MR/Prabhupada 0195 - शरीराने मजबूत, मनाने मजबूत, निश्चयाने मजबूत

Revision as of 10:40, 1 June 2021 by Soham (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


Lecture on SB 7.6.5 -- Toronto, June 21, 1976


प्रद्युम्न: अनुवाद: " म्हणून, भौतिक अस्तित्वात असताना , भवम अाश्रित: , एक सक्षम व्यक्ती जो योग्य आणि चूक यातील फरक ओळखू शकतो , त्याने जीवनाचे सर्वोच्च ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, जोपर्यंत शरीर नीट आणि मजबूत आहे, झिजण्यासाठी तयार आहे " प्रभुपाद:

ततो यतेत कुशल:
क्षेमाय भवम अाश्रित:
शरीरम् पौरुशम् यावन
न विपद्येत पुश्कलम (श्री भ ७।६।५)

तर हा मानवी क्रियाकलाप असावा, शरीरम् पौरुशम् यावन न विपद्येत पुश्कलम . जोपर्यंत आम्ही ठाम आणि मजबूत आहेत आणि अतिशय छान काम करू शकतो, आरोग्य पूर्णपणे योग्य आहे, त्याचा फायदा घ्या . भावनामृत चळवळ आळशी लोकांसाठी नाही. नाही. हे बळकट माणसासाठी आहे: शरीराने मजबूत, मनाने मजबूत , निश्चयाने मजबूत- - सर्व काही मजबूत - मेंदूमने मजबूत. हे त्यांच्यासाठी आहे.कारण आपल्याला जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त करायचे आहे. दुर्दैवाने, त्यांना हे माहित नाही की आयुष्यातील सर्वोच्च ध्येय काय आहे. आधुनिक ... नेहमीच आधुनिक नाही, आता हे अतिशय स्पष्ट आहे: आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे हे लोकांना माहित नाही. जो कोणी या भौतिक जगात आहे तो मायेमध्ये आहे, म्हणजे त्याला जीवनाचे ध्येय काय आहे हे कळले नाही. न ते विदु: , त्यांना माहित नाही , स्वार्थ-गतिम हि विष्णु . स्वार्थ-गति. प्रत्येकास स्व-स्वारस्य असला पाहिजे . स्वतःचे हित हा निसर्गाचा पहिला नियम आहे, असे ते म्हणतात. परंतु त्यांना स्वतःचे हित काय आहे हे माहिती नाही. तो घरी परत जाण्याऐवजी ईश्वराकडे परत जाण्याऐवजी - हाच त्याचा खरा स्वभाव आहे - तो पुढच्या आयुष्यात कुत्रा बनणार आहे. हे स्व हित आहे का? पण त्यांना ते काळत नाही. प्रकृती कसे कार्य करीत आहे, त्यांना हे माहिती नाही.न ते विदु: अदांत गोभिर विशताम् तमिश्रम । मतिर न कृष्णे परत: स्वतो वा

मतिर न कृष्णे परत: स्वतो वा
मिथो अभिपद्येत ग्रह-व्रतानाम
अदान्त-गोभिर विशताम
तमिश्रम् पुन: पुनश् चर्वित-चरवनानाम (श्री भ ७।५।३०)

ते कृष्ण चैतन्य...मतिर न कृष्णे. लोकांना कृष्ण जाणीवेत राहण्यासाची इच्छा नाही आहे. का? मतिर न कृष्णे परत: स्वतो वा . इतरांच्या सूचनांनुसार . ज्याप्रमाणे आम्ही संपूर्ण जगभरात कृष्ण भावनामृताचा प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहोत,परत: स्वतो, स्वतो म्हणजे वैयक्तिकरित्या . वैयक्तिक प्रयत्न करून. मी फक्त भगवद्गीता किंवा श्रीमद-भागवतम आणि इतर वैदिक साहित्य वाचत आहे. तर मतिर न कृष्णे परत: स्वतो वा मिथो वा, मिथो वा म्हणजे "संमेलन" आजकाल ते परिषदा घेणे अतिशय लोकप्रिय गोष्ट झाली आहे. तर एखादा कृष्ण भावनामृत होऊ शकत नाही, आपल्या वैयक्तिक प्रयत्नांद्वारे, किंवा काही इतर पुरुषांच्या सल्ल्यानुसार, किंवा मोठ्या, मोठ्या परिषदा घेऊन. का? गृह-व्रतानाम : कारण जीवनाचा त्याचा मूळ हेतू आहे की " "मी या घरात राहीन " गृह-व्रतानाम ". गृह म्हणजे घरगुती जीवन, गृह म्हणजे हे शरीर , गृह म्हणजे हे विश्व. बरेच लहान-मोठे गृह आहेत.