MR/Prabhupada 0437 - शंख खूप शुद्ध आणि दिव्य मानला जातो



Lecture on BG 2.8-12 -- Los Angeles, November 27, 1968

जर एखादा उपनिषदांमधून संदर्भ देऊ शकला, तर त्याच्या युक्तिवादाला वजन येते. शब्द-प्रमाण. प्रमाण म्हणजे पुरावा. प्रमाण… जर तुम्हाला फायदा हवा असेल तुमच्याबाबतीत… ज्याप्रमाणे न्यायालयात चांगल्याप्रकारे पुरावे द्यावे लागतात. त्याचप्रमाणे, वैदिक संस्कृतीनुसार, प्रमाण असते. . प्रमाण म्हणजे पुरावा. शब्द-प्रमाण. वैदिक संस्कृतीत तीन प्रकारचे पुरावे विद्वानांनी स्वीकारले आहेत. एक पुरावा आहे प्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे पाहणे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला पाहत आहे, तुम्ही मला पहात आहात. मी उपस्थित आहे, तुम्ही उपस्थित आहात. हे प्रत्यक्ष पहाणे आहे.

आणखीन एक दुसरा पुरावा आहे ज्याला अनुमान म्हणतात. समजा त्या खोलीत, आणि मी आताच येत आहे, मला माहित नाही तिथे कोणी व्यक्ती आहे की नाही. पण तिथे काहीतरी आवाज येत आहे, मी कल्पना करू शकतो, "ओह, तिथे कोणीतरी आहे." याला अनुमान म्हणतात. तर्कशास्त्रात याला गृहीतक म्हणतात. तो सुद्धा पुरावा आहे. जर माझ्या प्रामाणिक सूचनांद्वारे मी पुरावा देऊ शकलो, तर तो देखील स्वीकारला जाईल. तर प्रत्यक्ष पुरावा, आणि ज्याला म्हणतात, गृहीतक किंवा सूचना पुरावा. पण ठाम पुरावा शब्द-प्रमाण आहे. शब्द, शब्द-ब्रह्मन. त्याला वेद म्हणतात. जर एखादा वेदांचा संदर्भ देऊन पुरावा देऊ शकला, तर तो स्वीकारलाच पाहिजे. कोणीही वैदिक पुरावा नाकारू शकत नाही. ती पद्धत आहे. हे कसे आहे? चैतन्य महाप्रभूंनी खूप चांगले उदाहरण दिले आहे. ते वेदांमध्ये आहे.

ज्याप्रमाणे आपण शंख देव्हाऱ्यात ठेवतो . शंख खूप शुद्ध, दिव्य मानला जातो नाहीतर अपण तो कसा देवासमोर ठेऊ, आणि वाजवू? आपण शंखाने पाणी वाहतो. आपण कसे वाहू शकू? पण शंख काय आहे? शंख प्राण्याचे हाड आहे. दुसरे काही नसून जनावराचे हाड आहे. पण वैदिक आज्ञा आहे की जर तुम्ही प्राण्याच्या हाडाला स्पर्श केला, तुम्हाला ताबडतोब आंघोळ करावी लागेल. तुम्ही अपवित्र बनता आता एखादा म्हणेल, "ओह, हा विरोधाभास आहे. एका ठिकाणी असे म्हटले आहे कि जर तुम्ही प्राण्याच्या हाडाला स्पर्श केलात. तर तुम्हाला त्वरित आंघोळ करून स्वतःला शुद्ध करावे लागेल, आणि इथे प्राण्याचे हाड देव्हाऱ्यात. तर हा विराधभास नाही का? जर प्राण्याचे हाड अपवित्र आहे, तर ते तुम्ही कसे देव्हाऱ्यात ठेऊ शकता? आणि जर प्राण्याचे हाड पवित्र असेल, तर अपवित्र झालो म्हणून आंघोळ करण्यात काय अर्थ आहे?" तुम्हाला यासारखाच विरोधाभास वैदिक आदेशात आढळेल. पण वेद सांगतात की प्राण्याचे हाड अपवित्र आहे, तुम्हाला ते स्वीकारले पाहिजे. पण हे प्राण्याचे हाड, शंख, पवित्र आहे.

ज्याप्रमाणे काहीवेळा आमचे शिष्य गोंधळतात जेव्हा आम्ही सांगतो की कांदा खायचा नाही, पण कांदा भाजी आहे. तर शब्द-प्रमाण म्हणजे, वैदिक पुरावा वादविवाद न करता स्वीकारला पाहिजे. त्याला अर्थ आहे; तिथे विरोधाभास नाही. त्याला अर्थ आहे. ज्याप्रमाणे अनेक वेळ मी सांगितले आहे की गायीचे शेण. वैदिक प्रमाणानुसार, गायीचे शेण शुद्ध आहे. खरेतर भारतात ते जंतुनाशक म्हणून वापरले जाते. मुख्यतः गावात, तिथे मोठ्या प्रमाणात गायीचे शेण असते, आणि त्याने ते संपूर्ण घर सारवून जंतुनाशक बनवतात. आणि वास्तविक गायीचे शेण तुमच्या खोलीत सारवाल्यानंतर, जेव्हा ते सुकते, तुम्हाला उत्साही वाटेल, सर्वकाही जंतू विरहित. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि डॉक्टर घोष, एक महान रसायनशास्त्रज्ञ, त्यांनी शेणाची तपासणी केली, की गायीचे शेण वैदिक साहित्यात इतके महत्वाचे का आहे? त्यांना आढळले की शेणात सर्व जंतुनाशक गुणधर्म असतात.