MR/Prabhupada 0002 - वेडा माणूस संस्कृती
Lecture on SB 6.1.49 -- New Orleans Farm, August 1, 1975
हरिकेसा : भांषातर.... "जसा एक माणूस स्वप्नात झोपेत असताना स्वप्नात प्रकट होणार्या शरीरा प्रमाणे कृती करतो, किंवा शरीराला स्वतःच्या रूपात स्वीकारतो, त्याचप्रमाणे, आताचे उपस्थित शरीर म्हणजेच तो स्वतः अशी ओळख करून घेतो, जे मागच्या जन्माच्या धार्मिक किंवा अधार्मिक जीवन कार्याने प्राप्त केले होते, आणि त्याचे मागचे आणि पुढचे जीवन माहीत करू शकत नाही" प्रभुपाद : (श्री.भा.६.१.४९): यथाज्ञस्तमसा युक्त उपास्ते व्यक्तमेव ही | न वेद पूर्वंपरम नष्टजन्मस्मृतीस्तथा ही आमची स्थिती आहे. ही आमची विज्ञानातील प्रगती आहे, की आम्हाला माहीत नाही "मी या जन्माच्या आधी काय होतो आणि ह्या जन्मा नंतर मी कोण होणार आहे ?" आयुष्याची वाटचाल पुढे चालू ठेवणे. ते अध्यात्मिक ज्ञान आहे. पण त्याना हे सुद्धा माहीत नाही की ते आयुष्य सुद्धा पुढची वाटचाल आहे. ते विचार करतात, "दैवयोगाने, मला हे आयुष्य मिळाले आहे, आणि ते माझ्या मृत्यू नंतर संपून जाणार. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ ह्यांचा प्रश्नच उद्भवत नाही. चला मजा करूया ." ह्याला अज्ञान म्हणतात, तमसा, बेजबाबदार जीवन. म्हणून अज्ञ: . अज्ञ: म्हणजे अशी व्यक्ती ज्याला कसलेही ज्ञान नाही. आणि कोणाला हे ज्ञान नाही ? आता, तमसा. जे की तम गुणा मध्ये बद्ध आहेत. भौतिक प्रकृती तीन गुणांनी बनलेली आहे. सत्व, रज, तमस. सत्व गुण म्हणजे निर्मळ , प्रकाशमयी. ज्या प्रकारे आता आभाळात ढग आच्छादिले आहेत, सुर्य प्रकाश स्वच्छ नाही आहे. पण ढगांच्या वर तिथे सूर्य प्रकाश आहे, सर्व काही स्पष्ट आहे. आणि तिथे ढगांच्या मधे स्पष्ट नाही आहे . त्याचप्रमाणे, जे सत्व गुणा मध्ये बद्ध आहेत , त्यांना सर्वकाही स्पष्ट आहे, आणि जे तमो गुणा मध्ये बद्ध आहेत , सर्वकाही अज्ञान आहे , आणि जे कोण संमिश्र आहेत, ना रजो गुण, ना तामस गुण, मधल्या मार्गाने , त्यांना राजसीक म्हणतात. तीन गुण. तमसा, तर ते केवळ उपस्थित शरीरा सम्बधि इच्छुक असतात, स्वारस्य नाही की पुढे काय घडणार, आणि अजिबात ज्ञान नाही की पूर्वी तो कोण होता. आणि अन्य एका ठिकाणी हे वर्णन केले आहे: नूनं प्रमतः कुरुते विकर्म (श्री.भा. ५.५.४] प्रमतः, केवळ वेड्या माणसा सारखे. त्याला माहित नाही तो वेडा का झाला आहे. तो विसरतो. आणि त्याच्या कर्मा द्वारे, पुढे जाऊन काय होणार आहे, त्याला माहित नाही. वेडा मनुष्य. म्हणून ही संस्कृती, आधुनिक संस्कृती, फक्त वेड्या मनुष्यांची संस्कृती आहे. त्यांना पूर्व जन्मीचे काही ज्ञान नाही, त्यांना भविष्यातील जीवनाचे ही स्वारस्य नाही. नूनं प्रमतः कुरुते विकर्म ([श्री.भा. ५.५.४) आणि पूर्णपणे पापी कर्मात गुंतलेली कारण त्यांना पूर्व जन्मीचे काही ज्ञान नाही. फक्त एका कुत्र्या प्रमाणे. तो कुत्रा का झाला आहे, हे त्याला माहीत नाही आणि पुढे जाउन त्याला काय मिळणार आहे ? तर एक कुत्रा त्याच्या मागील जीवनात पंतप्रधान असु शकेल., पण त्याला जेव्हा कुत्र्याचे जीवन मिळते, तो विसरतो. तो देखील मायेचा आणखी एक प्रभाव आहे. प्रक्सेपत्मिका-शक्ती, आवरणात्मिका-शक्ती. माया ही दोन सामर्थ्यानी बलवान आहे. जर कोणी त्याच्या मागील पापी कर्मा मुळे एक कुत्रा झाला आहे, आणि जर ते त्याच्या लक्षात राहीले आहे "आधी मी पंतप्रधान होतो, आणि आता कुत्रा झालो आहे," त्याला ते जगणे अशक्य होईल. त्यामुळे माया त्याचे ज्ञान झाकते. मृत्यु. मृत्यु म्हणजे सर्व काही विसरणे. त्याला मृत्यु म्हणतात. जेणेकरून हा अनुभव आपण प्रत्येक दिवस आणि रात्र घेतो. जेव्हा रात्रीच्यावेळी आपण स्वप्ना मधे एका वेगळ्या वातावरणात, वेगळ्या आयुष्यात, आपण हे शरीर विसरतो, की "मी झोपलो आहे. माझे शरीर एका सुंदर दालनामधे झोपले आहे , सुंदर गादी,उशी व चादर." नाही. कल्पना करा की तो रस्त्यावर घूटमळत आहे, किंवा तो एका टेकडीवर आहे. त्यामुळे तो घेत आहे , स्वप्नामधे , तो घेत आहे... प्रत्येकजण, आपण त्या शरीरामधे रस घेतो. आम्ही पूर्वीचे शरीर विसरून जातो. तर हे अज्ञान आहे. तर अज्ञान, जितके आपण अज्ञाना पासून ज्ञाना पर्यंत प्रगती करू, ते जीवनाचे यश आहे. आणि जर आपण स्वतःला अज्ञानामध्ये ठेवू , ते यश नाही आहे. ते आयुष्य बिघडवणे आहे. अशा प्रकारे कृष्णभावनामृत आंदोलन हे एक व्यक्तीला अज्ञाना कडून ज्ञाना कडे घेऊन जाण्यासाठी आहे. ती संपूर्ण वैदिक साहित्याची एक योजना आहे: एका व्यक्तीला मुक्त करणे. कृष्णा भगवद्गीता मधे आपल्या भक्तांबद्दल सांगत आहे.- सगळ्यांना नाही - तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् (भ.गी.१२.७)) आणखी एक (भ.गी.१०.११): तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता खास करीता, भक्तां करिता... तो प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे, पण जो भक्त समजण्याचा प्रयत्न करतो कृष्ण त्यांना मदत करतो. तो मदत करतो. अभक्तांना, ज्यांना काही ही देणेघेणे नाही... ते फक्त मांस खाण्यात, झोपण्यात, लैंगिक जीवनात, बचावात. ते कोणाचीही काळजी करत नाहीत, देवाला समजण्याचा , किंवा त्याच्या देवाबरोबरच्या नात्याचा. त्यांच्यासाठी, ते विचार करतात की देव नाही आहे, आणि कृष्ण सुद्धा सांगतो, "हो , देव नाही आहे, तू झोप" म्हणूनच सत्-संग पाहीजे. हा सत्-संग, सताम् प्रसंगात. भक्तांच्या संघटणे द्वारा आम्ही आमची देवा बद्दल जिज्ञासा जागृत करतो. त्यामुळे केंद्रे आवश्यक आहेत. उगाचच आम्ही इतकी अनावश्यक केंद्रे उघडत नाही. नाही. ती मानवी समाजाच्या फायद्यासाठी आहेत.