MR/Prabhupada 0038 - ज्ञान वेद साधित केलेली आहे



Lecture on BG 7.1 -- Hong Kong, January 25, 1975

आता, श्रीकृष्ण आहेत. आपल्या जवळ श्रीकृष्ण ह्यांचे चित्र, फोटो,त्यांचे मंदिर आहेत, किती कृष्ण आहेत. ते काल्पनिक नाही. ते कल्पनाशक्ती नाही, मायावादी तत्वज्ञानी ह्यांना वाटते, की "आपण आपल्या मनात कल्पना करू शकता." नाही. देवाची कल्पना केली जाऊ शकत नाही. हा दुसरा मूर्खपणाच आहे. तुम्ही देवाची कल्पना कशी करू शकता? मग देव तुमच्या कल्पनेचा विषय बनतात. ते काही पदार्थ नव्हेत. ते देव नाहीत. ज्याची कल्पना केली जाते, ते देव नाहीत. देव प्रत्यक्ष तुमच्या समोर आहेत,श्रीकृष्ण. ते या ग्रहावर येतात. तदात्मानं सृजाम्यहं,सम्भवामि युगे युगे. त्यामुळे ज्यांनी देवाला पाहिले आहे, आपण त्यांच्याकडून माहिती घ्या. तद्विध्दी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्ष्यंति ते ज्ञानं ज्ञानिनस् तत्व-दर्शिनः (भ.गी. ४.३४) तत्त्वदर्शिनः.आपण जे सत्य पाहिले नाही, त्याची माहिती आपण दुसर्यांना कशी देऊ शकतो? त्यामुळे देव फक्त इतिहासात दिसत नाहीत, प्रत्यक्ष पण दिसतात. इतिहासात, जेव्हा श्रीकृष्ण या ग्रहावर उपस्थित होते, तेव्हा कुरुक्षेत्र ची लडाई चे इतिहास जिथे भगवद्-गीता बोलली गोली होती, ती एक ऐतिहासिक सत्यस्थिती आहे. त्यामुळे आपण इतिहासाच्या आणि शास्त्राच्या माध्यमातून देखील भगवान श्रीकृष्ण यांना पाहू शकता. शास्त्र-चक्षुसा. जसे ह्या क्षणी कृष्ण प्रत्यक्ष नाहीत, पण आपल्याला शास्त्राच्या माध्यमातून कळते की कृष्ण काय आहेत. म्हणून शास्त्र-चक्षुसा. शास्त्र..एकतर आपण थेट समजा किंवा शास्त्राच्या माध्यमातून समजा... थेट बोधापेक्षा शास्त्राच्या माध्यमातून केलेले आंकलन जास्त चांगले आहे. म्हणून आपले ज्ञान, जे लोक वैदिक तत्त्वांचे अनुसरण करत आहेत, त्यांचे ज्ञान वेद साधित आहे. ते ज्ञान कारखान्यात बनवत नाहीत. ज्या गोष्टींचे पुरावे वेद मध्ये आहेत,ते सत्य मानावे. त्यामुळे श्रीकृष्णांना वेदच्या माध्यमातून समजले जाते. वेदैष्च सर्वैरहमेव वेद्यः (भ.गी. १५.१५). ते भगवद गीता मध्ये म्हटले आहे. आपण श्रीकृष्णची कल्पना करू शकत नाही. जर एखादा बदमाश म्हणतो की "मी कल्पना करत आहे,", तर ती हरामखोरी आहे. आपण वेदच्या माध्यमातून श्रीकृष्णांना बघायला पाहिजे. वेदैष्च सर्वैरहमेव वेद्यः (भ.गी. १५.१५). तेच वेद अभ्यासचा उद्देश आहे. त्यामुळे त्याला वेदांत म्हणतात. श्रीकृष्णांचे ज्ञान वेदांत आहे.