MR/Prabhupada 0007 - कृष्णा यांच्या देखभाल येईल



Lecture on SB 1.5.22 -- Vrndavana, August 3, 1974

ब्रह्मानंद: ब्राह्मण कुठलाही रोजगार स्वीकारणार नाही.

प्रभुपाद: नाही, तो उपासमारिने मरेल. तो कोणताही रोजगार स्वीकारणार नाही. तो आहे ब्राह्मण. क्षत्रिय​ सुद्धा , आणि वैष्य सुद्धा. फक्त शूद्र. एक वैष्य​ कुठलाही कामधंदा शोधून काढेल. तो कुठला तरी कामधंदा शोधून काढेल. तर ही एक नित्य अनुभवायला मिळणारी गोष्ट आहे. एक श्रीयुत नंदी, दीर्घ काळ पूर्वी, कलकत्त्यामध्ये, तो एका मित्राकडे गेला की "जर तू मला थोडे भांडवल देऊ शकलास तर मी काही व्यवसाय सुरू करू शकेन." मग तो म्हणाला, "आपण वैश्य आहात का? व्यापारी ?" "होय", "अरे बाप रे, तू माझ्या कडून पैसे मागतोस? पैसे तर रस्त्यावरच आहेत. तू शोधू शकतोस." मग तो म्हणाला, "मला दिसत नाहीत." "तुला दिसत नाहीत ? म्हणजे काय?" "ते, तो एक मेलेला उंदीर आहे." "ते तुझे भांडवल आहे." हे बघा, त्या काळात प्लेग ची साथ होती, प्लेग चालू होता. तेव्हा महापालिकेने घोषणा केली होती की कुठलाही मेलेला उंदीर महापालिका कार्यालयात घेऊन आलात , त्याला दोन आणे देण्यात येतील. तर त्याने तो मेलेला उंदीर घेतला आणि महापालिका कार्यालयात घेऊन गेला. त्याला २ आणे देण्यात आले. मग त्याने त्या दोन आण्याच्या कुजलेल्या सुपारी घेतल्या, त्या धुतल्या आणि चार आण्याला विकल्या, किंवा पाच आण्याला. अशा प्रकारे, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा, तो माणूस खूपच श्रीमंत झाला. आमचा गॉडब्रदर त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य होता. नंदी कुटुंब. अजूनही ते नंदी कुटुंब, दररोज चारशे , पाचशे लोक जेवायला येतात. एक मोठे, अभिजात कुटुंब. आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नियमानुसार एका मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाल्यानंतर त्वरित, पाच हजार रुपये बँकेत जमा करण्यात येतात, आणि त्याच्या लग्नाच्या वेळी, ते पाच हजार रुपये व्याजासकट, तो घेऊन जाऊ शकतो. अन्यथा भांडवलात ह्या पेक्षा जास्त काही हिस्सा नाही. आणि प्रत्येक जण जो कुटुंबात राहतो, त्याला आसरा आणि अन्न मिळते. हे असे आहे... पण मूळ, मला असे म्हणायचे आहे, आणि ह्या कुटुंबाला स्थापन करणारा, नंदी, त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला, एक लाल, एक मृत घूस, किंवा उंदीर. ही प्रत्यक्षात वस्तुस्थिती आहे, प्रत्यक्षात वस्तुस्थिती, की जर कोणाला स्वतन्त्रपणे जगायचे असेल... कलकत्त्यामध्ये मी पाहिले आहे. अगदी गरीब वर्ग वैश्य, आणि सकाळी ते काही डाळ घेतील, डाळीचि एक पिशवी, आणि घरोघर जातात. डाळ ही सगळीकडे आवश्यक आहे. तर सकाळी तो डाळीचा व्यवसाय करतो, आणि संध्याकाळी तो घासलेटचा एक डब्बा घेतो. इतका की संध्याकाळी सर्वांना आवश्यक आहे. अद्याप तुम्हाला भारतात सापडतील, ती ... कोणीही रोजगार शोधत नाही. थोडे काही, जे काही त्याच्याकडे आहे, काही भुईमुग किंवा शेंगदाणे विकतात. तो काहीतरी काम करतो. सरतेशेवटी, श्रीकृष्ण सगळ्यांची देखभाल करतो. ती चुक असेल असा विचार करण्याचा की "हा मनुष्य माझी देखभाल करत आहे." नाही, शास्त्र म्हणते, एको यो बहूनां विदधाति कामान. तो श्रीकृष्णा बद्धल आत्मविश्वास आहे, की "श्रीकृष्णाने मला जीवन दिले आहे, श्रीकृष्णाने मला इथे पाठवले आहे. त्यामुळे तोच माझी देखभाल करेल. त्यामुळे माझ्या क्षमतेनुसार, मला काहीतरी करू दे, आणि त्या स्रोत माध्यमातून, श्रीकृष्ण देखभाल करतील.