MR/Prabhupada 0055 - श्रवणाद्वारे कृष्णाला स्पर्श करणे

Revision as of 17:53, 1 October 2020 by Elad (talk | contribs) (Text replacement - "(<!-- (BEGIN|END) NAVIGATION (.*?) -->\s*){2,15}" to "<!-- $2 NAVIGATION $3 -->")
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.18 -- Hyderabad, November 23, 1972


चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केली होती: "जेव्हढी जगाच्या पाठीवर शहरे आणि गाव आहेत, सगळीकडे हा हरे कृष्ण मंत्र,किंवा चैतन्य महाप्रभूंच्या नावाचा प्रचार होईल." हे केले जात आहे.जगभरात हरे कृष्ण पंथाचा प्रचार करायला भरपूर वाव आहे. ते व्यावहारिक आहे. दुर्देवाने, जरी चैतन्य महाप्रभूंनी प्रत्येक भारतीयाला हि बाब सांगितली... असं नाही की बंगाली लोकांसाठी, कारण ते बंगालमध्ये अवतरले. त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की बंगाली लोकांसाठी त्यांनी सांगितले,

भारत-भूमीते मनुष्य-जन्म हैल यार (चै च अादि ९।४१ )

"ज्यांनी कोणी भारतवर्षाच्या पुण्यभुमीवर,मनुष्य जन्म घेतला आहे. त्याने आपले जीवन सार्थक केले पाहिजे." जन्म सार्थक करी. तुम्ही प्रचार करु शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे जीवन परिपूर्ण बनवत नाही. जर माझ्यातच उणीव असेल, तर मी प्रचार करु शकत नाही. मी परिपूर्ण असणेआवश्यक आहे. ते फार कठीण नाही. आपल्याला महान साधू, संत आणि स्वतः भगवान कृष्णांकडून मार्गदर्शन मिळाले आहे. ज्यामुळे आपलं जीवन परिपूर्ण बनवणे फार कठीण नाही. आपण फक्त दुर्लक्ष करत आहोत. ते आपलं दुर्देव आहे.

मंदा: सुमंद-मतयो मंद भाग्या: (श्री भा १।१।१०).

कारण आपण मंद आहोत,मन्द-मत:,आपण खोटा तर्कवाद स्वीकारतो,आणि वेळ वाया घालवतो. आपण शास्त्रप्रमाणानुसार योग्य मार्ग निवडला पाहिजे. मग आपण बुद्धिमान बनू. सुमेधसा.

"यज्ञे: संकीर्तनप्रायेर्यजन्ति हि सुमेधस: (श्री भा ११।५।३२ )

सोपी पद्धत. बुद्धिमान माणसं ह्या संकीर्तन चळवळीचा उपयोग त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करतील. हे सत्य आहे ते विज्ञान आहे, अधिकृत आहे. म्हणून दुर्लक्ष करू नका. हा हरे कृष्ण मंत्र तुमचे सर्वस्य माना. आणि कुठेही... नियमित: स्मरणे न काल:. त्याच्यासाठी काही नियम आणि विनियम नाहीत. "तुम्ही ह्या वेळेला जप करा किंवा त्या वेळेला, ह्या स्थितीत,किंवा त्या स्थितीत." नाही. कारण हा खासकरून बद्धजीवांसाठी आहे,त्यासाठी कोणताही कडक नियम नाही.

नाम्नामकारि बहुधा निजसर्वशक्ती स्तत्रार्पीता नियमित: स्मरणे न काल:

नाव,कृष्णाचे पवित्र नाव, हे कृष्णा एवढेच शक्तिशाली आहे. कृष्ण आणि त्याच्या नावात काही फरक नाही. कृष्ण परिपूर्ण आहे. म्हणून कृष्णाचे नाव आणि त्याचे रूप ह्यात काही अंतर नाही. कृष्णाचे गुण, कृष्णाचा परिवार,कृष्णाचे खेळ,कृष्णापेक्षा वेगळे नाहीत.सर्वकाही कृष्ण आहे. जर तुम्ही कृष्णा बद्दल ऐकत असाल,तर तुम्हाला कळलं पाहिजे कि तुम्ही कृष्णाला श्रवणाने स्पर्श करत आहात. जर तुम्ही कृष्णाची मूर्ती पाहिलीत,म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष कृष्णाला बघत आहात.कारण कृष्ण हा परिपूर्ण आहे. तो तुमची सेवा कोणत्याही प्रकारे स्वीकारतो, कारण तो सर्वकाही आहे.

"ईशावास्यमिदं सर्वं (ईशोपनिषद् १)

त्याची शक्ती. परस्य ब्रम्हन शक्तीस तथेदम अखिलं जगत. सर्वकाही कृष्णाची शक्ती आहे. जर आपण कृष्णाच्या शक्तीच्या सानिध्यात असू. थोड्याशा ज्ञानाने,आपण प्रत्यक्ष कृष्णाच्या सानिध्यात येऊ. हि पद्धत आहे. जर तुम्ही सतत कृष्णाच्या सानिध्यात राहिलात, त्याला कृष्णभवनामृत म्हणतात. मग तुम्ही शुद्ध बनता. शुद्ध जसे तुम्ही लोखंडी सळई अग्नीत टाकलीत ती गरम ,आणखी गरम,गरम होत पुष्कळच गरम होईल,आणि शेवटी ती सळई लाल होईल. जेव्हा ती लाल झालेली असते,तेव्हा ती आग असते,त्याला नुसतं लोखंडी सळई म्हणता येणार नाही.

त्याचप्रमाणे,जर तुम्ही कायम कृष्णभावनेत राहिलात, तुम्ही कृष्णमय व्हाल. हि पद्धत आहे. मग सर्वकाही शुद्ध बनेल. मग तुमचं आध्यत्मिक जिवन प्रकट होईल. मग तुमचं आयुष्य यशस्वी बनेल.