MR/Prabhupada 0128 - मी कधीही मरणार नाही



Press Conference -- July 16, 1975, San Francisco


पत्रकार: अमेरिकेत किती सदस्य आहेत? मला दोन हजार सांगितले आहेत. बरोबर आहे का? ते तस सांगू शकतात.

जयतीर्थ: ठीक आहे, आमची जगभरातील सदस्यांची मुद्रित संख्या दहा हजार आहे. त्यापैकी किती अमेरिकेत आहेत हे नक्की सांगता येणार नाही.

पत्रकार: मी ह्या चळवळीवर पाच वर्षा पूर्वी गोष्ट लिहिली होती आणि त्यावेळी अमेरिकेत सुद्धा सदस्यांची संख्या दोन हजार होती.

प्रभुपाद: ती वाढत आहे.

पत्रकार: वाढत आहे?

प्रभुपाद: होय,नक्कीच. जयतीर्थ: मी म्हटलं की जगभरातील संख्या दहा हजार आहे.

पत्रकार: हो,मी समजलो. मला तुम्ही किती वर्षाचे आहात सांगाल का? जयतीर्थ: श्रीला प्रभुपाद त्यांना तुमचं वय जाणून घ्यायचंय.

प्रभुपाद: एक महिन्यानंतर मी एैशी वर्षाचा होईन.

पत्रकार(२):एैशी?

प्रभुपाद: एैशी वर्षाचा.

रिपोर्टर: काय होईल...

प्रभुपाद: १८९६ ला माझा जन्म झाला, आता तुम्ही गणना करू शकता.

पत्रकार: जेव्हा तुम्ही हा देह सोडून जाल तेव्हा अमेरिकेत ह्या चळवळीचे काय होईल?

प्रभुपाद: मी कधीही मारणार नाही. भक्त: जय! हरी बोल (हशा)

प्रभुपाद: मी माझ्या पुस्तकांमार्फत जिवंत राहीन, आणि तुम्ही त्याची उपयोग कराल.

पत्रकार: आपण उत्तराधिकारी तयार करताय का?

प्रभुपाद: हो, माझे गुरु महाराज आहेत. माझ्या गुरु महाराजांचा फोटो कुठे आहे? मला वाटत... इथे आहे.

पत्रकार: हरे कृष्ण आंदोलन सामाजिक आंदोलनात का भाग घेत नाही?

प्रभुपाद: आम्ही सर्वोत्तम समाजसेवी आहोत. लोक मूर्ख आणि दुष्ट आहेत. आम्ही त्यांना ईश्वराच्या चेतनेची सुंदर कल्पना शिकवत आहोत.आम्ही सर्वोत्तम समाजसेवी आहोत. आम्ही सगळे गुन्हे थांबवू. तुमचं समाजकार्य काय आहे? हिप्पी आणि गुन्हेगार निर्माण करणे. ती समाजसेवा होत नाही. सामाजिक कार्य म्हणजे समाज शांत,बुद्धिमान देव मानणारा, प्रथम दर्जाची माणसं ते समाजकार्य. जर तुम्ही चौथ्या-दर्जाची,पाचव्या दर्जाची,दहाव्या-दर्जाची माणसं निर्माण कराल ह्याला समाज कार्य म्हणायचं का? आम्ही निर्माण करतो ती. जरा बघा. इथे प्रथम-श्रेणीचा माणूस आहे. त्याना अवैध कामसंबंध, नशा,मांसाहार करणे,किंवा जुगार.कोणत्याही वाईट सवयी नाहीत. ते सर्व तरुण आहेत.त्याना असल्या गोष्टींचे व्यसन नाही.हे समाज कार्य आहे.

भक्तदास: श्रीला प्रभुपाद,त्यांना जाणून घायचे आहे हरे कृष्ण आंदोलनाचे राजकीय परिणाम काय होतील?

प्रभुपाद: जर हरे कृष्ण आंदोलन स्वीकारलं तर सगळं काही उत्तम होईल. यस्यास्ति भत्त्किर्भगवत्यकिञ्चना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुराः (श्रीमद्-भागवत ५.१८.१२) जर या ईश्वर चेतनेचा प्रसार केला,तर प्रत्येकजण उत्तमरीत्या पात्र होईल. आणि ईश्वरी चेतनेशिवाय, तथाकथीत शिक्षण ज्याची आपण सकाळी चर्चा करत होतो, त्याला काही किंमत नाही. ते फक्त बोलत आहेत. आपण कोणत्या विषयावर बोलत होतो?

बहुलाश्व: आज सकाळी मनोविज्ञान.

प्रभुपाद: याचा परिणाम निराश विद्यार्थी टॉवरवरून जीव देत आहेत आणि काचेने त्यांना संरक्षण देत आहेत.

बहुलाश्व: बर्कले कॅम्पसच्या विद्यार्थांनी बेल्ल टॉवरच्या ६०व्या मजल्यावरून आत्महत्या करण्याच्या हेतूने उडी मारली. म्हणून मुलांना उडी मारण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी काच बसवली. तर प्रभुपाद सांगत होते की हे यांचं शिक्षण, की पदवी मिळाल्यानंतर, त्यांना आत्महत्या करावी लागते.

प्रभुपाद: याला शिक्षण म्हणत नाहीत. विद्या दधाति नम्रता. सुशिक्षित म्हणजे तो नम्र, सौम्य,सभ्य,ज्ञानी असला असला पाहिजे. ज्ञान,सहिष्णुता,मनावर ताबा,इंद्रियांवर ताबा ह्या सगळ्या गोष्टी व्यवहारात आणल्या पाहिजेत. ते खरं शिक्षण. हे काय शिक्षण आहे?

पत्रकार: तुम्ही महाविद्यालय सुरु करण्याच्या विचारात आहात का?

प्रभुपाद: हो, तो माझा पुढील प्रयत्न आहे, आम्ही वर्गीकरणानुसार शिक्षण देऊ. प्रथम-श्रेणी,द्वितीय-श्रेणी,त्रितिय-श्रेणी, चौथ्या-श्रेणींपर्यंत. आणि नंतर पाचवी-श्रेणी,सहावी-श्रेणी, ते आपोआपच होईल. म्हणून प्रथम-श्रेणीतील पुरुष,किमान समाजामध्ये,पुरुषांचा एक आदर्श वर्ग असावा. आणि असा की ज्यांना मनावर नियंत्रण ठेवायला प्रशिक्षण दिले आहे. इंद्रियांवर ताबा ठेवणे,स्वच्छता, सत्यता, सहनशीलता, साधेपणा, ज्ञानी,त्या ज्ञानाचा जीवनात व्यावहारिक उपयोग आणि ईशवरावर पूर्ण विश्वास. हा प्रथम-श्रेणीचा माणूस.