MR/Prabhupada 0429 - श्रीकृष्णा हे देवाचे नाव आहे. श्रीकृष्णा म्हणजे सर्व-आकर्षक, सर्व-चांगले
Lecture on BG 2.11 -- Edinburgh, July 16, 1972
वर्तमान काळाची परिस्थिती अशी आहे कि संपूर्ण जगत "मी शरीर आहे " ह्या चुकीच्या संस्कारा मध्ये जगत आहे. जे खरं नाही. म्हणून हे कृष्ण कीर्तन, हरे कृष्ण चळवळ, ह्या सर्वांचा विशेष प्रभाव आहे. हरे कृष्ण चळवळ, ह्याला सर्वसामान्य शब्द समजू नये. हा एक महामंत्र आहे. ह्या महामंत्रा चे ध्वनि कंपन हे आत्मिक, आध्यात्मिक आहे. ह्याला साधारण समजू नये . मला माहित नाही तुमच्या देशात सापा चे विष उतरवणारे आहेत कि नाही. भारतात, आज ही सापा चे विष उतरवणारे आहेत, मला माफ करा. ती लोक काही मंत्र म्हणतात, आणि साप चावलेला माणूस लगेच शुद्धी वर येतो. इथे कुणी भारतीय असेल तर त्यांना माहित असेल. विशेषतः पंजाब मध्ये मी पाहिले आहे कि तिथे गारुडी मांत्रिक असतात जे सापाचे विष उतरवणारे मंत्र त्यांना माहित आहेत, आणि कसे उच्चारायचे हे ही माहित आहे. म्हणून जर कुणा व्यक्ति ला साप चावला तर तो व्यक्ति मृत होत नाही तो बेशुद्ध होतो. तो मृत होत नाही. पण मंत्र उच्चारणा ने तो परत शुद्धी वर येतो. तर भारतात मध्ये पद्धत आहे कि ज्या व्यक्तिला साप चावतो त्याला जाळत नाही, त्याला मृत शरीर म्हणत ऩाही. त्याला नावेत ठेवून पाण्यात सोडून देतात. म्हणजे जर नशीबवान असेल तर तो शुद्धी वर येऊ शकेल आणि जगेल. तसेच आपण सर्व वर्तमानात, अज्ञानात जगत असल्या मुळे आपण सर्व झोपले आहोत. म्हणून आपल्याला जागे करण्या साठी, हा महामंत्र आवश्यक आहे. सेतो दर्पणा मार्जनम् (CC Antya 20.12) जशी ही युरोपियन मुले मुली आहेत, जी माझ्या बरोबर आहेत.. माझ्या कडे तीन ते चार हजार अशे शिष्य आहेत जे हरे कृष्ण मंत्र लहरी पणाने जपत नाहीत तर ते खूप खात्रीशिर आणि समर्पित भावाने जपतात, ते तत्वज्ञानावर छान बोलू शकतात. ती समजुतदार आहेत. जागे आहे. त्यांना हे कसे जमते. चार वर्षांपूर्वी, त्यांना कृष्ण कुणाचे नाव आहे हे सुद्धा माहीत नव्हते. बहुतेक त्यांनी ईंग्रजी शब्दकोश मधे कृष्णाचे नाव पाहिले असेल. ज्याची व्याख्या " हिंदु देवता म्हणून असेल. पण ते खरे नाही. कृष्ण हे एक देवाचे नाव आहे. कृष्ण म्हणजे जे काही सुंदर उत्तम आहे ते. सर्व काही सुंदर म्हणजे तो स्वतः किती सुंदर असेल ! जे वाईट आहे ते सुंदर आणि आकर्षक असू शकत नाही. म्हणून कृष्ण म्हणजे सुंदर आणि आकर्षक. तो सर्व गुण संपन्न आहे. ही परमेश्वराचे खरी ओळख आहे किंवा खरी परिभाषेत आहे. देवा ला जर काही नाव आहे, जे परिपूर्ण आहे, तर ते नाव आहे कृष्ण. हा संस्कृत शब्द आहे. कृष्ण म्हणजे परमात्मा. शास्त्रात असे म्हटले आहे कि ईश्वरः परमः कृष्णः (Bs. 5.1) ईश्वर म्हणजे शासक, आणि परमः म्हणजे उच्चतम. ईश्वरः परमः कृष्णः (Bs. 5.1) . वैदिक साहित्या कडुन सूचित केले गेले आहे. तर कृष्ण भक्ति ची ही चळवळ काही सांप्रदायिक चळवळ नाही. ही एक तत्वज्ञान ची चळवळ आहे. समजण्या चा प्रयत्न करा. पण ही प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त जप करायचा आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे. आम्ही काही जादूगर नाही आहोत, पण आमच्या शिष्यांना आम्ही सांगत असतो कि तुम्ही फक्त हे अलौकिक नाम घेत रहा. म्हणजे मनात असणारी अशुद्धता हळूहळू दूर होत जाते आणि ह्रदय शुद्ध होऊन जाते. ही पद्धत आहे. चैतन्य महाप्रभु म्हणतात. त्यांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत. " से तो द्रपणम् मार्जनम्. ह्या भौतिक जगात खूप भ्रम आणि गैरसमजूती मुळे खूप अडचण आहे. पहिली गैरसमजूत आहे कि " मी हे शरीर आहे ". आणि आपण सर्व ह्या धरतीवर उभे आहोत कि जिथे शरीर म्हणजे मी समजले जाते. कारण मूळ पायाच चुकीचा आहे म्हणुन, आपण जे काही करतो, मानतो, समजतो, ते सर्व चुकीचे आहे. कारण मूळ पायाच चुकीचा आहे. म्हणुन सर्वात आधी " मी हे शरीर आहे " ही चुकीची समजूत काढली पाहिजे. ह्यातून बाहेर पडले पाहिजे. ह्याला म्हणतात से तो दर्पणम् मार्जनम् | चित्तरंजन शुद्ध करणे. मला वाटतं कि " मी हे शरीर आहे ", पण मी खरा हा नाही. म्हणुन ह्या गैरसमजूती ला दूर केले पाहिजे. आणि हे सहज शक्य आहे. फक्त हरे कृष्ण महामंत्र जपा. हे प्रायोगिक आहे. म्हणून ही विनंती आहे कि तुमच्यातल्या प्रत्येक नी जर ही सूचना पळाली आणि हरे कृष्ण महा मंत्रांचा जप केला तर तुम्ही काही गमावणार नाही उलट काही कमवालच. ह्या साठी आम्ही इतरांसारखे काही किमत घेत नाही. हे फुकट आहे. कोणी ही घेऊ शकतो. लहान मुलं सुद्धा. आपल्या समाजात कितीतरी मुलं आहेत जी हा मंत्र जपतात आणि आनंदाने नाचतात. त्या साठी शिक्षणाची गरज नाही किंवा त्या साठी काही किंमत मोजावी लागत नाही. तुम्ही मंत्र जप करून एक प्रयोग करून का बघत नाही. ही माझी एक विनंती आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम हरे राम राम राम हरे हरे. कुणी आक्षेप घेऊ शकतं कि " मी तुमच्या हिंदु कृष्णा चे नाव कशाला घेऊ?" आम्ही नाही म्हणत कि फक्त कृष्णाचेच नाव घ्या. परमेश्वराची अनेक नावे आहेत. परमेश्वर अनंत आहे. त्याची नावे पण अनेक अनंत आहेत. पण कृष्ण हे नाम उत्तम आहे. कारण त्याचा अर्थ आहे आकर्षक. तुम्ही आपसात विचार करू शकता. "परमेश्वर महान आहे ". ते सर्व ठीक आहे. ती वेगळी विचारधारा आहे. पण तुम्ही जर असा विचार करत असाल कि "कृष्ण हे हिंदु देवाचे नाव आहे. ते मी कशाला घेऊ?"" तर चैतन्य महाप्रभु म्हणतात, " कि नाही ". जर तुमच्याकडे दुसर्याच्या कुठल्याही देवाचे पर्यायी नाव असेल तर तुम्ही त्याचा जपा करा. तुम्हाला फक्त एवढीच विनंती आहे कि तुम्ही परमेश्वराचे पवित्र नाम जप करा. तुमच्या कडे जर दुसर्याच्या कुठल्याही देवाचे पर्यायी नाव असेल तर तुम्ही त्याचा जाप करा. तुम्ही स्वतः शुद्ध होऊन जाल.