MR/Prabhupada 0039 - आधुनिक नेते फक्त एक कठपुतळी प्रमाणे आहे



Lecture on SB 1.10.3-4 -- Tehran, March 13, 1975

त्यामुळे युधिष्ठिर सारखा एक आदर्श राजा, तो फक्त देशावर नव्हे, तर समुद्रावर, सम्पूर्ण ग्रहावर राज्य करू शकतो. ते आदर्श आहे. (वाचन:) "आधुनिक इंग्रजी कायद्याने आई वडिलांच्या पहिल्या मुलाला त्यांची सर्व संपत्ती वारसाहक्काने मिळते, हा कायदा महाराज युधिष्ठिरच्या काळापासून प्रचलित होता." याचा अर्थ संपूर्ण ग्रह, समुद्रांसहित. (वाचन:) "त्या काळात हस्तिनापुर, जे आता नवी दिल्लीत आहे, चे राजा, समुद्रांसहित संपूर्ण जगावर राज्य करीत होते, महाराजा परिक्षित, महाराजा युधिष्ठिर यांचे नातूच्या काळापर्यंत. त्यांचे धाकटे भाऊ, त्यांचे मंत्री आणि राज्य सरदार होते, आणि राजाच्या सर्व धार्मिक भाऊ दरम्यान पूर्ण सहकार्य होते. महाराजा युधिष्ठिर श्रीकृष्णांचे आदर्श राजा किंवा प्रतिनिधी होते ... " राजा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. "...पृथ्वीवर राज्य करणारा आणि राजा इंद्र सारखा, स्वर्गीय ग्रहांचे प्रतिनिधीत्व करणारा. इंद्र, चंद्र, सूर्य, वरूण, वायु, इत्यादी देव विश्वाच्या विविध ग्रहांचे प्रतिनिधी राजे आहेत. तसेच महाराजा युधिष्ठिर देखील पृथ्वीवर राज्य करणारे, त्यांपैकीच एक आहेत. महाराजा युधिष्ठिर आधुनिक लोकशाहीची विशेषत: शिक्षण नसलेले राजकीय नेते नव्हते. महाराजा युधिष्ठिर यांना भीष्मदेव आणि कधीही चूक न करणारे प्रभुंनी सुचित केले होते, आणि म्हणून त्यांना परिपूर्णपणे प्रत्येक गोष्टीचे पूर्ण ज्ञान होते. राज्यातील आधुनिक निवडून आलेले कार्यकारी अधिकारी फक्त एक कठपुतळी आहे कारण त्याला राजसी अधिकार नाहीत. जरी महाराज युधिष्ठिर जसे मार्गदर्शन आहे, तरी आपल्या स्वरूप स्थितीमुळे आपल्या इच्छानुसार तो काही करू शकत नाही. त्यामुळे पृथ्वीवर अनेक राज्यांमध्ये भांडण होत आहेत कारण आहे वैचारिक मतभेद किंवा इतर स्वार्थी हेतू. पण महाराज युधिष्ठिर सारखे राजा कडे त्यांची स्वत: ची विचारसारणी नव्हती. ते फक्त परिपूर्ण प्रभु व त्यांच्या प्रतिनिधींच्या सूचना पाळत, ते प्रतिनिधी होते, भीष्मदेव. शास्त्रांमध्ये लिहिले आहे की आपण त्या महान अधिकारी आणी अचूक भगवंतांचे वैयक्तिक हेतू आणि उत्पादित विचारसारणीचा त्याग करून अनुसरण करावे. म्हणून महाराज युधिष्ठिर संपूर्ण जगतावर,समुद्रांसहित, राज्य करू शकले, कारण ती तत्वे अचूक व प्रत्येकाला सर्वत्र लागू होणारी होती. एक जागतिक शासनाची संकल्पना फक्त तेव्हाच पूर्ण केली जाऊ शकते जेव्हा आपण त्या अचूक अधिकारीचे अनुसरण करतो. एक अपूर्ण मानवी प्रत्येकाला मान्य होणारी एक विचारधारा तयार करू शकत नाही. केवळ परिपूर्ण आणि कधीही चूक न करणाराच तो कायदा बनवू शकतो जे सर्वत्र वापरू शकतो आणि ज्याचे अनुसरण संपूर्ण जग करू शकतो. व्यक्ती राज्य करतो, वस्तुनिष्ठ सरकार नव्हे. व्यक्ती परिपूर्ण असेल तर सरकारही परिपूर्ण आहे. जर व्यक्ती मूर्ख असेल तर सरकार मूर्खांचे नंदनवन आहे. हाच निसर्गाचा नियम आहे. सदोषपूर्ण राजे किंवा कार्यकारी प्रमुख ह्यांचे अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे, कार्यकारी प्रमुख महाराजा युधिष्ठिर सारखे प्रशिक्षित व्यक्ती असणे आवश्यक आहे, आणी त्याकडे जगभरात राज्य करायची पूर्ण हुकुमशाही असणे आवश्यक आहे. जागतिक शासनाची संकल्पना फक्त महाराजा युधिष्ठिर सारखे एक परिपूर्ण राजाच्या राजवटीतच आकार घेऊ शकते. महाराजा युधिष्ठिर सारखे राजे जगावर राज्य करीत होते म्हणून सारे जग त्या दिवसांत आनंदी होते. ह्या राजाला महाराजा युधिष्ठिरचे अनुसरण करू द्या आणि एक उदाहरण दाखवा की कशी ही राजेशाही एक परिपूर्ण राज्य तयार करू शकते. शास्त्रांमध्ये सर्व विधीपूर्वक दिले आहे, आणि त्याचे अनुसरण करून, तो करू शकतो. त्याकडे ती शक्ती आहे. मग तो असा परिपूर्ण राजा होता, म्हणून, श्रीकृष्णांचे प्रतिनिधी, म्हणून, कामं ववर्ष परजन्यः (श्री.भा. १.१०.४). परजन्यः म्हणजे पाऊस. त्यामुळे पाऊस जीवनाच्या सर्व गरजांच्या पुरवठ्याचे मूलभूत तत्त्व आहे, पाऊस. म्हणून श्रीकृष्ण भगवद-गीतामध्ये सांगतात, अन्नाद भवन्ति भूतानि पर्जन्याद अन्न-सम्भवः (भ.गी. ३.१४). मनुष्याला आणि प्राण्यांना आनंदी करायचे असेल तर ... प्राणी देखील आहेत. ते... हे चोर राज्य कार्यकारी, कधी कधी ते मनुष्यासाठी लाभकारी असण्याचा देखावा करतात पण प्राण्यांसाठी काही लाभ नाही. का? हा अन्याय का? ते पण इथे जन्मले आहेत. ते सुद्धा जीव आहेत. ते प्राणी आहेत. त्यांना बुद्धी नसेल. त्यांना बुद्धी आहे, मनुष्यासारखी चांगली नाही,पण ह्याचा अर्थ असा आहे का की त्यांना मारण्यासाठी कत्तलखाने बांधावे? हे न्याय आहे का? आणी फक्त हेच नव्हे, पण कोणीही जर राज्यात आले, तर राजाने त्याची रक्षा केली पाहिजे. हा फरक का? त्यामुळे कोणीही निवारा मागितला,"सर, मी आपल्या राज्यात राहू इच्छितो", तर त्याला सर्व सुविधा दिल्या पाहिजे. असे का, "नाही, नाही, तुम्ही येऊ शकत नाही. तू अमेरिकन. तू भारतीय. तू हे"? नाही. कित्येक गोष्टी आहेत.त्यांनी जर तत्त्वांचे अनुसरण केले, वैदिक तत्व, तर एक आदर्श राजा चांगला नेतां बनू शकतो. आणि निसर्ग मदत करेल. त्यामुळे म्हटले जाते की महाराजा युधिष्ठिरच्या काळात, कामम् ववर्ष परजन्यः सर्वकामदुघा महाराष्ट्र (श्री.भा. १.१०.४). मही, पृथ्वी. आपण पृथ्वीवर आपल्या सर्व गरजा पूर्ण करता. ते सर्व आकाशातून येत नाही. होय, ते पावसाच्या स्वरूपात आकाशातून पडते. पण ते कोणत्या वेगळ्या व्यवस्थेमुळे पृथ्वीवर येत आहे, हे विज्ञान त्यांना माहीत नाही. पाऊस येतो काही विशिष्ट अटी आणि तार्यांच्या प्रभाव अंतर्गत. मग अनेक गोष्टी, मौल्यवान दगड, मोती चे उत्पादन होते. या गोष्टी कशा येत आहेत ते त्यांना माहीत नाही. राजा धार्मिक वृत्तीचा असेल तर निसर्ग देखील त्याची मदत करतो. आणि राजा, सरकार जर धार्मिक वृत्तीची नसेल, तर निसर्ग ही सहकार्य करत नाही.