MR/Prabhupada 0093 - भगवद गीता सुद्धा कृष्णच आहे

Revision as of 05:09, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on Brahma-samhita, Lecture -- Bombay, January 3, 1973


तर श्रीमद-भागवतं हे वेदान्त-सूत्राचे मूळ स्पष्टीकरण आहे. म्हणून वेदान्त-सूत्रात, वेदान्त-सूत्र,श्रीमद-भगवंताचे स्पष्टीकरण म्हटले आहे.

जन्माद्यस्य यतोsन्वयादिश्चातरतश्चार्थेश्वभिज्ञ:स्वराट
तेने ब्रम्ह् हृदा य आदिकवये मुहयन्ति यत्सूरय: (श्री भा १।१।१)

हे वर्णन येथे आहे. तर आदी-कवी,आदी-कवी म्हणजे ब्रम्हा,ब्रम्हा,आदी-कवी. तर तेने ब्रम्हा. ब्रम्हा म्हणजे शब्द-ब्रह्मन,वैदिक साहित्य. त्याने ब्रम्हाच्या हृदयात शिकवले किंवा दिले. कारण जेव्हा जगाची निर्मिती झाली तेव्हा सुरवातीला ब्रम्हा हि एकमेव व्यक्ती होती. म्हणून असा प्रश्न आहे की "ब्रम्हाला कसे वैदिक ज्ञान मिळाले?" ते विशद केले आहे:तेने ब्रम्हा... ब्रम्हा म्हणजे वैदिक साहित्य. शब्द-ब्रह्मन. महिती,देवाचे वर्णन देखील ब्रम्हन आहे. ब्रह्मन म्हणजे परिपूर्ण. तिथे ब्रम्हन आणि साहित्य ह्यात फरक नाही. जे ब्रम्हन म्हणून वर्णन केले आहे. तीच गोष्ट:ज्याप्रमाणे भगवद-गीता आणि कृष्ण,तेथे काही फरक नाही.

भगवद-गीतापण कृष्ण आहे. नाहीतर ते पुस्तक का पुजले जाते? म्हणूनच,इतका वेळ, पाच हजार वर्षापासून, जर भागवत-गीता कृष्ण नसती तर? आजकाल पुष्कळ साहित्य,पुस्तक,प्रकाशित होतात. एक वर्ष,दोन वर्ष,तीन वर्षांनंतर-संपलं. नंतर त्याला कोणीही विचारत नाही. कोणीही त्याला विचारत नाही. कोणी वाचत नाही... कोणतंही साहित्य जगाच्या इतिहासातील घ्या, पाच हजार वर्षे कोणतंही साहित्य टिकत नाही. अनेक वाचक, अनेक विद्वान,आणि धर्मोपदेशक,सगळे वारंवार वाचतात. का? कारण ती कृष्ण आहे. कृष्णा... भगवद-गीता आणि भगवान ह्यामध्ये काही अंतर नाही. शब्द-ब्रह्मन. म्हणून भगवद-गीता सामान्य साहित्य मानू नये. असं नाही की अबकड ज्ञानाने कोणी त्यावरभाष्य करू शकत.नाही. ते शक्य नाही. मूर्ख आणि दुष्ट,ते त्यांच्या अबकड शिष्यवृत्तीने भगवद-गीतेवर भाष्य करण्याचा प्रयत्न करतात. ते शक्य नाही.हे आहे शब्द-ब्रम्हन. त्या माणसाला हे प्रकट होईल जो कृष्ण भक्त असेल. यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे... हा वैदिक उपदेश आहे.

यस्य देवे परा भक्तिर्
यथा देवे तथा गुरौ
तस्यैते कथिता हि अर्था:
प्रकाशन्ते महात्मन: (श उ ६।२३)

ते प्रकट होतात.म्हणून वैदिक साहित्य प्रकट होते असे म्हटले जाते. . असं नाही की मी तुमच्या अबकड ज्ञानाने समजू शकेन. मी एक भगवद्-गीता खरेदी करेन आणि कारण मला व्याकरणाचे ज्ञान आहे,मी समजू शकेन. नाही. वेदेषु दुर्लभ. ब्रम्ह-सम्हीथेत असं सांगितलंय, वेदेषु दुर्लभ तुम्ही तुमच्या साहित्यिक क्षमता किंवा शिष्यवृत्तीद्वारे सगळ्या वैदिक साहित्याचा अभ्यास करत गेलात - दुर्लभ. ते शक्य नाही. वेदेषु दुर्लभ. म्हणूनच बरेच लोक आहेत, जे आपल्या तथाकथित शिष्यवृत्तीद्वारे भगवद्-गीतेचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांची कोणीही दक्षता घेत नाही.

ते एका माणसालाही कृष्ण भक्त बनवू शकत नाहीत. हे खरं आव्हान आहे. आमच्या मुबंईत अशी खूप माणसं आहेत,जी बरीच वर्षे भगवद्-गीता सांगतात. पण ते एका माणसालाही शुद्ध कृष्ण भक्त बनवू शकले नाहीत. हे आमचं आव्हान आहे. पण हि भगवद्-गीता,आता जशी आहे तशी संगितली जाते. आणि हजारो युरोपियन आणि अमेरिकन, ज्यांचे पूर्वज किंवा कुटुंबातील लोकांना कृष्णाचे नावही माहित नाही,ते भक्त बनत आहेत. हे यशाचे गुपित आहे. पण हि मूर्ख माणसं,त्यांना माहित नाही. ते असा विचार करतात की त्यांच्या ज्ञानाचा वापर करून मनाने लावलेला भगवद्-गीतेचाअर्थ,ते भगवद्-गीता प्रकट करू शकतील. ते शक्य नाही. नाहं प्रकाश: योगमायासमावृत:. ह्या मूर्ख आणि अज्ञानी लोकांना कृष्ण कधीही प्रकट होत नाही. कृष्ण कधीही प्रकट होत नाहीत. नाहं प्रकाश:सर्वस्य ते साधारण मनुष्य नाहीत. हि मूर्ख आणि अज्ञानी माणसं त्यांना जाणू शकत नाहीत. ते शक्य नाही. श्रीकृष्ण सांगतात,

नाहं प्रकाश:सर्वस्य योगमायासमा...(भ गी ७।।२५) ।
मनुषयाणां सहस्रेषु
कश्चिद्यतति सिद्धये
यततामपि सिद्धानां
कश्चिन् वेत्ति मां तत्वत: (भ गी ७।।३)