MR/Prabhupada 0112 - कोणतीही गोष्ट परिणामाने सिद्ध होते



Television Interview -- July 29, 1971, Gainesville


मुलाखतकार: सर, तुम्ही ह्या देशात १९६५ला आलात,जसे मी म्हणालो, तुमच्या गुरुमहाराजांच्या सूचनेनुसार किंवा आज्ञेने, बरं,तुमचे गुरुमहाराज कोण?

प्रभुपाद: माझे गुरुमहाराज ओम् विष्णुपाद परमहंस भक्तीसिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपाद.

मुलाखतकार: आता गुरु-शिष्य परंपरेबद्दल आधी आपण ज्याबद्दल बोलत होतो. ह्या गुरु-शिष्य परंपरेच्या सुरवातीपासून. तुमच्या गुरुमहाराजांपासून कृष्णापर्यंतच्या आधीच्या सगळयांना तुमचे गुरुमहाराज म्हणायचं का?

प्रभुपाद: हो, ५००० वर्षा पूर्वी गुरु-शिष्य परंपरा कृष्णापासून सुरु झाली.

मुलाखतकार: तुमचे गुरुमहाराज अजून जिवंत आहेत का?

प्रभुपाद: नाही. १९३६साली ते वारले

मुलाखतकार: म्हणजे ह्या विशिष्ट वेळी संघाचे मुख्य तुम्ही आहात? असं समजायचं का?

प्रभुपाद: मला पुष्कळ गुरुबंधू आहेत, पण मुख्यतः मला सुरवातीपासूनच हे करायला (गुरूने) आज्ञा दिली होती. म्हणून मी गुरुमहाराज्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. एव्हढेच.

मुलाखतकार: आता तुम्हाला ह्या देशात पाठवलंय, युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. हा तुमचा प्रांत आहे.हे बरोबर ना?

प्रभुपाद: माझा प्रांत , ते काय म्हणाले,की "तू जा आणि हे तत्वज्ञान इंग्रजी जाणणाऱ्या लोकांना सांग."

मुलाखतकार: इंग्रजी बोलणाऱ्या जगाला.

प्रभपाद: हो, आणि खासकरुन पाश्चिमात्य देशात,हो. त्यांनी तस सांगितलं.

मुलाखतकार: सर,जेव्हा तुम्ही १५,१६ वर्षांपूर्वी ह्या देशात आलात आणि सुरवात केलीत...

प्रभुपाद: नाही,नाही, १५,१६ वर्ष नाही.

मुलाखतकार:५,६,वर्षापूर्वी. मला क्षमा करा. जगाच्या ह्या भागात,तुम्ही जगाच्या ह्या भागात आला नसतात जिथे धर्माची हानी झाली आहे. अमेरिकेमध्ये अनेक धर्म आहेत. आणि मला वाटत ह्या देशातील लोकना विश्वास ठेवायला आवडतो. मोठया प्रमाणात, की ते धार्मिक आहेत,लोक जे देव मानतात ते स्वतःला एखादया धार्मिक संस्थेला वाहून घेतात. आणि ह्याबाबतीत तुमचे विचार काय. तुम्हाला काय वाटत की तुम्ही आणखी एका धार्मिक संस्थेची भर पाडाल इथे ह्या देशात येऊन आणि तुमचे तत्वज्ञान सांगुन?

प्रभुपाद: हो, मी पहिल्यांदा तुमच्या देशात आलो मी बुटलरमध्ये एका भारतीय मित्राचा पाहुणा होतो.

मुलाखतकार: पेनसिलव्हेनिया.

प्रभुपाद: पेनसिलव्हेनिया. हो जरी तो एक छोटा देश होता,मी खूप सुखी होतो कारण तिथे खूप चर्च होती.

मुलाखतकार:अनेक चर्च,हो हो,

प्रभुपाद: हो अनेक चर्च. आणि मी अनेक.चर्चमध्ये वार्तालाप केला,माझ्या यजमानांनी व्यवस्था केली होती. ते त्या हेतूने नव्हते,की मी इथे आलोय ते इतर धर्माच्या लोकांना हरवण्यासाठी. तो माझा हेतू नाही. आमचे उद्दिष्ट (मिशन) हे,चैतन्य महाप्रभूंचे उद्दिष्ट (मिशन), सगळ्यांना देवावर प्रेम करायला शिकवा. एवढंच.

मुलाखतकार:पण कुठल्या मार्गाने,सर, तुम्हाला एक विचारु का,तुम्ही आत्ता कुठल्या प्रकारे विचार करता. की देवावर प्रेम करण्याची तुमची शिकवण हि बाकीच्यांपेक्षा वेगळी आणि चांगली आहे. आधीपासुनच जी ह्या देशात देवावर प्रेम करायला शिकवत आहेत. आणि शतकानुशतके पाश्चिमात्य देशात चालत आली आहे?

प्रभुपाद:खरं आहे. कारण आम्ही चैतन्य महाप्रभूंच्या पदचिन्हाचे अनुसरण करत आहोत. ते मानले जातात ... आम्ही त्यांचाच स्वीकार केला - वैदिक प्रमाणानुसार - तेच स्वतः कृष्ण आहे.

मुलाखतकार: ते कोणता अवतार आहेत?

प्रभुपाद: चैतन्य महाप्रभु.

मुलाखतकार: अरे हो. ते भारतात पाचशे वर्षपूर्वी अवतरले.

प्रभुपाद: हो. ते स्वतः कृष्ण आहेत. कृष्णांनी अवतार घेतला,आणि त्यानें कृष्णावर कसे प्रेम करायचे ते शिकवले. म्हणून त्यांची पद्धत अधिकृत आहे. जसे तुम्ही ह्या क्षेत्रात प्रवीण आहात. जर कोणी काही करत असेल तरं,खुद्द स्वतः त्याला शिकवलंत,"हे असं कर" ते जास्त अधिकृत आहे. म्हणुन कृष्ण भावनामृत, म्हणजे - देव स्वतः तुम्हाला शिकवतो. जसे भगवद्-गीतेत,कृष्ण हा देव आहे. तो त्याच्या स्वतःबद्दल बोलतो. आणि सगळ्यात शेवटी त्याने सांगितलंय, "केवळ मला शरण ये. मी तुझा सांभाळ करीन."पण लोक गैरसमज करुन घेतात. म्हणून चैतन्य महाप्रभु- कृष्ण परत आला, लोकांना कसे शरण जायचे हे शिकवायला. चैतन्य महाप्रभूंनी अवतार घेतला. आणि म्हणून आम्ही चैतन्य महाप्रभूंच्या पदकचिन्हाचे अनुसरण करत आहोत. हि पद्धत उदात्त आहे. की परदेशी ज्यांना कृष्ण कोण हे सुद्धा माहित नाही, ते सुद्धा शरण जातात. कारण हि पद्धत अतिशय गुणकारी आहे. हा खरा माझा हेतू आहे. आम्ही असं म्हणत नाही की "हा धर्म दुसऱ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे,"किंवा,माझी पद्धत चांगली आहे. आम्ही परिणाम पाहू इच्छित आहोत. संस्कृतमध्ये एक शब्द आहे,फलेंना परीचीयते. "गोष्ट तिच्याच परिणामाने सिद्ध होईल"

मुलाखतकार:गोष्टीचा न्याय कशाने..?

प्रभुपद: परिणामाने.

मुलाखतकार:हो.

प्रभुपाद: तुम्ही असं म्हणू शकता, मी माझी पद्धत सगळ्यात चांगली आहे असं म्हणू शकतो. तुम्ही तुमची पद्धत चांगली आहे असं म्हणू शकता, पण आपण परिणामाद्वारे कोणती पद्धत श्रेष्ठ हे ठरवलं पाहिजे. असं... भगवद्-गीतेत म्हटलंय की अशी पद्धत सगळ्यात चांगली ज्यामुळे तुम्ही देवावर प्रेम करायला शिकता.