MR/Prabhupada 0453 - विश्वास ठेवा! कृष्णापेक्षा अधिक श्रेष्ठ कोणीही नाही



Lecture on SB 7.9.5 -- Mayapur, February 25, 1977

भगवंतांना भावना नाहीत, ते विचार करू शकत नाही...चुकीचे आहे, भगवंता मध्ये सारे काही आहे. जर त्यांमध्ये करुणेची भावना नसेल, तर आपल्या मध्ये कोठून आली? सारे काही भगवंता पासून येते ब्राह्मण म्हणजे काय? म्हणजे ज्या पासून सारे काही येते ते ब्राह्मण. जर त्यांचे मध्ये ही भावना नसेल तर ते भगवान कसे? जसे एक निरागस बालक येऊन आपल्या नमस्कार करते, आपल्याला आदर देते लगेचच आपण दयाळू बनतो: "अगं, एक छान मूल आहे." तर भगवान कृष्णा, नरसिंह देव, ते सुद्धा दयाळू बनले, सध्या सारखेच दयाळू नाही की, "किती गोड आहे हे बाळ" तत्काळ त्याला उठवले आणि म्हणाले, "माझ्या प्रिय पुत्रा, उभा राहा." तत्काळ त्याचे डोक्यावर आशीर्वाद पुर्वक हात ठेवला ... ह्या भावना आहेत. कारण या मुलाला आश्चर्य वाटले होते की अशी मोठी मूर्ती स्तंभांमधून आली आहे, अवाढव्य वडील हे मृत झाले, तर त्यांचे मन थोडे विचलित झाले होते. "माझ्या प्रिय मुलं, तू भयभीत होऊ नको." सारे काही ठीक आहे. मी आहे येथे, आता कोणती ही भीती नाही शांत हो. मी तुला संरक्षण देणार. ही देवाण घेवाण असते. खूप खूप शिकण्याची, वेदांती बनण्याची गरज नाही. फक्त ह्या गोष्टीची आवश्यकता आहे की तुम्ही निरागस बनले पाहिजे भगवंतांना स्वीकार करा, त्यांचे पायाशी राहा, सारे काही ठीक होणार. हे पाहिजे आहे. साधे पणा, कृष्णा वर विश्वास ठेवा. कृष्णा वर विश्वास ठेवा कृष्णा पेक्षा मोठे कोणी नाही. ते सांगतात की (BG 18.65) हाच उपदेश आहे. उपदेशाचे सार आहे विश्वास ठेवा की कृष्णा येथे आहे. निरागस बालक विश्वास ठेवणार, पण आपला निर्बुद्ध मेंदू प्रश्न विचारणार "विग्रह हे दगड, ब्रास की लाकडा पासून बनवले आहेत?" कारण आपण निरागस नाही आहोत. आपण विचार करतो की हा विग्रह ब्रास पासून बनला आहे ब्रास पासून जरी बनला असेल, ब्रास हे भगवान नाहीत का? ब्रास सुद्धा भगवान च आहेत BG७.४ कृष्णा सांगतात की, सारे काही कृष्णा आहेत. कृष्णा शिवाय कशाचेही अस्तित्व नाही तर कृष्णा ना हवे तसे ते अवतार घेऊ शकत नाही का? ते ब्रास मध्ये अवतरीत होऊ शकतात. दगड मध्ये अवतरित होऊ शकतात ते लाकडामध्ये अवतारात होऊ शकतात कोणत्या ही प्रकारे, ते सर्व शक्तिमान आहेत. आपण असे समजायचे आहे की, "कृष्णा येथे आहे" "कृष्णा या विग्रह पासून वेगळे आहेत" असे समजू नका "आणि ब्रास पासून विग्रह बनला" असे नाही (Bs ५.३३) त्यांचे विभिन्न अवतार आहेत तरी ते एकच आहेत त्याचप्रमाणे, त्यांचे नाव त्यांच्यात आहे. (CC Madhya १७.१३३) जेव्हा तुम्ही कृष्णा चे पवित्रा नाम घेतात तेव्हा हा तर फक्त ध्वनी आहे आणि कृष्णा वेगळे आहेत असा विचार करू नका. ... कृष्णा हे चिंतामणी आहेत, तसेच त्यांचे नाम ही चिंतामणी आहेत .... ... जर आपण नाम सोबत संगती केली तर, तर असे समजा की, कृष्णा ल तुमचे सेवेची माहिती आहे तुम्ही सांगणार, " हे कृष्णा, हे राधा राणी, कृपया मला तुमचे सेवें मध्ये घ्या." हरे कृष्णा मंत्र म्हणजे "हे कृष्णा, हे राधा राणी, हे शक्ती, कृपया मला तुमचे देवे मध्ये घ्या" ... हे चैतन्य महा प्रभूंचे शिकवण आहे की, "हे देवा, नंद तनुजा..." जेव्हा तुम्ही नाम सोबत संगती करतात, त्यांचे लीला, त्यांचे भक्त सोबत संगती करतात, तेव्हा कृष्णांना खूप आनंद होतो. ते निराकार नाहीत, कृष्णा ल नाव नाही, पण जेव्हा ते भक्ता सोबत आदान प्रदान करतात तेव्हा त्यांना नाव आहे जेव्हा ते नंद महाराज सोबत असतात आणि त्यांचे लाकडी पादुका यशोदा मटा बालक कृष्णा ल विचारते - तुम्ही ते चित्र बघितले असणार - " बाळा, तू वडिलांचे पादुका आणणार का?" कृष्णा त्यांना हो म्हणून त्यांचे डोक्यावर घेऊन येतात नंद महाराज खूप खुश होतात: "तुझा मुलगा खूप शक्ती वान आहे की तो ऐवढे वजन उचलू शकतो" हे आदान प्रदान असते. म्हणून चैतन्य महाप्रभू कृष्णा ना आयी नंद तनुजा असे बोलावतात हे कृष्णा, तुम्ही नंद महाराज चे शरीर पासून आले आहेत. जसे वडील हे बीज प्रदान करतात तसेच, कृष्णा हे सर्वांचे मूळ स्रोत आहेत, तरीही ते नंद महाराज चे बीज पासून आले आहेत. ही कृष्णा लीला आहे (CC antya २०.३२, shikshashtak ५) चैतन्य महाप्रभूनी कृष्णा ल कधी असे संबोधित केले नाही, "हे शक्तिमान" कारण याचा अर्थ निराकार असा होता ते म्हणतात की आयी नंद तनुजा, नंद महाराज चे पुत्र नंद महाराज चे पुत्र. ही भक्ति आहे, ते अनंत आहे कृष्णा ल जेव्हा यशोदा मातेची भीती वाटते हे विचार करून कुंती देवी ला आश्चर्य होते तो श्लोक आठवतो, तिला आश्चर्य होते कृष्णा, जे इतके उच्च आणि महान आहे की प्रत्येकजण त्यांना घाबरत आहे, पण ते यशोदा मातेला घाबरतात" याचे भक्ता लोक आनंद घेतात नास्तिक लोक हे समजू शकत नाही कृष्णा सांगतात की, फक्त भक्त, दुसरे कोणी नाही. त्यांना अध्यात्मिक जगात प्रवेश नाही, त्यांना हे समजणार नाही कृषाला फक्त भक्ति मधून च समजू शकतात ज्ञान, योगा, कर्म या पैकी काहीही मदत करू शकत नाही भक्त कसे बनू शकतात? हे किती सोपे आहे? प्रल्हाद महाराजांना बघा, एक निरागस बालक, प्रणाम करीत आहे BG १८.६५ जर तुम्ही पुढील ४ गोष्टी अगदी प्रामाणिकपणे केले pahije- नेहमी कृष्णा बद्दल विचार करा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे कृष्णा बद्दल विचार करणे हे आहे. जर तुम्ही अनन्य भक्त असाल, तर तुम्ही हरे कृष्णा मंत्र जप केलाच पाहिजे अनन्य भक्ति शिवाय ते शक्यच नाही, मंत्र जप थकवून देणार पण आपण प्रयत्न करत राहिला पाहिजे.