MR/Prabhupada 0445 - नारायणाशी बरोबरी करण्याची ही एक फॅशन बनली आहे



Lecture on SB 7.9.2 -- Mayapur, February 12, 1977

भाषांतर - "भाग्य देवता लक्ष्मी जी" यांना देवांनी विनंती केली की भगवंता समोर जावे, कारण भीती मुळे देव जाऊ शकत नव्हते. पण लक्ष्मीने सुध्दा भगवंतांचे ऐवढे आश्चर्यकारक आणि विलक्षण रूप बघितले नव्हते. म्हणून लक्ष्मी भगवंताकडे जाऊ शकले नाही

प्रभुपाद- साक्षात श्री प्रेषित देवै दृष्ट्वा तं महद अभुतं अदृष्टा सुरूत पूर्व त्वात सानोपी अय संकिता श्री लक्ष्मी, ती नेहमी भगवान नारायण सोबत असते लक्ष्मी नारायण. जेथे जेथे नारायण, तेथे तेथे लक्ष्मी. (विष्णू पुराण ६.५.४७) भगवान हे नेहमी सहा ऐश्वर्याने परी पूर्ण असतात कोणी ही त्यांचे शी बरोबरी करू शकत नाही. या भौतिक जगात, स्पर्धा सुरू असते. तुला १ हजार मिळाले, मला २ हजार मिळाले, कुणाला दुसऱ्याला ३ हजार किंवा ३ लाख मिळाले. पण कोणीही असे म्हणू शकत नाही की "मला सर्व पैसे मिळाले" नाही. हे शक्यच नाही. येथे स्पर्धा असणार च. सम म्हणजे समता, उर्ध्व म्हणजे मोठा. कोणी ही भगवान नारायण शी बरोबरी करू शकत नाही आणि त्यांचे पेक्षा मोठा होऊ शकत नाही. आजकाल ही फॅशन बनली आहे की दारिद्र्य नारायण नाही. दरिद्री नारायण असू शकत नाही किंवा नारायण दरिद्री असू शकत नाही. कारण नारायण सोबत नेहमी लक्ष्मी असते. तर नारायण कसे काय दरिद्री असू शकतात? या निर्माण केलेल्या मूर्ख कल्पना आहेत. अपराध. (चैतन्य चारितामृत मध्य १८.११६) शास्त्र सांगतात, यास तू नारायणम देवम. नारायण भगवान....ब्रह्म रुद्रादी दैवत. दरिद्राचे काय, जर नारायण चे बरोबरी मोठे मोठे देवांशी बरोबरी केली. जसे ब्रह्मा किंवा शिवा एखाद्याने विचार केला की "नारायण हे ब्रह्मा किंवा शिवा सारखे आहेत" तात्काळ तो पाखंडी होतो पाखंडी म्हणजे सर्वात वाईट. हे शास्त्रांनी सांगितले आहेत. संस्कृत श्लोक. ही एक फॅशन बनली आहे की नारायणाची कोणाशी ही बरोबरी करायची. तर अशा प्रकारे भारताची संस्कृती उध्वस्त झाली आहे. भगवान नारायण ची बरोबरी कोणाशी होऊ शकत नाही. नारायण स्वतः भगवदगीता मध्ये सांगतात -" मत्त: परतलं नान्यत्किन्चिदस्ति धनंजय" एक शब्द आहे -"असमोर्ध्व" कोणीही नारायणा शी किंवा विष्णू तत्त्वाशी बरोबरी करू शकत नाही. कधीही नाही ओम तर विष्णू परमहंस सदा पष्यन्ति सूर्य: (रिग्वेद १.२२.२०) हा रिग मंत्र आहे. विष्णू पदं परमं पदं भगवंतांना अर्जुन संबोधतात, परं ब्रम्हा परं धाम पवित्रं परमं भवान. परमं भवान. ही पाखंडी कल्पना अध्यात्मिक प्रगती मध्ये अडथळा आणते. मायावाद. मायावाद. म्हणून चैतन्य महा प्रभूंनी मायावादी सोबत संगती करण्यास मनाई केली आहे.. मायावादी भाष्य सूनीले होय सर्व नाश. "ज्याने मायावादी सोबत संगती केली आहे, त्याचे अध्यात्मिक जीवन संपले समजावे. सर्व नाश. मायावादी होय कृष्णा अपराधी. मायावादींना काळजी पूर्वक टाळले पाहिजे. "नारायण दरिद्री झाले" हे कधीही शक्य नाही. कधीच शक्य नाही. नारायण हे नेहमी साक्षात श्री (लक्ष्मी) सोबत असतात. श्री, विशेषतः येथे, श्री लक्ष्मी चा संदर्भ आहे, की ती नेहमी नारायण सोबत असते. या श्री चा विस्तार वैकुंठ लोक पर्यंत आहे. लक्ष्मी सहस्र सत संभ्रम सेव्य मानं (Bs ५.२९) फक्त एक लक्ष्मी नाही, तर सहस्र लक्ष्मी भगवंतांची सेवा करत आहेत. आपण संभ्रम पूर्वक लक्ष्मी ला प्रार्थना करतो, "माते, आम्हाला थोडे पैसे द्या" आम्हाला थोडी मदत करा. आम्ही कदाचित सुखी होऊ. " आपण श्री ला प्रार्थना करतो. तरीही, ती श्री थांबत नाही. श्री चे दुसरे नाव आहे चंचला. चंचला, ती भौतिक जगतात आहे. आज मी करोडपती असेल, उद्या मी रस्त्यावर चा भिकारी असेल. कारण सारे ऐश्वर्या हे पैसे वर आधारित आहे. पैसे ला कोणीही थांबवू शकत नाही. हे अशक्य आहे. ही श्री चंचल आहे. ते भगवंतांची आदराने सेवा करतात. येथे आपण विचार करतो, " लक्ष्मी ने जाऊ नये." पण तेथे, श्री विचार करतात की "कृष्णा ने जाऊ नये". हा फरक आहे. येथे आपल्याला भीती वाटते की लक्ष्मी निघून जाईल, पण तेथे लक्ष्मी ना भीती वाटते की कृष्णा सोडून जातील हा फरक आहे. हे कृष्णा, हे नारायण कसे दरिद्री होऊ शकतात? ही एक कल्पना च आहे.