MR/Prabhupada 0408 -उग्र-कर्म म्हणजे क्रूर कृत्ये
Cornerstone Laying -- Bombay, January 23, 1975
जसे आपण उद्योगधंद्यांची चर्चा करीत होतो. कारखाने, त्यांचा भगवद् गीतेमध्ये उग्र कर्म म्हणून उल्लेख आहे. उग्र कर्म म्हणजे क्रूर कृत्ये. उदरनिर्वाहासाठी, आपल्याला आपली उपजीविका आवश्यक आहे. आहार-निद्रा-भय-मै… या प्रमुख शारीरिक, भौतिक शरीराच्या गरजा आहेत. त्याच्यासाठी, श्रीकृष्णांनी सांगितले आहे, अन्नाद भवन्ति भूतानि (भ.गी. ३.१४) | अन्न - म्हणजे धान्य - आपल्याला आवश्यक आहे. अन्नाद भवन्ति भूतानि. धान्य आपण सहज पिकवू शकतो, शेतीकरून. दुसऱ्या ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात, कृषी-रक्षा-वाणिज्यम वैश्य-कर्म स्वभाव-जम (भ.गी. १८.४४) |
आपण आपल्या उपजीविकेसाठी पुरेसे धान्य पिकवू शकतो. आणि संपूर्ण जगात पुरेशी जमीन आहे. मी कमीतकमी चौदा वेळा जगभर प्रवास केला आहे. गेल्या आठ वर्षात संपूर्ण जगभर प्रवास केला आहे, अगदी अंतर्गत भागात सुद्धा मी पहिले आहे पुरेशी जमीन आहे, विशेषतः आफ्रिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेमध्ये आणि आपण भरपूर अन्नाचे उत्पादन करू शकतो, की या वर्तमान लोकसंख्येच्या दहापट लोकांना सहज पुरु शकेल. दहापट. अन्नाची कमतरता नाही. पण अडचण हि आहे की आपण सीमारेषा आखली आहे, "हि माझी जमीन आहे." कोणी म्हणते, "हि अमेरिका आहे, माझी भूमी," "ऑस्ट्रेलिया, माझी भूमी," "आफ्रिका, माझी भूमी," "भारत, माझी भूमी." हे "माझी" आणि "मी." जनस्य मोहो अयम अहं ममेति (श्रीमद भागवतम ५.५.८) | याला भ्रम म्हणतात, की "मी" आणि "माझे." "मी हे शरीर आहे, आणि हि माझी मालमत्ता आहे." याला भ्रम म्हणतात. आणि हा भ्रम, जर आपण या भ्रमाचा स्तरावर उभे राहिलो, तर आपण जनावरापेक्षाही चांगले नाही.
यस्यात्म-बुद्धि: कुणपे तरी-धातुके स्व-धि: कलत्रादिशु भौम इज्य-धि: यत्-तीर्थ-बुद्धि: सलिले न कर्हिचिज जनेषु अभिज्ञेषु स एव गो खरः
गो म्हणजे गाय, आणि खरः म्हणजे गाढव. जे आयुष्याच्या शारीरिक संकल्पनेत आहेत, अहं ममेति (श्रीमद भागवतम ५.५.८), ते गाढव आणि गायीपेक्षा चांगले नाहीत, म्हणजे जनावर. हे सुरु आहे. मी तुमचा खूप वेळ घेणार नाही, पण मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करीन या कृष्णभावनामृत आंदोलनाचा उद्देश काय आहे या कृष्णभाचनामृत आंदोलनाचा उद्देश आहे. मानव समाजाला जनावर, गाय आणि गाढव बनण्यापासून वाचवणे, हे आंदोलन आहे.
त्यांनी त्यांच्या संस्कृतीची स्थापना केली आहे… जसे भगवद् गीतेमध्ये सांगितले आहे जनावर किंवा असुरिक संस्कृती, असुरिक संस्कृती, सुरवात आहे प्रवृत्तिं च निवृतिं च जना न विदुर आसुराः . असुरिक, राक्षसी, संस्कृती, आपण स्वतःला कसे मार्गदर्शन करावे त्यांना माहित नाही. जीवनाची परिपूर्णता, प्रवृत्ती आणि निवृत्ती प्राप्त करण्यासाठी. आणि ती गोष्ट आपण करणार नाही - अनुकूल आणि प्रतिकूल. मानवी जीवन… प्रत्येकाला माहित आहे, "हे माझ्यासाठी अनुकूल आहे, आणि हे माझ्यासाठी प्रतिकूल आहे." तर आसुराः जना, जे राक्षसी लोक आहेत, त्यांना हे माहित नाही, की "माझ्यासाठी काय अनुकूल आहे आणि माझ्यासाठी काय प्रतिकूल आहे." प्रवृत्तिं च निवृतिं च जना न विदुर आसुराः, न शौचं नापि चाचारः "काही स्वच्छता नाही, किंवा चांगली वागणूक नाही." न सत्यं तेषु विद्या… "आणि त्यांच्या आयुष्यात काही सत्य नाही." हे असुरिक आहे. आपण अनेक वेळा ऐकले आहे, "असुरिक," "असुरिक संस्कृती," "राक्षसी संस्कृती," हि सुरुवात आहे.
प्रवृत्तिं च निवृतिं च जना न विदुर आसुराः, न शौचं नापि चाचारः न सत्यं तेषु…
सत्यम, कोणताही खरेपणा नाही. आणि पहिल्या दर्जाचे जीवन म्हणजे ब्राम्हणी जीवन. सत्यं शौचं तपो. सुरुवात सत्यम आहे असुरिक जीवन काही सत्य नाही, काही खरेपणा नाही, आणि मानवी समाजात पहिल्या दर्जाचे जीवन, ब्राम्हण, सत्यं शौचं तापो, आणि तितिक्ष आर्जव: ज्ञानं विज्ञानम. हे पहिल्या दर्जाचे जीवन आहे. तर आमचे कृष्णभावनामृत आंदोलन आदर्श पुरुषांचा वर्ग निर्माण करण्यासाठी आहे. प्रथम दर्जाची पुरुष सत्यं शौचं तापो शमः दमः तितिक्षः हि धार्मिक सभ्यता आहे. आणि हि धार्मिक सभ्यता भारताद्वारे संपूर्ण जगाला दिली जाऊ शकते. हा भारताचा खास विशेषाधिकार आहे. कारण भारताशिवाय इतर देशात, ते जवळजवळ आसुरी-जना आणि उग्र-कर्म आहेत. कारखाने आणि इतर उग्र-कर्म पाश्चिमात्य देशांतून आले आहेत. पण अशा प्रकारे लोक कधीही खुश होणार नाहीत. भगवद् गीतेच्या सोळाव्या अध्यायात ते अतिशय विस्तृतपणे वर्णन केले आहे. दुशपूर आकांक्षा. या भौतिक प्रगतीने त्यांच्या इच्छा कधीही पुऱ्या होणार नाहीत. त्यांना माहित नाही. ते विसरत आहेत.
म्हणून आम्ही मुंबई निवडले. मुंबई शहर सर्वोत्तम शहर आहे, भारतातील सर्वात प्रगत शहर, भारतातील सर्वोत्तम शहर. आणि लोक देखील खूप चांगली आहेत.ती धार्मिकतेकडे कल असलेली आहेत. ते श्रीमंत आहेत. ते चांगल्या गोष्टी खूप चांगल्याप्रकारे घेऊ शकतात. म्हणून मला मुंबईत केंद्र सुरु करायची इच्छा आहे, ह्या कृष्णभावनामृत आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी. जरी माझ्या प्रयत्नांमध्ये अनेक अडचणी आहेत. तरीही, शेवटी हे कृष्णासाठीचे काम आहे. ते यशस्वी होईलच. तर आजच्या दिवशी... दोन वर्षांपूर्वी पाया आणि कोनशीला स्थापन केली होती, पण असुरिक जना पासून अनेक अनेक अडचणी होत्या. आता, या नाहीतर त्या कारणाने, आम्हाला या अडचणींपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. तर आम्ही या शुभ दिनी हि कोनशीला स्थापन करीत आहोत, आणि मी खूप खुश आहे की तुम्ही आमच्या कार्यक्रमात सामील झालात.