MR/Prabhupada 0436 - सर्व बाबतीत आनंदी राहील, आणि तो फक्त कृष्ण भावानेमध्ये रस घेईल
Lecture on BG 2.8-12 -- Los Angeles, November 27, 1968
भक्त: श्लोक ११, पुरुषोत्तम भगवान म्हणाले: " तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाहीत"(भ.गी. २.११) | तात्पर्य: भगवंतांनी तात्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. भगवंत म्हणाले कि, "तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस पण तू जाणत नाहीस की, जो विद्वान आहे, ज्याला शरीर आणि आत्म्याचे ज्ञान आहे तो शरीराच्या कोणत्याही अवस्थेबद्दल शोक करीत नाही, जीविताबद्दलही नाही किंवा मृतावस्थेबद्दलही नाही,' पुढील अध्यायांमध्ये सागितल्याप्रमाणे जड व चेतन आणि उभयतांच्या नियंत्रकाला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता, पण त्याला माहित नव्हते की, धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा यांबद्दलचे ज्ञान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव आणायला नको होता. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे, जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल व्यर्थ शोक करीत होता. या शरीराचा जन्म झाला आहे, आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे. म्हणून आत्म्याइतके हे शरीर महत्वपूर्ण नाही, हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे. भोतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत नाही."
प्रभुपाद : ते म्हणाले, श्रीकृष्ण सांगतात, कि "हे शरीर मृत किंवा जिवंत असले तरी शोक करण्याचे कारण नाही." मृत शरीर,कल्पना करा जेव्हा शरीर मृत होते, त्याला काही महत्व राहत नाही. शोक करण्यात काय अर्थ आहे? तुम्ही हजारो वर्षे शोक करु शकता, ते जिवंत होणार नाही. म्हणून मृत शरीरासाठी शोक करण्याचे काही कारण नाही. आणि जोपर्यंत आत्म्याचा संबंध आहे, तो चिरंतन आहे जरी तो मृत भासला, किंवा या शरीराच्या मृत्यू नंतर, तो मरत नाही. तर एखादा का शोकात बुडेल, "ओह, वडील वारले, माझे नातलग वारले," आणि रडेल? तो वारला नाही. हे ज्ञान असणे आवश्यक आहे. मी सर्व बाबतीत तो आनंदी असेल, आणि तो फक्त कृष्ण भावानेमध्ये रस घेईल. जिवंत किंवा मृत शरीरासाठी रडण्यासारखे काही नाही. ते या अध्यायात श्रीकृष्णांनी सांगितले आहे. पुढे जा.
भक्त: ज्याकाळी मी, तू, आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यकाळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही (भ.गी. २.१२) " तात्पर्य: "वेदामध्ये, कठोपनिषदामध्ये आणि श्वेताश्वतर उपनिषदामध्ये असे सांगितले आहे की..."
प्रभुपाद: (उच्चार सुधारतात) श्वेताश्वतर. अनेक उपनिषद आहेत, त्यांना वेद म्हणतात. उपनिषद वेदांचे शीर्षक आहे. ज्याप्रमाणे अध्ययाला शीर्षक असते, त्याचप्रमाणे हि उपनिषदे वेदांचे शीर्षक आहे. मुख्य १०८ उपनिषदे आहे. त्यापैकी नऊ उपनिषद खूप महत्वाची आहेत. तर या नऊ उपनिषदांपैकी, श्वेताश्वतर उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, ऐतरेय उपनिषद, ईशोपनिषद ईश उपनिषद, मुण्डक उपनिषद, मांडुक्य उपनिषद, कठोपनिषद, हि उपनिषदे खूप महत्वाची आहेत. आणि जेव्हाकेव्हा काही मुद्यांवर वाद होतो, या उपनिषदांमधून संदर्भ द्यावा लागतो.