MR/Prabhupada 0008 - कृष्ण - 'मी प्रत्येकासाठी पिता आहे', असा दावा



Janmastami Lord Sri Krsna's Appearance Day Lecture -- London, August 21, 1973

त्यामुळे, किमान भारतात, सर्व महान व्यक्ती, सदाचरणी व्यक्ती, ऋषि आणि आचार्य, त्यांनी हे अध्यात्मिक ज्ञान इतके चांगल्या रीतीने पूर्णपणे वाढवले आहे, आणि आपण त्याचा फायदा घेत नाही आहे. ते असे नाही की ती शास्त्र आणि उपदेश ही फक्त भारतीयांसाठी आहे किंवा हिंदुंसाठी आहे किंवा ब्राह्मणांसाठी. नाही. ती प्रत्येकांसाठी आहेत. कारण श्रीकृष्ण सांगतात (भ.गी. १४.४) सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः । तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ श्रीकृष्ण सांगतात की "मी सर्वांचा पिता आहे." त्यामुळे, तो आम्हाला शांतताप्रिय , आनंदी बनवण्यात उत्सुक असतो. ज्या प्रमाणे पिता आपल्या मुलाला स्थित आणि आनंदी पाहू ईच्छितो, त्याचप्रमाणे, श्रीकृष्ण आपल्यापैकी प्रत्येकाला आनंदी आणि स्थित पाहू ईच्छितो. म्हणून तो कधी कधी येतो. (भ.गी.४.७) यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति . हा श्रीकृष्णांच्या आगमनाचा उद्देश आहे. तर जे कोणी श्रीकृष्णांचे सेवक आहेत, श्रीकृष्णांचे भक्त, त्यांनी श्रीकृष्णांचे हे महान कार्य घेतले पाहिजे. त्यांनी श्रीकृष्णांचे हे महान कार्य हाती घेतले पाहिजे. ती चैतन्य महाप्रभूंची आवृत्ती आहे. अम्मर्राज्नाय गुरु हना तार एइदेश्य यरे देख तरे कह, क्रिसना-उपदेश (​चै.च . मध्य ७.१२८) क्रिसना-उपदेश. फक्त तोच प्रचार करण्याचा प्रयत्न करा जो श्रीक्रृष्णांनी भगवद् गीते मध्ये सांगीतला आहे. प्रत्येक भारतीयांचे ते कर्तव्य आहे. चैतन्य महाप्रभु म्हणतात. भारत​-भूमिते मनुश्य जन्म हैल यार्जन्म् सार्थक करि पर​-उपकार . (चै.च​.. आदि. ९.४१) म्हणुन भारतीय, भारतीय हे पर-उपकार करण्यासाठी आहेत. भारतीय हे दुसऱ्यांचे शोषण करण्यासाठी नाही आहेत. ते भारतियांचे उध्योग नाही आहेत. भारताचा इतिहास हा सर्व बाजूने पर-उपकार करण्यासाठी आहे. आणि पूर्वीच्या काळी, जगाच्या सर्व भागा मधुन, सतत भारतात येत होते अध्यात्मिक जीवन शिकुन घेण्यासाठी. येशू ख्रिस्त सुद्धा तीथे गेला होता. आणि चीन मधुन आणि दुसऱ्या देशातुन, तो इतिहास आहे. आणि आपण आपली स्वतःची ठेव विसरत आहोत. आम्ही किती निष्ठुर आहोत. अशी एक महान चळवळ, कृष्णभावना , पूर्ण जगात होत आहे. पण आपले भारतीय निष्ठुर आहेत, आपले सरकार निष्ठुर आहे. ते घेत नाहीत. ते आमचे दुर्दैव आहे. पण ते चैतन्य महाप्रभुंचे ध्येय आहे. ते म्हणतात कुठलाही भारतीय, भारत​-भूमिते मनुश्य जन्म , जर तो मानव आहे. या वैदिक साहित्याचा फायदा घेऊन त्याने आपले जीवन परिपूर्ण करणे आवश्यक आहे. आणि जगभरात ज्ञान वितरित करा. ते पर-उपकार आहे. त्यामुळे भारत करू शकतो. ते खरे पाहता प्रशंसा करतात. हे युरोपियन, अमेरिकन तरुण पुरुष, ते प्रशंसा करतात की किती महान.... मला दररोज़ डज़नावारी पत्र येतात, त्यांना ह्या चळवळी पासून किति फ़ायदा होतो ते. वास्तविक, हे तथ्य आहे. ते एका मृत शरिराला संजीवनी देत आहे. मी विषेशता भारतियांना वीनंती करत आहे, ख़ास करून मान्यवरांना, मेहरबानी करून या चळवळीला सहकार्य करा, आणि आपले जीवन आणि दुसऱ्यांचे जीवन यशस्वी करण्याचा प्रयत्न करा. ते श्रीकृष्णाचे ध्येय आहे, श्रीकृष्णाच्या आगमनाचे. फार आभारी आहे.