MR/Prabhupada 0009 - चोर भक्त झाले



Lecture on SB 1.2.12 -- Los Angeles, August 15, 1972

श्रीकृष्ण भगवद गीतेमध्ये सांगतात : (भ.गी.७.२५) नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृतः "मी प्रत्येकाला दिसू शकत नाही. योगमाया, योगामायेने मी आच्छादीलेला असतो. मग कसे आपण देव पाहू शकता ? पण हा हरामखोरपणा चालू आहे, की "तुम्ही मला देव दाखवू शकता का? आपण देव पाहिलात का?" देव म्हणजे फक्त एखाद्याच्या हातातील खेळणे झाले आहे. "येथे देव आहे. तो देवाचा अवतार आहे." (भ.गी.७.१५) न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ते आहेत पापी, हरामखोर, मूर्ख, मानव जातीतले सर्वात खालच्या दर्ज्याचे. ते सारखे चौकशी करतात की : "तुम्ही मला देव दाखवू शकता का?" आपण काय पात्रता संपादन केली आहे, की आपण देव पाहु शकता? येथे पात्रता आहे. ती काय आहे ? तच्छ्रद्दधाना मुनयः एक तर तो श्रद्धाळू असणे आवश्यक आहे. श्रद्धाळू. श्रद्दधानाः . तो देव पाहण्यासाठी खूप उत्सुक असणे आवश्यक आहे, खरे पाहता. एक प्रवृत्ती, शुल्लक गोष्ट म्हणून नव्हे, "आपण मला देव दाखवू शकता का?" एक जादू, जणू काय देव म्हणजे जादू आहे. नाही. तो फार गंभीर असला पाहिजे. "होय. जर देव आहे... आम्ही पाहिले आहे. आम्हाला देवासंबंधी माहिती दिली गेली आहे. म्हणून मला पाहिलेच पाहिजे." या संबंधात एक गोष्ट आहे. ती अतिशय उद्बोधक आहे, ऐकण्याचा प्रयत्न करा. एक व्यावसायिक वाचक भागवत वाचत होता. आणि तो वर्णन करत होता की श्रीकृष्ण, फार उच्च प्रकारे सगळ्या रत्नांनी सजलेला असतो. त्याला गाईंना चरायला जंगलात पाठवले जायचे. जेणेकरून त्या बैठकीत एक चोर होता. त्यामुळे त्याने विचार केला की "वृंदावन मध्ये जाउन का नाही ह्या मुलाला लुबाडुया? तो तर कितीतरी बहुमुल्य रत्नां बरोबर जंगलात आहे. मी तिकडे जाऊ शकतो आणि त्या मुलाला पकडून , त्याची सगळी रत्न घेऊ शकतो." त्याचा तो उद्देश होता. त्यामुळे, तो गंभीर होता की, "मला त्या मुलाला शोधून काढलेच पाहिजे. त्यानंतर एका रात्रीत मी लक्षाधीश होईल. इतकी रत्न, नाही." त्यामुळे तो तिथे गेला, पण त्याचा गुण होता की "मला श्रीकृष्ण बघायचे आहेत, मला श्रीकृष्ण बघायचे आहेत." ती कळ्कळ, ती उत्कंठा, ते शक्य झाले की त्याने श्रीकृष्णाना वृंदावन मध्ये बघितले. त्याने श्रीकृष्णाला तसेच बघितले जसे भागवत वाचकाने सांगितले होते. नंतर त्याने पाहिले, "अरे बाप रे, अरे बापरे, काय छान मुलगा आहे, श्रीकृष्ण." त्याने खुशामत करायला सुरूवात केली. त्याला असे वाटले " खुषामतीने, मी त्याची सगळी रत्न काढून घेईन." जेव्हा त्याने वास्तविक व्यावसायिक प्रस्ताव ठेवला, तर मी ह्या पैंकी काही दागिने घेऊ शकतो का? आपण फारच श्रीमंत आहात" "नाही,नाही,नाही. आपण... माझी आई रागावेल. मी नाही देऊ शकत..." श्रीकृष्ण एका लहान मुलाच्या रूपात. त्यामुळे तो अधिकाधिक श्रीकृष्णांसाठी उतावळा झाला. आणि मग.... श्रीकृष्णांच्या सनिध्यात, तो आधीच शुद्ध होऊन गेला होता. मग, शेवटी, श्रीकृष्ण म्हणाले, "ठीक आहे, आपण घेऊ शकता." नंतर तो एक भक्त बनला, ताबडतोब. कारण श्रीकृष्णांच्या सनिध्यात... तर कुठल्याही प्रकारे किंवा इतर, आम्ही श्रीकृष्णांच्या सनिध्यात आले पाहिजे. कुठल्याही प्रकारे किंवा इतर. तर मग आपण शुद्ध होऊन जाऊ.