MR/Prabhupada 0440 - मायावादि सिद्धांत असा आहे की परम आत्मा एक प्रतिरूपी आहे



Lecture on BG 2.8-12 -- Los Angeles, November 27, 1968

प्रभुपाद: पुढे वाचा. 

भक्त: "श्वेताश्वतर उपनिषदामध्ये,  असे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम श्रीभगवान असंख्य जीवांचे पालनकर्ता आहेत.  वैयक्तिक कर्मांनुसार आणि कर्मफलांनुसार त्यांच्या विविध अवस्थांमध्ये. तेच पुरुषोत्तम भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत  जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात, त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते.   अर्जुनाला जे वैदिक सत्य सांगण्यात आले ते जगातील व्यक्तींनाही  विशेषकरून ज्यांच्याकडे अतिशय तोकडे ज्ञान आहे पण स्वतः विद्वान असल्याचा देखावा करतात,  भगवान स्पष्टपणे सांगतात की, ते स्वतः, अर्जुन आणि युद्धभूमीवर जमलेले राजे,  या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते, बद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच  नित्य पालनकर्ता आहेत." 

प्रभुपाद: मूळ श्लोक काय आहे? तू वाच. 

भक्त: "ज्याकाळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता… (भ.गी. २.१२)"

प्रभुपाद: आता,  "ज्याकाळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आता ते विश्लेषणात्मकरित्या सांगत आहेत, "मी, तू,आणि…" पहिली व्यक्ती दुसरी व्यक्ती, आणि तिसरी व्यक्ती. हे पूर्ण आहे. "मी, तू, आणि इतर सर्व." तर श्रीकृष्ण सांगतात, "असा काळ नव्हता जेव्हा मी, तू,  ह्या सर्व व्यक्ती ज्या युद्धभूमीवर जमल्या आहेत अस्तित्वात नव्हत्या." याचा अर्थ "भूतकाळात, मी, तू, आणि हे सर्व, त्यांचे व्यक्तिगत अस्तित्व होते." वैयक्तिकरित्या. मायावादी सिद्धांत आहे की परम आत्मा अवैयक्तिक आहे.  मग श्रीकृष्ण कसे म्हणू शकतात की  "ज्याकाळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता?" त्याचा अर्थ, मी व्यक्तिगत रूपात अस्तित्वात आहे, तू व्यक्तिगत रूपात अस्तित्वात आहेस,  आणि या सर्व व्यक्ती ज्या आपल्यासमोर आहेत, त्या देखील व्यक्तिगत रूपात अस्तित्वात आहेत. असा काळ कधी नव्हता." दीनदयाळ, आता, तुझे काय उत्तर आहे? श्रीकृष्ण कधी म्हणत नाहीत की आपण सर्व एकमेकांमध्ये मिसळलेलो आहोत. आपण स्वतंत्र्य व्यक्ती आहोत.  आणि ते म्हणतात, असणार नाही…  असा कधी काळ नसेल जेव्हा आपण अस्तित्वात नाही." त्याचा अर्थ भूतकाळात आपण व्यक्तिगत रूपात अस्तित्वात होतो, यात काही शंका नाही की वर्तमान काळात आपण अस्तित्वात आहोत.  आणि भविष्यकाळात देखील, आपण व्यक्तिगत रूपात राहू.  मग अवैयक्तिक संकल्पना कुठून येते? भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळात तीन काळ आहेत. होना? सर्व काळात आपण व्यक्तिगत रूपात आहोत.  मग देव कधी अवैयक्तिक बनला किंवा मी अवैयक्तिक बनलो, किंवा तू अवैयक्तिक बनलास? संधी कुठे आहे? श्रीकृष्णांनी स्पष्टपणे सांगतात, "ज्याकाळी मी, तू आणि हे सर्व राजे किंवा सैनिक नव्हते असा काळ कधीही नव्हता...   असे नाही की आपण भूतकाळात अस्तित्वात नव्हतो." तर भूतकाळात वैयक्तिकरूपात अस्तित्वात होतो,  आणि सध्या यात काही शंका नाही. आपण स्वतंत्रपणे अस्तित्वात आहोत.  तू माझा शिष्य आहेस, मी तुझा गुरु आहे, पण तुला तुझे स्वतंत्र व्यक्तित्व मिळाले आहे, मला माझे व्यक्तित्व मिळाले आहे.  जर तू माझ्याशी सहमत नसल्यास, तू मला सोडू शकतोस. ते तुझे स्वतंत्र व्यक्तित्व आहे.  तुला  कृष्ण आवडत नसल्यास, तू कृष्ण भावनामृत बनू  शकत नाहीस, ते तुझे व्यक्तित्व आहे.  तर हे व्यक्तित्व चालू ठेवा. त्याचप्रमाणे कृष्ण, जर त्याना तू आवडत नसल्यास, ते तुझे कृष्ण भावनामृत नाकारू शकतात.  असे नाही की तू सर्व नियमांचे अनुसरण करीत आहेस, तर कृष्ण तुझा स्वीकार करण्यासाठी बांधील आहेत. नाही.  जर त्यांनी विचार केला "हा मूर्ख आहे; मी त्याचा स्वीकार करू शकत नाही," ते तुला नाकारू शकतात.  तर त्याला स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तुला स्वतंत्र व्यक्तित्व आहे, सर्वाना स्वतंत्र व्यक्तित्व मिळाले आहे.  अवैयक्तिकचा प्रश्न कुठून येतो? त्याची शक्यता नाही.  आणि जर तू कृष्णावर विश्वास ठेवत नाहीस, तर तू वेदांवर विश्वास ठेवत नाहीस  हे सर्व सोडून. कृष्ण परम अधिकारी, भगवान म्हणून स्वीकारले आहेत.  मग जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, तर ज्ञानात प्रगती होण्याची शक्यता कुठे आहे? त्याची शक्यता नाही.  तर व्यक्तित्वाचा काही प्रश्नच येत नाही. हे अधिकाऱ्यांचे मत आहे.  आता, अधिकाऱ्यांच्या माता व्यतिरिक्त, तूला तुझे विवेक आणि युक्तिवाद लागू करावे लागतील.   तू सांगू शकतोस का दोन पक्षात समेट आहे? नाही. तू अभ्यास कर, राज्यात, कुटुंबात, समाजात, राज्यात जा, कुठेही समेट नाही.  अगदी विधानसभेमध्ये, अगदी तुझ्या देशात  समाजा सेनेट मध्ये प्रत्येकजण देशाचे हित पाहतो, पण तो आपल्या  व्यक्तिगत रूपाने विचार करीत आहे.  आपण विचार करीत आहोत की "माझ्या देशाचे कल्याण अशा प्रकारे होईल." नाहीतर, अध्यक्षांच्या मतदानाच्या वेळी स्पर्धा का आहे? प्रत्येकजण सांगतो की "अमेरिकेला निक्सनची गरज आहे." आणि दुसरी व्यक्ती, ती देखील सांगते, अमेरिकेला माझी गरज आहे." पण दोन का? जर अमेरिका तू, आणि तुम्ही दोघे आहेत… नाही. व्यक्तित्व आहे.  श्री. निक्सनचे मत काही वेगळे आहे. दुसऱ्या उमेदवाराचे मत आणखी काही वेगळे आहे.  राज्यसभेत, सिनेटमध्ये, काँग्रेसमध्ये, संयुक्त राष्ट्रांमध्ये,  प्रत्येकजण आपल्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून भांडत आहेत.  नाहीतर जगात इतके झेंडे का आहेत?  तुम्ही म्हणू शकत नाही सगळीकडे अवैयक्तिकता  व्यक्तित्व सगळीकडे प्रबळ आहे.  सगळीकडे व्यक्तिमत्व, व्यक्तित्व प्रबळ आहे. तर आपण स्वीकारले पाहिजे.  आपण आपला विवेक, युक्तिवाद वापरला पाहिजे आणि अधिकाऱ्यांना स्वीकारले पाहिजे.  मग प्रश्न सुटेल. नाहीतर तो सगळ्यात कठीण आहे.