकं असं म्हणणार नाही... अश्या प्रकारे जर तुम्ही आपल्या शरीरा कडे लक्ष दिले तर तुम्ही म्हणाल, हे माझे डोकं आहे, माझे पाय, बोटं आहेत, पण मी कुठे आहे ? मी असेन तर माझे म्हटले जाते.. पण " मी " बद्दल आपल्याला ज्ञान नाही...... माझ्या बद्दल ज्ञान आहे पण " मी " बद्दल नाही. ह्याला अज्ञान म्हणतात. म्हणून सर्व जगातली लोक आपल्या शरीरालाच मी मानतात. असंच एक उदाहरण द्यायचं तर, समजा माझे वडिल वारले, तर मी रडत म्हटले कि , ओह, माझे वडिल गेले, माझे वडिल गेले... पण जर कुणी म्हटले , कि "तुम्ही असे का म्हणता ?" ते तर इथे पडलेत, असे, तुम्ही का असे ऱडता ? " नाही, हे त्यांचे शरीर आहे. " माझे वडिल गेले....." तर वर्तमानात मी तुमचे शरीर बघतोय... तुम्ही पण माझे शरीर बघता, पण कोणी मला बघत नाहीय. मृत्यु नंतर त्याला शुद्धी येते. ओह, हे माझे वडिल नाहीत, हे माझ्या वडिलां चे शरीर आहे. " बघितले..? मृत्यु नंतर आपण जागे होतो. आणि आयुष्य जगताना, आपण ह्या ज्ञाना पासून दूर असतो. ही नवीन सभ्यता आहे... जसे आयुः विम्या चे पैसे मृत्यु नंतर मिळतात. जीवन जगताना नाही. कधी कधी हयात असताना पण मिळतात. माझा म्हणण्याचा मुद्दा असाय कि आपण आयुष्य भर अज्ञानात जगतो. आपल्याला माहित नाही, " माझे वडिल, भाऊ, आपतेष्ट काय आहेत, मी काय आहे. " पण सर्व जण ह्या चुकी च्या प्रभावात आहेत, कि हे शरीर म्हणजे माझे वडिलेत. हे शरीर म्हणजे माझे मूल आहे, हे शरीर म्हणजे माझी बायको आहे. हे अज्ञान आहे. जर सर्व जगाचे जर निरीक्षण केले तर कऴेल, कि आयुष्य जगताना सगळे हेच म्हणतील कि "मी अंग्रेज आहे, " " मी भारतीय आहे," " मी हिंदु आहे, " " मी मुस्लिम आहे. " पण जर त्याला विचाारलं कि " खरंच तू तो आहे का ? " कारण कि जन्म हिंदु, मुस्लिम, समाजात झाला, त्या त्या देशात झाला, म्हणून.... आपण म्हणतो, कि "मी अंग्रेज आहे, " मी हिंदु आहे, " " मी मुस्लिम आहे. " " मी हा आहे, मी तो आहेे....." पण जेव्हा शरीर मृत होतं तेव्हा आपण म्हणतो, नाही नाही, व्यक्ति जो शरीराच्या आत होता तो गेला, हे शरीर निराळंय.