MR/Prabhupada 0307 - केवळ कृष्णांचा विचार करण्यातच नाही, पण त्यांच्यासाठी कार्ये करण्यातही मन स्थिर करा: Difference between revisions
(Created page with "<!-- BEGIN CATEGORY LIST --> Category:1080 Marathi Pages with Videos Category:Prabhupada 0307 - in all Languages Category:MR-Quotes - 1968 Category:MR-Quotes - L...") |
m (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->") |
||
Line 8: | Line 8: | ||
<!-- END CATEGORY LIST --> | <!-- END CATEGORY LIST --> | ||
<!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | <!-- BEGIN NAVIGATION BAR -- DO NOT EDIT OR REMOVE --> | ||
{{1080 videos navigation - All Languages| | {{1080 videos navigation - All Languages|Marathi|MR/Prabhupada 0306 - आपण आपले शंकात्मक प्रश्न विचारायला हवेत|0306|MR/Prabhupada 0308 - आत्म्याचे कार्य कृष्णभावनामृत आहे|0308}} | ||
<!-- END NAVIGATION BAR --> | <!-- END NAVIGATION BAR --> | ||
<!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | <!-- BEGIN ORIGINAL VANIQUOTES PAGE LINK--> | ||
Line 18: | Line 18: | ||
<!-- BEGIN VIDEO LINK --> | <!-- BEGIN VIDEO LINK --> | ||
{{youtube_right| | {{youtube_right|ud2Pfudi41Q|केवळ कृष्णांचा विचार करण्यातच नाही, पण त्यांच्यासाठी कार्ये करण्यातही मन स्थिर करा<br/>- Prabhupada 0307 }} | ||
<!-- END VIDEO LINK --> | <!-- END VIDEO LINK --> | ||
Latest revision as of 18:07, 1 October 2020
Lecture -- Seattle, October 2, 1968
प्रभुपाद : तुझे मन म्हणाले, "आपण त्या नुकत्याच सुरु झालेल्या कृष्णभावनामृत संघटनेत जाऊ," त्यामुळे तुझे पाय तुला येथे घेऊ आलेत. त्यामुळे मन... विचार, भावना, इच्छा, ही सर्व मनाची कार्ये आहेत. त्यामुळे मन विचार करते, भावना व्यक्त करते, आणि ती इंद्रिये कार्य करतात. त्यामुळे तुम्ही तुमचे मन केवळ कृष्णांबद्दल विचार करण्यातच नाही, पण त्यांच्यासाठी कार्ये करण्यात, त्यांच्याविषयीच्या भावना ठेवण्यातही स्थिर करायला हवे. हे संपूर्ण ध्यान आहे. त्याला म्हणतात समाधी. तुमचे मन इकडे तिकडे भ्रमण करणार नाही. तुम्हाला तुमचे मन अशा प्रकारे कार्यरत ठेवावे लागेल, जेणेकरून ते केवळ कृष्णांचाच विचार करेल, त्यांच्याविषयीच भावना ठेवेल, त्यांच्यासाठीच काम करेल. हे संपूर्ण ध्यान आहे.
तरुण (2) : तुम्ही तुमच्या डोळ्यांचे काय करता? त्यांना बंद करता?
प्रभुपाद : होय, डोळेही इंद्रियेच आहेत. मन हे प्रमुख इंद्रिय आहे, आणि कोणत्याही प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली, विशिष्ट निम्न स्तरावरील लोक काम करतात. त्यामुळे डोळे, हात, पाय, जीभ, दहा इंद्रिये, ते सर्व मनाच्या आदेशाने कार्य करीत आहेत. त्यामुळे मन हे इंद्रियांच्या माध्यमातून व्यक्त होते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमच्या इंद्रियांना मनाच्या विचार व भावनांप्रमाणे कार्यरत करणार नाहीत, तोपर्यंत त्यात सर्वोत्कृष्टता असणार नाही. त्यात बाधा येईल. जर तुमचे मन कृष्णांचा विचार करत असेल व तुम्ही काहीतरी वेगळे पाहत असाल, तर त्यात फार बाधा व विरोधाभास उत्पन्न होईल. त्यामुळे मनाच्या... सर्वात आधी तुम्हाला तुमचे मन कृष्णांवर स्थिर करावे लागेल, आणि मग सर्व इतर इंद्रिये कृष्णांच्या सेवेत कार्यरत होतील. यालाच म्हणतात भक्ती.
- सर्वोपाधिविनिर्मुक्तं
- तत्परत्वेन निर्मलम् ।
- हृषीकेन हृषीकेश-
- सेवनं भक्तिरुच्यते ।।
- (चै. च.मध्य १९.१७०)
हृषीक, हृषीक म्हणजे इंद्रिये. जेव्हा तुम्ही तुमची इंद्रिये इंद्रियांच्या स्वामींच्या सेवेत कार्यरत ठेवता... कृष्णांना हृषीकेश, किंवा इंद्रियांचे स्वामी असे म्हटले जाते. इंद्रियांचे स्वामी म्हणजे, समजण्याचा प्रयत्न करा. जसे की हा हात. हा हात अगदी छानपणे काम करत आहे, पण जर त्याला अर्धांगवायू झाला किंवा कृष्णांनी त्यातून सामर्थ्य काढून घेतले, तर तुमचा हात निरुपयोगी ठरेल. तुम्ही त्याला पुन्हा पूर्वस्थितीत आणू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या हाताचे स्वामी नाहीत. तुम्ही खोटा विचार करीत आहात, "मी माझ्या हाताचा मालक आहे." परंतु वस्तुतः तुम्ही स्वामी नाहीत. कृष्ण स्वामी आहेत. त्यामुळे जेव्हा तुमची इंद्रिये त्यांच्या स्वामींच्या सेवेत मग्न असतात, तेव्हा त्याला म्हटले जाते भक्ती. आता ही इंद्रिये माझ्या खोट्या ओळखीत कार्यरत आहेत. मी विचार करतो आहे, "हे शरीर माझी पत्नी, माझे हे, माझे ते, यांच्या प्रसन्नतेसाठी आहे," खूप सगळ्या गोष्टी, "माझा देश, माझा समाज." ही खोटी ओळख आहे. परंतु जेव्हा तुम्ही आध्यात्मिक स्तरावर येतात, तेव्हा तुम्हाला कळते की "मी भगवंतांचा अंश आहे; त्यामुळे माझी कृत्ये त्यांच्या प्रसन्नतेसाठी असायला हवीत." ही आहे भक्ती. सर्वोपाधिविनिर्मुक्तम् । (चै. च. मध्य १९.१७०), सर्व प्रकारच्या खोट्या ओळखीपासून मुक्त होऊन. जेव्हा तुमची इंद्रिये शुद्ध होतात, आणि जेव्हा ती त्यांच्या स्वामींच्या सेवेत मग्न होतात, तेव्हा त्यास कृष्णभावनेत कार्ये करणे असे म्हणतात. तुझा प्रश्न काय आहे? त्यामुळे ध्यान, मनाची कृत्ये या प्रकारे असायला हवीत. तेव्हा ते परिपूर्ण असेल. अन्यथा, मन हे इतके चंचल व अस्थिर आहे की जर तुम्ही त्याला एका विशिष्ट ठिकाणी स्थिर करणार नाहीत... स्थिर करणे म्हणजे... मनाला काहीतरी करावेसे वाटते कारण विचार, भावना, इच्छा ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचे मन अशा प्रकारे तयार करावे लागेल की जेणेकरून तुम्ही कृष्णांचा विचार करणार, कृष्णांसाठीच्या भावना ठेवणार, कृष्णांसाठी कार्ये करणार. मग ती समाधी आहे. ते परिपूर्ण ध्यान आहे.