MR/Prabhupada 1041 - केवळ बाह्य लक्षणांवर उपचार करून तुम्ही मनुष्याला स्वस्थ बनवू शकत नाही

Revision as of 07:17, 13 July 2021 by Vanibot (talk | contribs) (Vanibot #0005: NavigationArranger - update old navigation bars (prev/next) to reflect new neighboring items)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)


751001 - Lecture Arrival - Mauritius


केवळ रोगाच्या बाह्य लक्षणांवर उपचार करून तुम्ही एखाद्या मनुष्याला स्वस्थ बनवू शकत नाहीत संपूर्ण जग जीवनाच्या बाह्य भौतिक संकल्पनेत जगत आहे, अगदी मोठी मोठी राष्ट्रे सुद्धा. जसे की तुमचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांना गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांत अनेक मोठी माणसे आहेत. ते चर्चा करतील, आणि गेल्या तीस वर्षांपासून ते चर्चाच करत आहेत. संयुक्त राष्ट्रे स्थापण्यात आली, परंतु जीवनाच्या प्रश्नांची उत्तरे ते शोधू शकले नाहीत. कारण ते मूलभूत तत्त्वांना विसरत आहेत; त्यांना हे माहीत नाही. त्यांच्यातला प्रत्येकजण बाह्य भौतिक पातळीवर विचार करतो: "मी भारतीय आहे," "मी अमेरिकन आहे," "मी जर्मन आहे," आणि "मी इंग्रज आहे, " अशा पद्धतीने. त्

यामुळे कोणताही उपाय सापडत नाही , कारण मूलभूत तत्त्वच चुकीचे आहे जोपर्यंत आपण जीवनाच्या 'मी शरीर आहे' या शारीरिक तत्त्वात काय चुकीचे आहे हे समजून घेणार नाहीत, तोपर्यंत ही समस्या सोडवली जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही आजाराचे निदान करू शकत नाही, केवळ बाह्य लक्षणे दूर करून एखाद्या व्यक्तीला खरोखर आतून निरोगी बनवून शकत नाहीत. ते शक्य नाही. आपले हे कृष्णभावनामृत आंदोलन जीवनाच्या बाह्य भौतिक तत्त्वावर आधारलेले नाही. हे आत्म्याच्या मूलभूत तत्त्वावर आधारलेले आंदोलन आहे. आत्मा काय आहे, आत्म्याची गरज काय आहे, आत्मा कशाप्रकारे शांतीपूर्ण व आनंदी होईल, मग सर्वकाही अगदी योग्य होईल.