MR/Prabhupada 0127 - तऱ्हेवाईक मार्गाने एक मोठी संस्था गमावली गेली
Lecture on SB 1.2.11 -- Vrndavana, October 22, 1972
मग... माझे गुरु महाराज नेहमी सांगायचे की "श्रीकृष्णांना पाहण्याचा प्रयत्न करु नका. असं कार्य करा की श्रीकृष्णांचे तुमच्याकडे लक्ष जाईल." ते गरजेचे आहे. जर श्रीकृष्ण. जर श्रीकृष्णांचे थोडेसे लक्ष तुम्ही वेधू शकलात. यत कारुण्य-कटाक्ष-वैभववतां, कटाक्ष-वैभववतां... प्रबोधानंद सरस्वती सांगतात, जर तुम्ही काहीतरी करून श्रीकृष्णांचे थोडेसे लक्ष वेधू शकलात, तुमचे आयुष्य यशस्वी होईल. लगेच. आणि तुम्ही कसे वेधू शकाल?
- भक्त्या मामभिजानाति (भ गी १८।५५)
फक्त श्रीकृष्णांची सेवा करून. सेवा करा, कृष्णाची सेवा करा,कारण ती अध्यात्मिक गुरूंचा आदेश आहे. कारण अध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत. आपण थेट श्रीकृष्णांपर्यंत पोचू शकत नाही. यस्य प्रसादाद् भगवत्-प्रसादो जर तुम्ही प्रामाणिक अध्यात्मिक गुरु असाल, श्रीकृष्णांचे प्रतिनिधी,ते फार कठीण नाही. प्रत्येकजण श्रीकृष्णांचा प्रतिनिधी बनू शकतो. कसे? जर आपण श्रीकृष्णांचा संदेश जसा आहे तसा पाळला .एवढेच. जसे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय,
- आमार आज्ञाय गुरु हना (चै च मध्य ७।१२८),
"माझ्या अध्यक्षतेखाली तुम्ही आध्यत्मिक गुरु बनाल तर तुम्ही चैतन्य महाप्रभू, श्रीकृष्णनांची आज्ञा मानलीत, मग तुम्ही गुरु बनाल. आमार आज्ञाय गुरु हना. दुर्दैवाने, आपली आचार्यांची आज्ञा स्वीकारायची इच्छा नसते. आपण आपली मत तयार करतो. आम्हाला व्यवहारिक अनुभव आहे,कशी तऱ्हेवाईक मार्गाने एक मोठी संस्था गमावली गेली. अध्यात्मिक गुरूंची आज्ञा न पाळल्याने, त्यांनी स्वतःच काहीतरी निर्माण केलं आणि सगळंच गमावलं म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरानी अध्यात्मिक गुरूच्या वचनांवर जास्त भर दिला आहे.
- व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन (भ गी २।४१)).
जर तुम्ही अध्यात्मिक गुरूंच्या आदेशांवर ठाम रहाल,मग तुमची सोय किंवा गैरसोय ह्याचा विचार न करता,मग तुम्ही योग्य बनता.
- यस्य देवे परा भक्तिर्
- यथा देवे तथा गुरौ
- तस्यैते कथिता हि अर्था:
- प्रकाशन्ते महात्मन:(श उ ६।२३)
ह्याला सगळ्या आचार्यांनी पुष्टी दिली आहे. आम्ही श्रीकृष्णांच्या प्रामाणिक प्रतिनिधींची आज्ञा विश्वासार्हपणे पाळली पाहिजे. मग आपलं आयुष्य यशस्वी होईल. मग आपल्याला श्रीकृष्ण परमसत्य आहेत हे समजेल. वदन्ति तत्तत्त्वविदस्तत्त्वं (श्रीमद्-भागवत १.२.११). आपण त्तत्त्वविद कडून ऐकलं पाहिजे, विद्वान किंवा राजकारण्यानकडून नाही. ज्याला सत्य माहित आहे, तुम्ही त्याच्याकडून ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही त्या तत्त्वाशी ठाम राहिलात,मग तुम्हाला सगळं स्पष्टपणे कळेल.
धन्यवाद.