MR/Prabhupada 0254 - वैदिक ज्ञान गुरुंनी समजावले आहे

Revision as of 12:28, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.8 -- London, August 8, 1973

तर मूळात आपण सर्व व्यक्ती आहोत,निराकार नाही. श्रीकृष्ण सुद्धा सांगतात... ते असे म्हणतील: "हे योद्धे, हे राजे, तू आणि मी, माझ्या प्रिय अर्जुना. असं नाही आहे की आपण भूतकाळात अस्तित्वात नव्हतो. "असं नाही की भविष्यकाळात आपल्या अस्तित्वाचा अंत होईल." तर हि श्रीकृष्णांची विशिष्ट सूचना,की: "मी,तू झणी हे सर्व राजे आणि योद्धे जे इथे जमा झाले आहेत, ते अस्तित्वात होते. जसे आपण आता अस्तित्वात आहोत,स्वतंत्र व्यक्ती; त्याचप्रमाणे,ते अस्तित्वात होते,स्वतंत्र व्यक्ती. आणि भविष्यकाळात सुद्धा आपल्याला वैयक्तिक अस्तित्व असेल. तर निराकार असण्याचा प्रश्नच कुठे आला? हे मूर्ख मायावादी, निरर्थक. म्हणून, प्रत्यक्षात गोष्ट समजून घेणे हे तत्व आहे,एखाद्याने श्रीकृष्णांकडे गेले पाहिजे जसे अर्जुन गेला. शिष्यस्तेSहं (भ गी २।७)"आता मी तुमचा शिष्य आहे. तुम्ही फक्त मला उपदेश करा. शाधि मां प्रपन्नम्. मी शरण येत आहे. मी तुमच्याशी सामान पातळीवर बोलण्याचा प्रयत्न करत नाही." गुरूंचा स्वीकार करणे म्हणजे जे गुरु सांगतील ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. नाहीतर गुरु करु नका. उगाच मजा म्हणून करु नका. तुम्ही तयार असलं पाहिजे. त्याला प्रपन्नम् म्हणतात. तद्विद्धि प्रणिपातेन(भ गी ४।३४) तुम्ही केवळ शरण गेल्याने समजू शकाल,गुरूंची परीक्षा घेण्याने नाही. "मी त्याची परीक्षा घेईन, त्यांना किती माहित आहे." मग गुरु करण्याला काय उपयोग आहे? नाही. म्हणून अर्जुन सांगतो की: "तुमच्याशिवाय,दुसरा कोणीही नाही जो खरंतर या गोंधळलेल्या स्तिथीत माझे समाधान करु शकेल." च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् (भ गी २।८) "माझी इंद्रिय शुष्क पडत आहेत." कारण खोटी इंद्रिय ... ती खरी इंद्रिय नाहीत. वास्तविक इंद्रिय आहेत. ह्रिषीकेन ह्रिषीकेश सेवनं (चैतन्य चरितामृत मध्य १९.१७०). आपण कृष्ण,हृषिकेशाची सेवा केली पाहिजे... श्रीकृष्ण वास्तव आहेत,आणि आपल्याला वास्तविक स्थितीपर्यंत आलं पाहिजे मग आपण श्रीकृष्णांची,ह्रिषीकेशाची सेवा करु शकू. इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर (भ गी ३।४२) हे वेगवेगळे टप्पे आहेत. जीवनाची शारीरिक संकल्पना म्हणजे इंद्रिय. पण जेव्हा आपण इंद्रियांच्या संकल्पनेच्या पलीकडे जाता,तुम्ही मानसिक स्तरावर येता. जेव्हा तुम्ही मानसिक स्तराच्या पलीकडे जाता,बौद्धिक स्तरावर येता. जेव्हा तुम्ही बुद्धिक स्तराच्या पलीकडे जाता, तेव्हा आध्यत्मिक पातळीवर येता. ते अध्यात्मिक रूप तिथे विविध श्रेणी आणि पायऱ्या आहेत. स्थूल शारीरिक स्तरावर आपण प्रत्यक्ष-ज्ञानं -अशी मागणी करतो. प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष अर्थ होतो. इथे ज्ञानाच्या विविध श्रेणी आहेत. प्रत्यक्ष,अपरोक्ष,प्रत्यक्ष,परोक्ष,अपरोक्ष,अधोक्षज, अप्रकृत. या ज्ञानाच्या विविध श्रेणी आहेत. तर शारीरिक स्तरावर प्राप्त झालेले, ज्ञान,प्रत्यक्ष समज ,ते वास्तविक ज्ञान नाही. म्हणून,आपण शास्त्रज्ञाना आव्हान देऊ शकतो, तथाकथित शास्त्रज्ञ. त्यांचं ज्ञानाचं मूलभूत तत्व जीवनाची शारीरिक संकल्पना आहे, प्रत्यक्ष,प्रायोगिक ज्ञान. प्रायोगिक ज्ञान म्हणजे स्थूल इंद्रियांनी झालेले आकलन. ते प्रायोगिक आहे. प्रत्यक्ष. प्रत्येकजण सांगत: "आम्ही देवाला पाहिले नाही." देव हा असा विषय नाही की तुम्ही या प्रत्यक्षने, प्रत्यक्ष, पाहू शकाल. देवाचं दुसरं नाव अनुभव आहे. अनुभव. ज्याप्रमाणे या खोलीत आपल्याला प्रत्यक्ष सूर्य दिसत नाही. पण आपल्याला माहित आहे की सूर्य आहे. हि दिवसाची वेळ आहे. तुम्हाला हे कसं समजलं? तुम्हाला दिसत नाही. पण इथे इतर पद्धती आहेत ज्यामुळे तुम्ही अनुभव घेऊ शकता. त्याला अपरोक्ष म्हणतात. प्रत्यक्ष,परोक्ष,अपरोक्ष. या प्रकारे कृष्णभावनामृत म्हणजे अधोक्षज आणि अप्रकृत इंद्रियांच्या पलीकडले. म्हणून,भगवाद् गीतेत सांगितलं आहे:अधोक्षज. कुठे प्रत्यक्ष अनुभव मिळू शकत नाही. तर जिथे प्रत्यक्ष अनुभव मिळू शकत नाही, मग कसे तुम्ही अनुभव मिळवू शकाल. ते श्रोत-पंथा आहे. ती श्रुती आहे. तुम्ही वेदामधून ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि वैदिक ज्ञान गुरूंनी समजावले आहे. म्हणून एखाद्याने म्हणून सर्वोच्च गुरु किंवा त्याच्या प्रतिनिधीकडून श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. मग हे सगळे त्रास,म्हणजे अज्ञान,नाहीस होऊ शकेल. च्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् I (भ गी २।८)