MR/Prabhupada 0430 - चैतन्य महाप्रभु म्हणतात की देवाचे प्रत्येक नांव देवासारखे शक्तिशाली आहे



Lecture on BG 2.11 -- Edinburgh, July 16, 1972

नमनम् अकारी बहुधा निज सर्व शक्तिस तत्रपिता नियमितः स्मरणे न कलह एतद् दृष्टवा कृपा भगवन् मम् आपि दुर्दैवम् चैतन्य महाप्रभु म्हणतात कि प्रत्येक देवा चे नाव परमेश्वरा एवढेच शक्तिशाली आहे. कारण परमेश्वर हा पूर्ण आहे. म्हणून त्याचा नामात व त्याचा रूपात फरक नाही. परमेश्वरा पासून काही निराळ नाही. ते एक संपू्र्ण ज्ञान आहे. अद्वय ज्ञाना । तर तुम्ही जर देवा चे नामस्मरण करता तर तुम्ही देवाशी जोडलेले आहात कारण नाम हे देवा पासुन वेगळे नाही. समजुन घेण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्ही जर अग्नि ला स्पर्श केला तर तुम्हाला पोळेल. कुठल्या प्रकार ची अग्नि आहे, हे तुम्हाला माहित असो किंवा नसो, ते महत्वाचे नाही. जर तुम्ही तिला स्पर्श केला कि पोळेल. हे निश्चित. जर तुम्ही देवा चे नाम घ्याल तर त्याचा परिणाम निश्चित होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही लोखंड आगीत टाकलेे तर, ते तापते, खूप तापते, आणि तापून लाल होऊन जाते. आगी शी संपर्क आल्या मुळे, लोखंडा चे आगित परिवर्तन होते. जेव्हा कि लोखंड आग नाहिय. पण आगी शी संपर्क आल्या मुळे ते आगी सारखं होऊन जातं. आणि कुठे ही स्पर्श केल्यास आगीने तप्त झालेले लोखंड पोळेलच. तसेच तुम्ही परमातम्याशी तादतम्य ठेवले तर तुम्ही पण परमात्मस्वरूप होऊन जाल. परमात्म नाही पण परमात्मस्वरूप होऊन जाल. परमात्मस्वरूप होताच, तुमच्यात विराजमान असणारे सर्व दैवी गुण स्वतः प्रकट होतील. हे विज्ञान आहे. समजुन घ्या. आपण परमात्म्या चेच अंश आहोत. तुम्ही स्वतः चे निरिक्षण आणि अभ्यासाल तर परमात्मा काय आहे, ते कळेल. जर तांदुळाचा गोणितून थोडे तांदुळ काढुन पाहिले तर, कळेल कि तांदुळ कुठल्या दर्ज्याचा आहे. तसेच परमात्मा महान आहे, ते सर्व जाणतात. पण जर स्वतः ला अभ्यासले तर परमात्मा कळु शकतो. जसे समुद्रातून घेतलेल्या पाण्याचा थेंबातून तुम्ही समुद्रात विद्यमान असणारे क्षार आणि रासायनिक तत्वा ची माहिती जाणू शकता. याला ध्यान म्हणतात, स्वतःला जाणायचे कि मी कोण आहे...? जर कुणी स्वतःला जाणाले असेल तर तो परमात्मा्याला पण जाणू शकतो. उदाहरणार्थ, "मी कोण आहे "  ? असे स्वतः वर जरी ध्यान केले तरी, कळेल कि तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ति आहांत. स्वतंत्र व्यक्ति म्हणजे तुम्हाला स्वतःचे स्वतंत्र मत आहे. मला माझे स्वतंत्र मत आहे. म्हणुन आपले आपसात एकमत होत नाही. कारण तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ति आहात व मी एक स्वतंत्र व्यक्ति आहे. आणि कारण आपण सर्व स्वतंत्र व्यक्ति आहोत, परमात्म्याचेेच अंश, तर परमात्मा सुद्धा एक स्वतंत्र व्यक्ति असायला पाहिजे. हा एक अभ्यास आहे. जसा मी एक व्यक्ति आहे, तसा परमात्मा पण एक व्यक्ति आहे जर परमात्मा्याला आपण वास्तविक पिता म्हणतो, परमपिता.... ईसाई धर्म आणि इतर धर्मां मधे अशी मान्यता आहे. आणि आपण ही भगवद्गीतेला मानतो. कारण कृष्णा ने स्वयं म्हटले आहे कि , अहम् बीज् प्रदः पिता (BG 14.4) मीच सर्व प्राणीमात्रां चा पिता आहे. जर परमात्समा सर्व प्राणीमात्रां चा पिता आहे, आणि आपण सर्व प्राणीमात्र आहोत, स्वतंत्र व्यक्ति आहोत.. तर परमात्मा कसा व्यक्ति नाहीय..? तो पण स्वतंत्र व्यक्ति आहे.. ह्याला दर्शन म्हणतात,.....तर्कशास्त्र म्हणतात... ह्या जगात, आपल्याला अनुभव आहे कि आपल्याला कोणावर तरी प्रेम करावेसे वाटते. कोणावर ही....अगदी जंगलात सुद्धा सिंह आपल्या छाव्यावर प्रेम करतो. प्रेम हे असंच आहे... ह्यालाच प्रेम म्हणतात. तर प्रेम करण्याचा स्वभाव देवात ही आहे.. आपण जेव्हा देवाच्या संपर्कात येतो तेव्हा आपली देवाण घेवाण प्रेमा च्या आधारा वर होईल. कृष्णा वर मी प्रेम करतो. आणि कृष्ण माझ्या वर ...ही आपसातली प्रेम भावनांची देवाण घेवाण आहे. अश्या प्रकारे, आध्यात्मात, वैदिक साहित्य न वाचता ही, जर तुम्ही देवा वर एकाग्रचित्त होऊन ध्यान कराल तर तुम्ही देवाला समजू शकाल. कारण मी देवाचा एक अंश आहे. मी एक छोटासा कण आहे. जसा सुवर्णा चा कण पण सुवर्णच असतो. समुद्राचा एक थेंब पण खारट असतो. जसा समुद्र असतो. तसेच आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वा वर अभ्यास केला तर आपण देवाला समजू शकतो. ही एक बाजू झाली. आणि परमात्मा स्वतः स्वतःला उजागर करतो, कृष्ण... तो म्हणतो, यदा यदा ही धर्मस्य..... दुष्टांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मी व्यक्त होतो. पण लक्षात ठेवा , परमात्मा संपूर्ण आहे. सज्जनांचे रक्षण व दुष्टांचा संहार, दोन्ही क्रिया एकसारख्याच आहे. कारण वेदांमधून आपण शिकतो कि परमात्म्याकडुन संहार झालेल्या दुष्टांना सुुद्धा अंततः मुक्ति मिळते. कारण त्याचा संहार करणार्या परमात्मा्याचा त्याला स्पर्श झालाय. म्हणून हे एक महान शास्त्र आहे. ही एक साधी भावना नाही. हे तत्वज्ञान आणि अधिकृत वैदिक साहित्वयावर आधारित आहे. तर आमची एवढीच प्रार्थना आहे कि तुम्ही याच्या बद्दल गांभिर्या ने पाऊल उचलण्या चा प्रयत्न करा आणि आनंदी व्हा.