MR/Prabhupada 0115 - माझे व्यवसाय कृष्णा संदेश पाठविणे केवळ आहे

Revision as of 05:19, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture -- Los Angeles, July 11, 1971

त्यामुळे, मी अती संतुष्ट आहे की ही मुले मला आस्थावाइकपणे मदत करीत आहेत श्रीकृष्ण भावनाभावित आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी, आणि श्रीकृष्ण त्यांना आशीर्वाद देतील. मी फार क्षुल्लक आहे. माझी क्षमता नाही आहे. माझे काम आहे फक्त श्रीकृष्णांचा संदेश पोहचवण्याचा. केवळ टपालकचेरी मधल्या शिपाया प्रमाणे: त्याचे काम आहे पत्र पोहचवण्याचा. पत्रामधल्या सदराला तो जबाबदार नाही. प्रतिक्रिया ... एक पत्र वाचल्यानंतर ज्याच्या नावाचा पत्ता लिहिला आहे त्याला काहीतरी वाटू शकते. पण ती जबाबदारी त्या शिपायाची नाही आहे. त्याचप्रमाणे, माझी जबाबदारी आहे, मला जे गुरूशिष्य परंपरेतून मिळाले आहे, माझ्या आध्यात्मिक गुरुंकडून. मी फक्त तीच गोष्ट सादर करीत आहे, परंतु कोणतीही भेसळ न करता. ते माझे काम आहे. ती माझी जबाबदारी आहे. मला गोष्टी तंतोतंत सादर केल्याच पाहिजे ज्या पद्धतीने श्रीकृष्णांनी सादर केल्या आहेत. ज्या प्रकारे अर्जुनाने सादर केल्या, ज्या पद्धतीने आचार्यांनी सादर केल्या, चैतन्य प्रभू, आणि शेवटी माझे आध्यात्मिक गुरू, भक्तीसीद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज. त्यामुळे, त्याचप्रमाणे, जर तुम्ही त्याच चेतनेने श्रीकृष्णभावनाभावित आंदोलन घेतले, आणि आपण इतर लोकांना वितरित केले, आपल्या इतर देशबांधवाना, खात्रीने ते प्रभावी होईल, कारण त्यात भेसळ नाही आहे. या थापा नाही आहेत. इथे कुठलीच फसवणूक नाही आहे. ती शुद्ध आध्यात्मिक भावना आहे. फक्त सराव करा आणि वितरण करा. आपले जीवन तेजस्वी होईल.