MR/Prabhupada 0119 - आत्मा एव्हरग्रीन आहे

Revision as of 05:21, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on BG 2.1-10 and Talk -- Los Angeles, November 25, 1968

प्रभुपाद: होय.

श्रीमती: नंतर काय वय आहे, जसे जिवात्मा शरीर सोडून जातो, तुम्ही म्हातारे होता का?

प्रभुपाद: नाही, जिवात्मा हा वृद्ध नाही आहे. शरीर बदलत असते, ती प्रक्रिया आहे. ते स्पष्ट केले जाईल, देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति (भ.गी.२.१३) जिवात्मा सदाहरित आहे. शरीर बदलत असते. ते समजून घ्यायचे आहे, शरीर बदलत असते. ते प्रत्येकजण समजू शकतो. ज्याप्रमाणे तुमच्या बालपणात तुमचे शरीर होते... ज्याप्रमाणे हे मूल, एक वेगळे शरीर. आणि जेव्हा ते मूल एक तरुण मुलगी होईल, ते एक वेगळे शरीर होईल. पण जिवात्मा आहे ह्या शरीरात आणि त्या शरीरात. त्यामुळे हा पुरावा आहे की जिवात्मा बदलत नाही, शरीर बदलते. हा पुरावा आहे. मी माझ्या बालपणातील विचार करीत आहे. म्हणजे मी तोच आहे "मी" जो मी माझ्या बालपणात विध्यमान होतो, आणि मला आठवते माझ्या बालपणात मी हे करत होतो, ते करत होतो. पण ते बालपणाचे शरीर आता नाही आहे, ते निघून गेले आहे. त्यामुळे निष्कर्ष हा आहे की माझे शरीर बदलले आहे, पण मी तोच आहे. नाही का? हे सोपे सत्य आहे. तर हे शरीर बदलेल, तरीही मी राहीन. मी कदाचित दुसर्‍या शरीरात प्रवेश करीन, त्यात फरक पडत नाही, पण मी राहीन. तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति (भ.गी.२.१३) जसे मी माझे शरीर बदलत आहे अगदी उपस्थित स्थितीमध्ये, त्याचप्रमाणे, अंतिम बदल म्हणजे मी मेलो असे नाही. मी दुसर्‍या मध्ये प्रवेश... ते सुद्धा स्पष्ट केले आहे, वासांसि जीर्णानि यथा (भ.गी. २.२२) की मी बदलतो. ज्याप्रमाणे जेव्हा मी सन्यासि नव्हतो, मी कुठल्याही सज्जन माणसा प्रमाणे वस्रे परिधान करत होतो. आता मी माझी वेशभूषा बदलली आहे. त्याचा अर्थ असा नाही की मी मृत झालो आहे. नाही. मी माझे शरीर बदलले आहे, त्यात सर्व आहे, मी माझी वेशभूषा बदलली आहे.