MR/Prabhupada 1079 - भगवद् गीता एक दिव्य साहित्य आहे जे अत्यंत काळजीपूर्वक वाचले पाहिजे



660219-20 - Lecture BG Introduction - New York

भगवद् गीता एक दिव्य साहित्य आहे जे अत्यंत काळजीपूर्वक वाचले पाहिजे भगवद् गीता किंवा श्रीमद भागवतम् एखाद्या सिद्ध व्यक्तीकडून ऐकल्याने , चौवीस तास परमेश्वराचे स्मरण करण्यास मदत होईल ,जे शेवटी , अंत काले , परमेश्वराचे स्मरण करण्यास मदत करेल , आणि मग हे शरीर सोडून गेल्यावर त्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त होईल , आध्यात्मिक शरीर जे भगवंतासोबत राहण्यास अनुकूल असेल . म्हणूनच भगवंत म्हणतात ,

अभ्यास योग युक्तेन
चेतसा नान्य गामिना
परमं पुरुषं दिव्यं
याति पार्थानुचिन्तयन् (भ गी ८।८)

अनुचिन्तयन् , सतत त्याचा विचार करणे . हे फार कठीण नाही. अनुभवी व्यक्तीकडून ही प्रक्रिया शिकायला हवी. तद विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत (मु उ १।२।१२) ।

आधीपासूनच जो या प्रक्रियेत आहे अशा एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधावा तर अभ्यास योग युक्तेन . याला अभ्यास-योग म्हणतात, सराव. अभ्यास: नेहमी परमेश्वराला कसे स्मरणात ठेवावे? चेतसा नान्य गामिना । मन , मन हे नेहमी इकडे तिकडे धावत असते . म्हणून मनाला, सर्वोच्च परमेश्वर श्रीकृष्णांच्या स्वरुपावर केंद्रित करण्याचा सराव करावा लागतो , किंवा ध्वनी रूपात , त्याच्या नावावर मन केंद्रित करणे , जे सोपे आहे . माझे मन केंद्रित करण्याऐवजी- माझे मन चंचल असू शकते , जे इथे तिथे पळत असते , परंतु मी माझे कान कृष्ण नामाच्या ध्वनी वर केंद्रित करू शकतो . आणि हे मला मदत करेल. तो देखील अभ्यास-योग आहे. चेतसा नान्य गामिना परमं परुषं दिव्यं . परमं परुषं , अध्यात्मशास्त्रीय देवतेमध्ये दैवी शक्तीचे सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व, आध्यात्मिक जगात एखादा प्रवेश करू शकतो , अनुचिंतयन , सर्व काळ स्मरण . तर ही प्रक्रिया , मार्ग आणि साधने, सर्व भगवद् गीतामध्ये नमूद केले आहेत , आणि इथे कोणासाठीही प्रतिबंध नाही . असे नाही की पुरुषांचा एक विशिष्ट वर्ग हे करू शकतो. प्रभू कृष्णाचा विचार करणे, त्याला ऐकणे हे सर्वाना शक्य आहे, आणि भगवान भगवद्गीते मध्ये म्हणतात ,

मां हि पार्थ व्यपाश्रित्य
ये अपि स्यु: पापयोनय:
स्त्रियो वैश्यस तथा शूद्रास
ते अपि यांति परां गतिम् (भ गी ९।३२)
किं पुनर् ब्राह्मणा: पुण्य
भक्ता राजर्षयस्तथा
अनित्यम् असुखं लोकम्
इमं प्राप्य भजस्व माम् (भ गी ९।३३)

भगवान म्हणतात की जीवनाचा सर्वात निम्न स्तरावर असलेला एक माणूस, जीवनाचा सर्वात निम्न दर्जा, किंवा अगदी एक पतित स्त्री, किंवा व्यापारी माणूस किंवा कष्टकरी वर्ग ... पुरुषांचा व्यापारिक वर्ग, मजूर वर्ग पुरुष, आणि स्त्री वर्ग, ते सर्व एकाच वर्गात मोजले जातात कारण त्यांची बुद्धिमत्ता तितकी विकसित नसते . परंतु प्रभु म्हणतात , ते सुद्धा किंवा त्यांच्यापेक्षाही कमी , मां हि पार्थ व्यपाश्रित्य येपि स्यु: (भ गी ९।३२), फक्त ते नाही , त्यांच्यापेक्षा कमी किंवा कोणीही . तो किंवा ती कोण आहे याने फरक पडत नाही , कोणीही जो भक्ती योगाचे तत्व स्वीकारतो परमेश्वराला अंत कळीचा सोयरा म्हणून स्वीकारतो , उच्चतम उद्दीष्ट, जीवनाचे सर्वात उंच ध्येय ... मां हि पार्थ व्यपाश्रित्य ये अपि स्यु: ते अपि यांति परां गतिम् । त्या परां गतिम् साठी अध्यात्मिक राज्यात आणि आध्यात्मिक आकाशात कोणीही प्रयत्न करू शकतो . फक्त याचा सराव करावा लागतो . त्या प्रणालीला भगवद्गीते मध्ये छान सूचित केले आहे आणि एखादा ते ग्रहण करून जीवन जगू शकतो आणि कायमस्वरूपी जीवन संधान प्राप्त करू शकतो . तोच संपूर्ण भगवद् गीतेचा योग आणि मूळ आहे. म्हणूनच, निष्कर्ष असा आहे की भगवद्गीता एक दिव्य साहित्य आहे जे अतिशय काळजीपूर्वक वाचले पाहिजे . गीता शास्त्र इदं पुण्यं य: पठेत् प्रयत: पुमान . आणि परीणामतः , जर एखादा योग्यरित्या सूचना पाळत असेल , तर तो जीवनाच्या सर्व दुःखापासून , चिंतांपासून मुक्त होईल . भय शोकादि वर्जित: (गीता-माहात्म्य १) .आयुष्यातील प्रत्येक भीती, या जीवनात, तसेच पुढच्या जीवनात जिथे आध्यात्मिक जीवन प्राप्त होईल.

गीताध्यान शीलस्य
प्राणायम परस्य च
नैव संति हि पापानि
पूर्व जन्म कृतानि च (गीता महात्मय २)

तर आणखी एक फायदा असा आहे की जर एखाद्या व्यक्तीने भगवद् गीता अत्यंत प्रामाणिकपणे आणि गंभीरतेने वाचली , तर मग प्रभूच्या कृपेने त्याच्या भूतकाळातील वाईट कर्मे त्याच्यावर कार्य करणार नाहीत.