MR/Prabhupada 0449 - भक्तीद्वारे, तुम्ही परात्पर परमेश्वरावर प्रेम करू शकता. तो एकमेव मार्ग आहे
Lecture on SB 7.9.3 -- Mayapur, February 17, 1977
या जगामध्ये, ब्रम्हा हे सर्वात पहिले जीव आहेत. लक्ष्मी आणि ब्रम्हा भयभीत झाले होते. म्हणून ब्रम्हा ने प्रल्हाद महाराजांना विनंती केली की “माझ्या मुला, तू पुढे जा आणि प्रभुला प्रसन्न कर. तू त्यांना शांत करू शकतो, कारण त्यांनी तुझ्यासाठीच हे भयावह रूप घेतले आहे. तुझ्या वडिलांनी तुला त्रास देऊन त्यांचा अपराध केला आहे. तुला शिक्षा देऊन, तुला त्रास देऊन, भगवंताचा अपराध केला. म्हणून ते खूप क्रोधित झाले. तू त्यांना शांत करू शकतो. आम्ही नाही. ... प्रल्हाद महाराज उच्च कोटींचे भक्त असल्याने, ते भगवंतांना शांत करू शकले. भक्तीने तुम्ही भगवंतांवर नियंत्रण करू शकतात. हाच एक रस्ता आहे. भक्तीने त्यांना समजू शकतो आणि त्यांना नियंत्रण करू शकतो. ... वेदांचा अभ्यास करून भगवंतांना समजू शकत नाही. ... भक्तासाठी ते नेहमी तयार असतात. भक्ति हाच एक स्रोत आहे. फक्त भक्तीने तुम्ही भगवंता पर्यंत पोचू शकतात, त्यांचे शी बोलू शकतात, मित्राप्रमाणे. गोप कृष्णांना त्यांचे सारखेच मनात असतं. "कृष्णा आपल्यातले च आहेत." त्यांचे कृष्णावर अपार प्रेम होते हीच त्यांची पात्रता आहे गोप मुलांना कृष्णा खांद्यावर घ्यायला तयार झालेत कृष्णा ना हे हवे आहे की, "माझा भक्त हो, आणि माझ्या वर नियंत्रण कर" प्रत्येकजण मला आदराने पुजतो. कोणी तरी पुढे यावे आणि माझ्यावर नियंत्रण मिळवावे. त्यांना हे हवे. म्हणून तर यशोदा मातेने त्यांवर मातेच्या स्वरूपात नियंत्रण केले. भगवंतावर कसे नियंत्रण मिळवावे ? ते सर्वोच्च नियंता आहेत. त्यांना कोण नियंत्रित करेल.? शक्यच नाही. पण शुद्ध भक्तांकडून ते नियंत्रित होणे स्वीकारतात. ते मान्य करतात की, "यशोदा माते, मला नियंत्रित कर. मला बांधून ठेव." मला लाठी दाखवा की मी भयभीत होईल." भगवंत हे शून्य नाहीत. ते सारे काही आहे. ब्राह्मण बद्दल तुम्हाला जिज्ञासा आहे. ... म्हणून भगवंत प्रत्येक वेळेस शांत च नसणार. क्रोधित ही होऊ शकतात. त्यांचा क्रोध आणि त्यांचा शांत स्वभाव या मधून सारखेच निष्कर्ष निघतात. हा फरक आहे. प्रल्हाद महाराज भगवंत प्रल्हाद महाराज वर खूप खुश होते आणि त्यांचे वडिलांवर खूप नाखूष होते. पण निष्कर्ष सारखाच. दोघांना मुक्ती मिळाली. भक्त हे कृष्णा सोबत राहतात. तर ज्या राक्षस ना कृष्णा ने मारले ते त्यांचे सोबत राहत नाही. त्यांचे पात्रता नसून ही ते अध्यात्मिक जगात प्रवेश करतात. त्यांना भौतिक जगातून मुक्ती मिळते. तर भक्ताने ही जागा का घेऊ नये.? ... ते अध्यात्मिक जगात प्रवेश करतात. ज्याला मुक्ती मिळते त्याला प्रवेश मिळतो. ... (BG १८.५४) जे भक्त आहेत, ते वैकुंठात प्रवेश करू शकतात. वैकुंठ किंवा गोलोक वृंदावन. एखाद्याला त्याचे मूळ स्वरूप प्राप्त होते. आपण जर भक्ति स्वीकारली नाही तर आपण ब्रह्म ज्योती मध्ये प्रवेश करू. पण तेथून खाली येण्याचा संभव असतो. (SB १०.२.३२) निराकार वादी अध्यात्मिक जगात प्रवेश करू शकतात SB (SB १०.१४.५८) पण तेथून पतीत होण्याचा संभव असतो. खूप कष्ट आणि तपास्ये नंतर, एखादा ब्रह्म ज्योती मध्ये जाण्यास पात्र होतो पण जेव्हा पर्यंत एखाद्याला परं पदं बद्दल माहिती होत नाही ... पतीत होण्याचा संभव असतो. ... अध्यात्मिक जगात प्रवेश मिळाला नंतर ही कधी कधी पतीत होण्याचा संभव असतो पण ती भगवंतांची ईच्छा असते.जसे जय विजय ते भगवंतांचे सहचारी होते पण असे स्पष्टीकरण येते की, "त्यांनी जायला पाहिजे हिरण्यकश्यपू त्यांनी भौतिक जगात जायला पाहिजे, आणि मला त्यांचे शी लढायला पाहिजे. लढणे, क्रोधित होणे, ही प्रवृत्ती आहे. तर भगवंत ती कोठे दाखवणार? वैकुंठ मध्ये क्रोध आणि लढायला शक्य नाही म्हणून कृष्णा त्यांचे भक्तांना भौतिक जगात जण्या साठी भाग पाडतात. माझा शत्रू ही आणि माझ्या शी युद्ध कर. मी क्रोधित होणार." अध्यात्मिक जगतात वैकुंठ मध्ये असे होणे शक्य नाही सारे मैत्री भावाने राहतात आणि सेवा करतात. मग लढाई कसे होऊ शकेल. पण लढण्याची प्रवृत्ती आहे. ती कोठे दर्शविणार? म्हणून कृष्णा अवतार घेतात. क्रोधित होतात आणि भक्त त्यांचे शत्रू होतात. अशी ही कृष्णा लीला, नित्य लीला सुरू राहते.
धन्यवाद.
जय. हरी बोल.