MR/Prabhupada 0442 - ख्रिश्चन धर्मशास्त्रात, एखाद्याने देवाला प्रार्थना केली, 'आम्हाला आमची रोजची भाकर द्या'



Lecture on BG 2.8-12 -- Los Angeles, November 27, 1968

भक्त: "श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की भविष्यात देखील भगवंतांचे आणि इतरांचे व्यक्तित्व असेल.  जसे याला उपनिषदांमध्ये पुष्टी दिली आहे. अनंतकाळ सुरु राहील. श्रीकृष्णांचे हे विधान अधिकृत आहे."

प्रभुपाद: होय, उपनिषद सांगते नित्यो नित्यानाम  आता नित्य म्हणजे अनंत, आणि सर्वोच्च भगवान परम अनंत आहेत,  आणि आपण व्यक्तिगत आत्मे, आपण देखील अनंत आत्मे आहोत.  तर ते मुख्य नेता आहेत. एको बहुनां.. ते कसे नेता आहेत? ऐको बहुनां विदधाति कामान.   ते एक, एकल संख्या. व्यक्ती. ते इतर अनंतांच्या गरजा पुरवतात.  या गोष्टी वेदामध्ये स्पष्टपणे सांगितल्या आहेत. आणि खरेतर आपण अनुभवत आहोत.  जसे इसाई धर्मशास्त्रात, व्यक्ती चर्चमध्ये जातात आणि भगवंतांकडे प्रार्थना करतात.  "आम्हाला आमची रोजची भाकरी द्या." तो का भगवंतांकडे मागतो? अर्थात, हे नास्तिक लोक आता त्यांना शिकवतात, "भाकरी कुठे आहे?" तुम्ही चर्चमध्ये जाता. आमच्याकडे या; आम्ही तुम्हाला भाकरी देऊ." तर वैदिक विचार देखील आहेत. वेद सांगतात, एको बहुनाम विदधाति कामान.  ते एक परम अनंत आहेत, ते पुरवठा करीत आहेत, ते इतर अनंत व्यक्तींचे पालन करीत आहेत.  आणि बायबल देखील सांगते की "तुम्ही जा, आणि भगवंतांकडे आपली भाकरीची मागणी करा." आणि बायबल देखील सांगते की "तुम्ही जा, आणि भगवंतांकडे आपल्या भाकरीची मागणी करा." तर जोपर्यंत भगवंत पालन आणि पुरवठा करणार नाही, हा हुकूम का आहे?  आणि वेद स्पष्टपणे सांगतात हि स्थिती आहे. ते सर्वोच्च आहेत.  आणि हे जाणल्यावर आपण शांत होऊ शकतो.  तो वैदिक हुकूम आहे. पुढे वाच.

भक्त: "हे श्रीकृष्णांचे विधान अधिकृत आहे कारण कृष्ण भ्रमाचे अधीन असू शकत नाहीत…" 

प्रभुपाद: होय. जर मायावादी तत्वज्ञानी म्हणतात की हे श्रीकृष्णांचे विधान माया आहे.  की श्रीकृष्ण म्हणतात की 'प्रत्येकजण भूतकाळात व्यक्ती होता.' नाही. भूतकाळात प्रत्येकजण एक होता, एकसंध, एक जातीय.  मायेमुळे, आपण व्यक्ती बनलो आहोत." जर मायावादी अशा प्रकारे म्हणतील, तर कृष्ण बद्ध आत्म्यातील एक बनेल  ते करत नाहीत… ते त्यांचे अधिकार गमावतील. कारण बद्ध आत्मा तुम्हाला सत्य देऊ शकत नाहीत.  मी बद्ध जीव आहे. मी असे काही सांगू शकत नाही जे निरपेक्ष आहे.  तर श्रीकृष्णांना पूर्ण रूपाने स्वीकारले जाते.  म्हणून जर मायावादी सिद्धांत स्वीकारला, तर श्रीकृष्णांच्या सिद्धांतांना नाकारले पाहिजे.  जर श्रीकृष्णांना नाकारले तर कृष्णाची पुस्तके, भगवद्-गीता वाचायची काही गरज नाही.    ते निरर्थक आहे, वेळेचा अपव्यय. जर ते आपल्यासारखे बद्ध जीव असले...  कारण आपण कोणतीही सूचना बद्ध जीवांकडून घेऊ शकत नाही.  तर आध्यात्मिक गुरु, जर तुम्ही त्यांना बद्ध आत्मा समजता,  पण ते काहीही आपल्या मताने बोलत नाहीत. ते जे श्रीकृष्णांनी संगितले आहे तेच सांगतात.   तर जोपर्यंत... वैदिक सिद्धांत आहे की जोपर्यंत आपण भौतिक बद्ध अवस्थेतून मुक्त होत नाही, तो कोणतेही परिपूर्ण ज्ञान देऊ शकत नाही.  बद्ध आत्मा, तो कितीही शैक्षणिकदृष्टया प्रगत, शिकलेला असेल, तो आपल्याला परिपूर्ण ज्ञान देऊ शकत नाही.  केवळ तोच जो भौतिक स्थतीतून मुक्त आहे, तो परिपूर्ण ज्ञान देऊ शकतो  त्याचप्रमाणे शंकराचार्य ते देखील मायावादी आहेत, पण ते स्वीकार करतात श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकाऱ्याच्या रूपात.  स भगवान स्वयं कृष्ण, "कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत." आधुनिक मायावादी तत्वज्ञानी , ते  शंकराचार्यांचे हे विधान उघड करीत नाहीत.   लोकांना फसवण्यासाठी. पण शंकराचार्यांचे विधान आहे. आम्ही पुरावा देऊ शकतो.  पण ते स्वीकार करतात श्रीकृष्णांचा सर्वोच्च अधिकाऱ्याच्या रूपात.  त्यांनी श्रीकृष्णांची स्तुती किंवा पूजा करण्यासाठी अनेक छान कविता लिहिल्या आहेत.   आणि शेवटच्या क्षणी त्यांनी सांगितले, भज गोविंदं भज  गोविंदं भज  गोविंदं मूढ-मते.  "तुम्ही मुर्ख. ओह, तुम्ही समजण्यासाठी व्याकरणावर अवलंबून आहात" "हा सर्व मूर्खपणा आहे."  भज  गोविंदं. "केवळ गोविंदाची पूजा करा."  भज  गोविंदं भज... त्यांनी तीन वेळा सांगितले.  "केवळ गोविंदाची पूजा करा." भज  गोविंदं भज गोविंदं भज  गोविंदं ज्याप्रमाणे चैतन्य महाप्रभूंनी तीन वेळा सांगितले, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम (चै.च आदि १७.२१).   तीन वेळा म्हणजे जास्त जोर देणे.  ज्याप्रमाणे आपण काहीवेळा म्हणतो, "तू हे कर, हे कर, हे कर," त्याचा अर्थ नकार नाही. सर्व ताणतणाव संपवा.  म्हणून जेव्हा एखाद्या गोष्टीवर तीन वेळ जोर दिला जातो, त्याचा अर्थ अंतिम.  तर शंकराचार्य सांगतात, भज  गोविंदं भज  गोविंदं भज  गोविंदं  मूढ-मते.  मूढ, मूढ मी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. मूढ म्हणजे मूर्ख, गाढव.  तुम्ही तुमच्या व्याकरणाच्या समजुतीवर अवलंबून आहात.दुकरून करणे.  दुकरून, हे व्याकरणाचे प्रत्यय आणि उपसर्ग आहेत. प्रत्यय, प्रकरण.  तर तुम्ही मौखिक मूळावर अवलंबून आहात, ते मौखिक मूळ,  आणि तयार करता, तुम्ही अर्थाची व्याख्या करता. निराळ्या तर्हेने. हा सर्व मूर्खपणा आहे.  हे डुकरेन करणे, तुमची व्याकरणातील शब्दांची फसवेगिरी, तुम्हाला मृत्यू समयी वाचवणार नाही  तुम्ही मूर्ख, केवळ गोविंदाची पूजा करा,गोविंद, गोविंद.  शंकराचार्यची ती देखील सूचना आहे.  कारण ते भक्त होते, ते महान भक्त होते.  पण ते नास्तिक असल्याचे नाटक करीत होते कारण ते नास्तिकांच्या संगतीत रहायचे.  जोपर्यंत ते स्वतःला नास्तिकाच्या रूपात सादर करीत नाहीत तोपर्यंत नास्तिक अनुयायी त्यांचे ऐकणार नाहीत.  म्हणून काही वेळापुरता त्यांनी मायावाद सादर केला.  मायावादी तत्वज्ञान कायमचे स्वीकारले जाऊ शकत नाही.  शाश्वत तत्वज्ञान भगवद्-गीता  आहे. तो निर्णय आहे.