MR/Prabhupada 1064 - भगवंत प्रत्येकाच्या हृदयात निवास करतात



660219-20 - Lecture BG Introduction - New York


भगवंत प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयामध्ये वास करतात. परम चेतना, याचा पुढे भगवद गीते मध्ये उल्लेख केला जाईल त्या अध्यायामध्ये, ज्या अध्यायात जीव आणि ईश्वर यांच्यातील भेदांचे (अंतर / फरक) प्रतिपादन केले गेले आहे. क्षेत्र-क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञाचे वर्णन करताना सांगितले गेले आहे कि भगवंत हे देखिल क्षेत्रज्ञ आहे किंवा चेतन आहे, आणि जीव किंवा प्राणिमात्र, हे देखिल चेतन आहेत. परंतु त्यांच्यातील भेद असा आहे कि जीवाची चेतना केवळ त्याच्या शरीरापुरती मर्यादित असते , आणि भगवंतांची चेतना सर्वत्र असते.

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति (भ गी १८।६१)

भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये वास करतात, त्यामुळे जीवाने केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना माहित असते. आपण हे विसरू नये. असे प्रस्थापित केले गेले आहे कि परमात्मा, जे परम पुरुषोत्तम भगवान आहेत, ते प्रत्येक जिवाच्या हृदयात ईश्वर रूपाने वास करतात, तेच जीवाला दिशा दर्शक आहेत आणि परमनियंता आहेत. ते मार्गदर्शन करतात. सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो (भ गीता १५.१५) प्रत्येक जिवाच्या हृदयामध्ये ते स्थित आहेत, आणि ते आपल्या मर्जी प्रमाणे मार्गदर्शन करीत असतात. जीवाला हे कळत नाही कि नक्की काय करावे. सर्वप्रथम तो एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने करण्याचा निश्चय करतो आणि मग तो आपल्याच कर्म आणि त्यापासून उत्पन्न होणाऱ्या फळांमध्ये गुरफटून जातो. परंतु ज्यावेळी तो एका प्रकारच्या भौतिक शरीराचा त्याग करतो, आणि दुसरे शरीर धारण करतो... ज्याप्रमाणे आपण एका प्रकारच्या वस्त्राचा त्याग करतो दुसरे वस्त्र परिधान करण्यासाठी त्याच प्रमाणे भगवत गीते मध्ये प्रतिपादित केले गेले आहे कि

वासांसि जीर्णानी यथा विहाय " (भ गी २।२२)

ज्याप्रमाने एक व्यक्ती आपली वस्त्रे बदलतो, त्याच प्रमाणे जीव आपली शरीरे बदलतो. आत्म्याचे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश होतो त्यावेळी त्याची कर्म आणि कर्म फळे देखील त्याच्या बरोबर येतात. ज्यावेळी मनुष्य सत्वगुणामध्ये असतो, त्यावेळी त्याला हि कर्मे बदलता येतात. आणि त्याला हे कळते कि आपण कशा पद्धतीची कर्मे केली पाहिजेत. आणि जर तो त्याप्रमाणे कर्मे करू लागला तर त्याची पूर्व कर्मे आणि त्यांची कर्म फळे बदलू शकतात. आणि त्यामुळे कर्म शाश्वत नाही. ईश्वर, जीव, प्रकृति, काल आणि कर्म या पाच गोष्टींपैकी कर्म सोडून चार गोष्टी शाश्वत आहेत, कर्म शाश्वत नाही. चेतन परमात्मा परम चेतन ईश्वर किंवा स्वामी आणि जीव यांच्यातील अंतर या प्रमाणे आहे. भगवंतांची आणि जीवाची चेतना दिव्य आहे भौतिक सृष्टी बरोबर झालेल्या संयोगामुळे चेतना उत्पन्न झालेली नाही. चेतनेची निर्मिती काही विशेष परिस्थिती मध्ये जीवाचा भौतिक सृष्टीशी झालेल्या संयोगातून होते हा सिद्धांत चुकीचा आहे. या सिद्धांतास भगवद्गीता मान्यता देत नाही. हि चेतना काही विशेष भौतिक परिस्थितींमध्ये विकृत पद्धतीने प्रतिबिंबित होऊ शकते. ज्याप्रमाणे रंगीत काचेतून दिसणारा प्रकाश त्या काचेच्या रंगाचा दिसतो त्याप्रमाणे भगवंतांची चेतना भौतिक प्रकृती नुसार प्रभावित होत नाही. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात

"मायाध्यक्षेन प्रकृति: "(भ गी ९।१०)

ज्यावेळी ते भौतिक जगतात अवतीर्ण होतात त्यावेळी त्यांची चेतना भौतिक प्रकृतीने प्रभावित होत नाही. जर तसे झाले असते तर, ते भगवद गीते मध्ये दिव्य ज्ञानाबद्दल बोलण्यास अपात्र ठरले असते. कोणीही अध्यात्मिक जगताबद्दल बोलू शकत नाही. (श्रीकृष्ण आणि त्यांचे पार्षद सोडून) भौतिक कालमाशांपासून मुक्ती शिवाय. म्हणजे भगवंत भौतिक मुळे कलुषित (प्रदूषित) नव्हते (नाहीत आणि नसतील) परंतु सद्यःस्थितीतआपली चेतना भौतिकतेने ग्रासलेली आणि कलुषित आहे. तर भगवद गीता आपल्याला शिकविते, कि आपल्याला आपली चेतना भौतिक प्रदूषणापासून शुद्ध करायची आहे. आणि त्या शुद्ध चेतने मध्ये आपल्याला कर्म करायचे आहे. ते आपल्याला आनंद देणारे असेल. आपण आपली कर्मे थांबवू शकत नाही. केवळ त्यांना शुद्ध करू शकतो. आणि अशी शुद्ध चेतने मध्ये केलेली कर्मे म्हणजे भक्ती होत. भक्ती द्वारे केलेली कर्मे, सामान्य कर्मांप्रमाणेच भासतात, परंतु ती (भक्ती युक्त) कर्मे प्रदूषित नसतात. ती शुद्ध असतात. तर, एका अज्ञानी व्यक्तीला असे दिसेल कि भक्त एका सामान्य मानस प्रमाणे कर्मे करीत आहे, परंतु असा अज्ञानी मनुष्य हे जाणू शकत नाही कि भक्तांची आणि भगवंतांची कर्मे हि भौतिक प्रकृति मुळे प्रदूषित होत नाहीत. प्रकृतिच्या तीन गुणांमुळे, (तामसिक, राजसिक, सात्विक), परंतु दिव्या चेतना त्यापासून प्रभावित होत नाही. त्यामुळे आपण हे जाणले पाहिजे कि आपली चेतना भौतिक गुणांमुळे प्रदूषित झालेली आहे.