MR/Prabhupada 0439 - माझ्या अध्यात्मिक गुरूने मला एक मोठा मूर्ख शोधला
Lecture on BG 2.8-12 -- Los Angeles, November 27, 1968
तद् विज्ञानार्थं स गुरुम् इवाभिगछेत (मु.उ.१.२.१२). तद् विज्ञानार्थं, ते दिव्य विज्ञान शिकण्यासाठी, एखाद्याला गुरु स्वीकारावा लागेल. गुरुम एव, नक्कीच, आवश्यक आहे, नाहीतर तिथे शक्यता नाही. म्हणून श्रीकृष्णांचा इथे अर्जुनाचे गुरु म्हणून स्वीकार केला आहे. आणि गुरु म्हणून, किंवा वडील म्हणून, किंवा शिक्षकांना अधिकार आहे त्याच्या मुलाला किंवा शिष्याला ओरडण्याचा... एक मुलगा कधीही नाराज होत नाही जेव्हा वडील ओरडतात. . तो सर्वत्र शिष्टाचार आहे. अगदी कधीकधी वडील हिंसक होतात, मूल किंवा मुलगा सहन करतो. ठराविक उदाहरण प्रल्हाद महाराज आहे. अल्लड मूल, कृष्ण भावनामृत मुलगा, पण वडील छळ करीत होते. त्यांनी कधीही काही म्हटले नाही. "ठीक आहे." त्याचप्रमाणे कृष्ण, गुरुचे पद स्वीकारल्यावर, अर्जुनाला मूर्ख म्हणून संबोधले. ज्याप्रमाणे चैतन्य महाप्रभु देखील म्हणाले की " माझ्या गुरूंना मी महामूर्ख वाटलो (चै. च. आदी ७.७१)." चैतन्य महाप्रभु मूर्ख होते? कोणीही चैतन्य महाप्रभूंचा गुरु बनणे हे शक्य आहे का? दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. चैतन्य महाप्रभुनी स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार म्हणून स्विकारले नाही. जर आपण त्यांना फक्त सामान्य विद्वान किंवा व्यक्ती म्हणून स्विकारले, तरी त्यांच्या विद्वत्तेची तुलना नाही. पण ते म्हणाले की "माझ्या अध्यात्मिक गुरूंना मी महामूर्ख वाटलो." त्याचा काय अर्थ आहे? की " अगदी माझ्या सारखा माणूस त्याच्या अध्यात्मिक गुरु समोर नेहमी अज्ञानी राहतो. ते त्याचंसाठी चांगले आहे." असे कोणीही म्हणू नये की "तुम्हाला काय माहित आहे? मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे." हि स्थिती नाकारली जात नाही. आणि दुसरा मुद्दा आहे, शिष्याच्या दृष्टीने, एखाद्या व्यक्ती समोर तो का नेहमी मूर्ख बनून राहील? जोपर्यंत तो प्रत्यक्षात अधिकृत, महान नाही की तो मला मुर्ख म्हणून शिकवेल. एखाद्याने अशा पद्धतीने अध्यात्मिक गुरुची निवड केली पाहिजे आणि एकदा का अध्यात्मिक गुरु निवडला, त्याने कायम मूर्ख बनून राहिले पाहिजे, जरी तो मूर्ख नसला तरी, पण चांगली स्थती हि आहे. तर अर्जुन मित्र म्हणून समान पातळीवर राहण्यापेक्षा, स्वेच्छाने श्रीकृष्णा समोर मूर्ख बनून रहाणे स्वीकारले. आणि श्रीकृष्णांनी ते स्वीकारले की "तू मूर्ख आहेस. तू विद्वान व्यक्तीप्रमाणे बोलत आहेस, पण तू मूर्ख आहेस, कारण तू जड प्रकृतीसाठी दुःख करीत आहेस ज्यासाठी कोणतीही विद्वान व्यक्ती दुःख करणार नाही." म्हणजे "एक मूर्ख शोक करतो," की "तू मूर्ख आहेस. म्हणून तू मूर्ख आहेस." हा गोल मार्ग आहे… ज्याप्रमाणे काय म्हणतात ते तर्कशास्त्र? कंस ( )? किंवा त्याच्यासारखे काहीतरी, होय, जर मी म्हणालो की "तू त्या माणसासारखा दिसतोस ज्याने माझे घड्याळ चोरले." त्याचा अर्थ "तू चोरासारखा दिसतोस." त्याचप्रमाणे श्रीकृष्ण, गोल फिरवून सांगतात की "माझ्या प्रिय अर्जुना, तू विद्वाना प्रमाणे बोलत आहेस, पण तू जड प्रकृतीसाठी शोक करीत आहेस ज्याच्यासाठी कोणतीही विद्वान व्यक्ती शोक करीत नाही."