MR/Prabhupada 0447 - भगवंत म्हणजे नुसती कल्पना समजणार्‍या बरोबर मिसळु नका



Lecture on SB 7.9.2 -- Mayapur, February 12, 1977

लक्ष्मी नारायण यांना आपण बघितले तर आपण दरिद्री नारायण असे कदापि बोलू नये. नाही. आपण असे पाखंडी चे कधी ही ऐकू नये... (चैतन्य चारितामृत मध्य १८.११६) पाखंडी म्हणजे राक्षस किंवा नास्तिक. जे अभक्त भगवंतांची कल्पना करतात, अशांसोबत कधीही संगती करू नये. ते भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत. हे पाखंडी म्हणजे जे भगवंता वर विश्वास ठेवत नाहीत. ते भगवंतावर विश्वास ठेवत नाहीत. फक्तच बोलतात की "हो, भगवंत आहेत, पण त्यांना डोके नाही, शेपूट नाही, तोंड नाही, असे काहीच नाही." मग भगवंत कोण आहेत? हे मूर्ख सांगतात की भगवंत निराकार आहे. निराकार म्हणजे भगवंत नाही च आहे. मोकळे पणाने सांगा की भगवंत नाहीत. असे का बोलतात की, " भगवान आहेत. पण त्यांना डोके नाही, शेपूट नाही, पाय नाही, हात नाही" मग काय आहे? हा फसवे पणाचा एक प्रकार आहे. जे नास्तिक आहेत, ते मोकळे पणाने बोलतात, " माझा भगवंतांवर विश्वास नाही." हे आपण समजू शकतो. पण हे मूर्ख सांगतात की, " भगवंत नाहीच आहे, निराकार आहे". निराकार म्हणजे भगवंत नाहीच आहेत, पण कधी कधी निराकार हा शब्द वापरला जातो. पण निराकार छा अर्थ भगवंतांना आकार च नाही, हे चुकीचे आहे. निराकार म्हणजे त्यांना भौतिक आकार नाही. त्यांचे शरीर सच्चिदानंद आहे. या भौतिक जगात त्यांना बघणे शक्यच नाही. आपले शरीर सत् नाही. ते असत् आहे. तुम्हाला आणि मला जे शरीर मिळाले आहे ते या जीवनात टिकणार आहे. जीवन संपले की हे शरीर पण संपणार आहे तुम्हाला हे शरीर पुन्हा कधी ही मिळणार नाही. म्हणून असत्. पण कृष्णाजी चे शरीर तसे नाहीत. कृष्णा चे शरीर जसे आहे तसेच राहणार, नेहमीच. कृष्णाचे दुसरे नाव आहे नारकृती आपले शरीर हे कृष्णाच्या शरीराचे प्रतिकृती आहे...कृष्णाचे शरीर आपल्या शरीराचे प्रतिकृती नाही...नाही... कृष्णाचे शरीर नारकृति, नर वपु आहे. ह्या गोष्टी आहेत. हे वपु असत् नाही. आपले शरीर असत् . ते टिकणार नाही. त्यांचे शरीर हे सच्चिदानंद आहे. आपले शरीर असत्, अचित् आणि निरानंद आहे - एकदम विरुद्ध. ते टिकणार नाही आणि तेथे ज्ञान नाही, अचित् , आणि तेथे आनंद नाही. आपण नेहमी दुःख्खी असतो. निराकार म्हणजे शरीर नाही असणे. त्यांचे शरीर वेगळे आहे. संस्कृत श्लोक त्यांचे इंद्रिय सकलेंद्रिया वृत्ती मंती. मी डोळ्यांनी बघतो. हे माझ्या डोळ्यांचे कृती आहे. पण कृष्णा...डोळ्यांनी तर बघू शकतात पण खाऊ सुध्दा शकतात. ते महत्वाचे आहे. आपण बघून खाऊ शकत नाही. आपण कृष्णा ना जो प्रसाद दाखवतो, कृष्णा ने बघितला तर ते खातात सुध्दा. संस्कृत श्लोक कृष्णा चे शरीराचे आपल्या शरीराशी तुलना होऊ शकत नाही (BG ९.११) मूर्ख लोक विचार करतात की, "कृष्णा ना २हात आहेत, २ पाय आहेत. म्हणून मी पण कृष्णा आहे." म्हणून पाखंडी लोकांकडून दिशाभूल होऊ नका. शास्त्र मध्ये जे आहे ते समजून घ्या, अधिकृत व्यक्ती(गुरु) कडून शिका आणि आनंदी व्हा.

खुप आभारी आहे.

जय श्रीला प्रभुपाद